Maharashtra News Live : निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर 10 मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
Maharashtra Politics Live news : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे... याबद्दलचे ताजे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Lok Sabha elections 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व राजकीय घडामोडींचे अपडेट्स वाचा... एकाच ठिकाणी...
ADVERTISEMENT
दिल्लीत काय घडतंय... पहा लाईव्ह
ADVERTISEMENT
- 09:12 PM • 19 Mar 2024
निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर 10 मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
'या' 10 मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
1. अश्विनी भिडे, एमडी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (रिक्त पदावर)
2. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, BMC
3. अंकित, सीईओ, झेडपी, बुलढाणा
4. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव
5. विशाल नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., धुळे
6. अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, बीएमसी
7. श्री पी वेलरासू, (प्रतीक्षेत)
8 TMC आयुक्त (कोणताही आदेश नाही)
9. संजय मीना, आयुक्त, एनएमआरडीए, नागपूर
10. मनोजकुमार सुर्यवंशी (प्रतीक्षेत)
11. राजेश नार्वेकर, आयुक्त, सहकार आणि निबंधक, पुणे
12. आयुक्त, नवी मुंबई एमसी - (कोणताही आदेश नाही)
13. आयुक्त, BMC (अद्याप आदेश नाही)
14. श्रीमान आय एस चहल (अद्याप ऑर्डर नाही) - 08:12 PM • 19 Mar 2024
राज ठाकरे-अमित शाह भेटीवर राऊतांनी मनसेला डिवचलं
दिल्लीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अनेक तास चर्चा झाली. या चर्चेंनंतर राज ठाकरे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे-अमित शाह भेटीवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला डिवचलं आहे. राऊतांनी राज ठाकरेंनी मोदींवर व्यंगात्मक टीका करणारी व्यंगचित्रे एक्सवर शेअर करत मनसेला चिमटा काढला आहे.
अप्रतिम!
अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great.
चित्रकार...सुप्रसिद्ध...
होऊ दे चर्चा!!! - 06:39 PM • 19 Mar 2024
'राज ठाकरे म्हणतील त्या जागेवर उभा रहाणार', बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले!
'राज ठाकरे आणि शाहांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. पुढील १ ते २ दिवसांत निर्णय घेणार आहोत. उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. राज ठाकरे म्हणतील त्या जागेवर उभा रहाणार.' असं आमदार बाळा नांदगावकर माध्यमांसमोर म्हणाले.
- 03:41 PM • 19 Mar 2024
'संपूर्ण मुंबईत भगवी गुढी उभारली जाणार'- आशिष शेलार
'महायुतीचा परिवार वाढतोय. महाविकास आघाडीला तडे जात आहेत. गुढीपाडव्याला मुंबई भगवीमय करणार. संपूर्ण मुंबईत भगवी गुढी उभारली जाणार.' असं आशिष शेलार म्हणाले.
- 02:14 PM • 19 Mar 2024
मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीनंतर खासदार राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले?
'मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदारांची आज 11 वाजता बैठक झाली. आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेची जागावाटपाची यादी येण्याची शक्यता आहे. महायुतीतील वातावरण खराब होणार नाही. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकणं हा मानस आहे. 1 किंवा 2 दिवसांत उमेदवारांसंदर्भात निर्णय होतील. प्रत्येकाचा सन्मान ठेऊन जागावाटप होईल. '
- 12:21 PM • 19 Mar 2024
राज ठाकरे अमित शाहांच्या घरी, दिल्लीत सध्या काय घडतंय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचले. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांची भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भेट घेतली. विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे हे अमित ठाकरे यांच्यासह अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये आता जागावाटप आणि महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा होणार असून, त्यानंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
- 11:52 AM • 19 Mar 2024
धडधड वाढली! शिवसेनेचे खासदार पोहोचले शिंदेंच्या घरी, कारण...
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार राहुल शेवाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाणे येथील निवासस्थानी पोहचलेत. राहुल शेवाळे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे देखील उपस्थित आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची यादी पुढील 24 तासात जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे आपला पत्ता कट होणार नाही ना, या धास्तीने शिवसेना खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्याची चर्चा आहे.
- 11:50 AM • 19 Mar 2024
"महाराष्ट्रद्रोही म्हणून...", राज ठाकरेंच्या मनसेवर संजय राऊतांचे टीकेचे बाण
राज ठाकरे यांची मनसे भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दल राऊत म्हणाले, "एमआयएमसारखे काही पक्ष महाराष्ट्रात असतील. ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसंदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी-शाहांना मदत करु इच्छित असतील, तर अशा सर्व नेत्यांची, पक्षांची भूमिका महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहीली जाईल", असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मनसे-भाजपच्या होऊ घातलेल्या युतीवर टीका केली.
"राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्र, मुंबईतील जनता सूज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्या... महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या अनेक शाह्यांचा जनतेने समाचार घेतलाय. महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या अशा शक्तींना कुणी मदत करत असेल, तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही", अशी टीका राऊत यांनी केली.
- 10:33 AM • 19 Mar 2024
'BJP ला गरज आहे म्हणून...', शरद पवार गटाकडून राज ठाकरेंना खुली ऑफर!
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. ते म्हणाले, 'राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. भाजपला आज गरज आहे, त्यामुळेच ते सर्वांना महत्त्व देत आहेत.'
'जेव्हा त्यांची गरज संपेल तेव्हा ते बाजूला करतील. हे लक्षात घेऊन राज ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीत सामील होऊन महाराष्ट्र धर्म पाळण्याचा प्रयत्न करावा.'
रोहित पवार पुढे म्हणाले, 'उत्तर आणि दक्षिण भारतात एक राज्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो. जी संतांची भूमी आहे. एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या विचारांनी प्रेरित. इथे जनता आपल्यासोबत नाही, अशी भाजपची भावना आहे. त्यामुळे भाजपला आता सर्व लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मतांचे विभाजन करायचे आहे. सर्व पक्षांना एकत्र करणे शक्य असेल तर ते करू. 2019 मध्ये ज्या पक्षांना महत्त्व दिलं गेलं नाही अशा सर्वच पक्षांना महत्त्व दिलं जात आहे.'
- 09:59 AM • 19 Mar 2024
राज ठाकरे दिल्लीला का गेले?
मनसेचे नेते राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबद्दल सांगताना म्हणाले, "राज ठाकरे दिल्लीला का गेलेत हे काही तासात स्पष्ट होईल. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा, पक्षाच्या हिताचा असेल. बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत खासदार म्हणून गेलेत, तर आम्हाला आनंद होईल. राज ठाकरे आम्हाला जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू. कधी यश आलं, अपयश आलं, पण महाराष्ट्र सैनिक खचून गेलेले नाहीत."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT