Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंचा भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा
Lok Sabha election Maharashtra Live Update : लोकसभा निवडणुकीमुळे यावेळी गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या उत्साहाला राजकीय रंग आला आहे. राजकीय पक्षाकडून शोभयात्रांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे... राज्यातील लोकसभा निवडणुकीबद्दलचे अपडेट्स आणि इतर घडामोडींबद्दल वाचा 'मुंबई Tak लाईव्ह अपडेट्स
ADVERTISEMENT
Lok Sabha election 2024 Maharashtra live Update : लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराचा पारा वाढला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे. तर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे... राज्यातील राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलत असून, या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स वाचा... (Maharashtra Politics latest News)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 09:00 PM • 09 Apr 2024
राज ठाकरेंच्या निर्णयाच देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक
- 08:49 PM • 09 Apr 2024
राज ठाकरेंचा भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा
मला त्या राज्यसभा नको आणि त्या विधानसभाही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडुन माझी अपेक्षा आहे. त्याही पुर्ण झाल्या नाहीत, तर राज ठाकरेंचं तोंड आहेत. मला काहीही अपेक्षा नाहीत. मला काहीही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना राष्ट्रवादीला फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. आणि विधानसभेच्या तयारीला लागा.
- 08:33 PM • 09 Apr 2024
शिंदे-फडणवीस बोलले एकत्र आले पाहिजे
वर्ष दीड वर्ष आपण बोलतो आहोत, आपण एकत्र आलो आहोत. मला एकनाथ शिंदे, देंवेंद्र फडणवीस बोलत होते, एकत्र आले पाहिजे. पण एकत्र आले पाहिजे म्हणजे काय? मग मी अमित शाहांना फोन केला. मग आमचं बोलण झालं. मग मी महाराष्ट्रात नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर निषाणीवर प्रकरण आलं.
मग लगेच सुरू आहे. लाव रे तो व्हिडिओचं काय होणार? 1989 च्या आसपास भाजप शिवसेनेची युती झाली. ती युती झाल्यावर माझे सर्वांधिक संबंध भाजपसोबत आले. यांच्यासोबतचे संबंध राजकारणापलिकडचे होते. माझा संबंध काँग्रेस, राष्ट्रवादीशी आल्या नाही. काँग्रेससोबत भेटी होत्या पण गाठी पडल्या भापजसोबत...त्यामुळे चांगले संबंध प्रस्थापित झाले.
मी गुजरातला गेल्यावर नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणार मी पहिला माणूस होतो. - 08:24 PM • 09 Apr 2024
मला सांगितलं आमच्या चिन्हावर लढा
मी 1995 साली शेवटचं जागावाटपाला बसलो होतो. त्याच्यानंतर जागावाटपाच्या चर्चेला बसलोच नाही. दोन तु घे, दोन त्याला दे... पण हे मला जमणार नाही.
मला सांगितलं आमच्या चिन्हावर लढा. हे रेल्वे इंजिन तुमच्या कष्टाने कमावलेले चिन्ह् आहे. माझ्याकडे आयतं आलं नाही. चिन्हावरती तडजोड होणार नाही. - 08:14 PM • 09 Apr 2024
अमित शाहांच्या भेटीवर काय म्हणाले?
सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
अमित शाहांच्या भेटीनंतर जे काय सुरु झालं...राजकारण्यांना न विचारता दे ठोकून बातमी.
अमित शाहांना दिल्लीला भेटायला गेलो. तिकडे तुम्हाला कुठून कळलं... राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या दुसऱ्या दिवशी भेट होती.
माझ्याकडे सांगण्यासारखं नव्हत म्हणून मी काही बोललो नाही. जरं आमचं काय ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करेन आणि सांगेन..अशा गोष्टी ठरल्या आहेत.
मग काही नाही भेटलं तर राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... अरे व्हायचं असतं तर तेव्हाच नाही झालो असतो.मी जे अपत्य जन्माला घातलंय याचाच मी अध्यक्ष राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर हा पक्ष उभा केला आहे, त्याला 18 वर्ष झाली आहे. पण अशी गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही.
- 08:09 PM • 09 Apr 2024
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
असं वाटतंय सभा शिमल्याला आहे.
जवळपास पाच वर्षानंतर निवडणूका होतायत.
2019 नंतर आज 2024 ला निवडणूका होतायत.
डॉक्टर नर्सेसला निवडणूकीची जबाबदारी दिली आहे.
डॉक्टर काय मतदारांची नाडी मोजणार काय? आणि नर्सेस काय डायपर बदलणार का? - 07:22 PM • 09 Apr 2024
महायुतीत मनसेचा समावेश होणार? राज ठाकरे काय बोलणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. थोड्याच वेळात आता राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात होणार आहे.
- 05:03 PM • 09 Apr 2024
सुधीर मुनगंटीवारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, प्रकरण काय?
राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध जालन्यातल्या जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मुनगंटीवारांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
08 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चंद्रपुर लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. सदरच्या प्रचार सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर सभेमध्ये जवळपास 25 ते 30 हजार लोकांसमक्ष ज्यामध्ये 10 ते 15 हजार महिला सुध्दा हजर होत्या. त्या प्रचार सभेत बोलतांना बहिण भावाच्या पवित्र नात्याविषयी व काँग्रेस पक्षाविषयी मुनगंटीवार यांनी अपशब्द काढलेत.
"अरे सख्या भावाला सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपविणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करणारे काँग्रेस वाले" असे अपशब्द काढून बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याची कृती तसेच काँग्रेस पक्षा विषयी अतिशय चुकीची भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली होती. या वक्तव्यामुळे भारतातील सर्वच बहिण भावाचा घोर अपमान त्यांच्या या वाक्याने झालेला आहे.
राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर चे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी सुरेश गवळी यांनी मुनगंटीवार यांच्या विरुद्ध कलम 294 अन्वये कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केलीय.
- 03:55 PM • 09 Apr 2024
Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार,असे सांगितले जात आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार याची उत्सुकता होती.
आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा लोकसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना तिकीट दिले जाणार आहे. त्यांचे निश्चित झाले असून घोषणेची औपचारिकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- 01:53 PM • 09 Apr 2024
BRS नेत्या के. कविता यांच्या कोठडीत वाढ
बीआरएसच्या नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीनं अटक केली असून न्यायालयीन कोठडीत आहेत.
- 01:05 PM • 09 Apr 2024
सांगली लोकसभेचा तिढा सुटला
सांगली लोकसभेचा तिढा सुटला. शिवसेना ठाकरे गटाकडेच सांगलीची जागा असेल. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील. शिवसेनेचे उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉटरीचेबल झाले आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि आमदार विक्रम सावंत संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. तर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
- 12:56 PM • 09 Apr 2024
'सूर्यग्रहण, अमावस्या आणि यांची सभा'; उद्धव ठाकरेंचे मोदींवर टीकास्त्र!
चंद्रपूरमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'सूर्यग्रहण, अमावस्या आणि यांची सभा' अशा शब्दांत त्यांनी टीका केली. 'कालचं भाषण हे कमळाबाईचं भाषण होतं, पंतप्रधानांचं भाषण नव्हतं. भेकड पार्टीचे भाषण होतं. पंतप्रधानपदाचा आम्ही अवमान करणार नाही. आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे खंडणीखोर आहेत,' अशा शब्दांत ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला.
- 12:41 PM • 09 Apr 2024
Maha Vikas Aghadi : उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलले?
- देशातील जनतेला हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि हुकूमशाही नष्ट करण्याचं जावो, ह्याच पाडव्याच्या शुभेच्छा!
- आपण कोणासाठी आणि कशासाठी लढतोय, हा विचार करून जिंकण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे वाटचाल करतोय.
- एकही जागा न मागता आमच्या सहकाऱ्यांनी आमच्या संविधान रक्षणाच्या लढ्यात आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
- काल सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींची सभा; हा विचित्र योग पहिल्यांदा देशात आला.
- एकाच पक्षाचा विचार जर देशाचे पंतप्रधान करायला लागले; तर घटनेवर हात ठेवून आम्ही जी शपथ घेतो, त्या घटनेचा भंग होईल.
- भाजप भेकड, भाकड, भ्रष्ट आणि ठिगळांचा पक्ष झालाय. भाजप हा खंडणीखोर पक्ष आहे! भाजपला शिवसेना गुजरातला पळवून न्यायची होती, ती मी पळवू दिली नाही.
- आम्ही ह्यापुढे जी उत्तर देऊ ती माननीय पंतप्रधानांना दिलीत, असं कुणी समजू नये; देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडून होणं शक्य नाही.
- महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातील जनतेला असली सेना आणि नकली सेना शिकवायचं, म्हणजे कहर झाला.
- आता भाजपसोबत जो चायनीज माल आहे, त्यात सुख माना. तुमचं सुख तुम्हाला लख लाभ असो! नकली सेना म्हणणाऱ्यांनी तुमचा इतिहास तपासून पहा. तुमचेच तत्कालीन अध्यक्ष त्यावेळी मातोश्रीवर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला लोटांगण घालायला आले होते. - 12:20 PM • 09 Apr 2024
MVA Lok Sabha seats Sharing : महाविकास आघाडी लोकसभा जागावाटप
काँग्रेस - 17
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार)- 10
शिवसेना (ठाकरे गुट) - 21
काँग्रेस - 17
नंदुरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा गोंदिया
गडचिरोली चिमूर
चंद्रपूर
नांदेड
जालना
मुंबई उत्तर मध्य
पुणे
लातूर
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
मुंबई उत्तरएनसीपी शरद पवार - 10
बारामती
शिरूर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
अहमदनगर दक्षिण
बीडशिवसेना ठाकरे - 21
जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशिव
रत्नागिरी
बुलढाणा
हातकणंगले
संभाजी नगर
शिर्डी
सांगली
हिंगोली
यवतमाळ
वाशीम
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई उत्तर पक्ष्चिम
मुंबई दक्षिण
मुंबई ईशान्य - 11:47 AM • 09 Apr 2024
Lok Sabha election 2024 : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू.
- 08:58 AM • 09 Apr 2024
आमचे 48 उमेदवार कोण, हे जाहीर करणार -शरद पवार
बारामती येथे नागरिकांशी संवाद साधताना शरद पवारांनी जागावाटपाच्या घोषणेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, "या निवडणुकीसाठी आम्ही ३-४ पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी महाराष्ट्र तरी योग्य रस्त्यावर आपण आणू, आणि माझी खात्री आहे की ते आणतायेत."
"आज तुमच्या पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस असेल, कॉंग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असेल, इतर मित्र पक्ष असतील या सगळ्यांनी मिळून निवडणूक एकत्र लढवायचा निकाल घेतला. सगळ्या विषयात आमचं एकमत झालं आहे."
"उद्या मी मुंबईला जाऊन मी कॉंग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते सबंध महाराष्ट्राला ४८ लोकांची यादी आमचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करणार आहे. आणि ते एक मताने कसलेही मतभेद न ठेवता एका विचाराने आम्ही जाहीर करणार आहोत", असे पवार सोमवारी (9 मार्च) रोजी म्हणाले.
- 08:43 AM • 09 Apr 2024
Lok Sabha election 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं? आज घोषणा
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा महाविकास आघाडीत सुटला आहे. सांगली आणि भिवंडीवरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू होती. त्यावर तोडगा निघाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २२, काँग्रेस १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार १० जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मुंबईतील दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेने अजून जाहीर केलेल्या नाहीत. या जागा काँग्रेसला दिल्यास ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला २१ तर काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा येतील.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सांगली आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल करण्याचीही माहिती आहे. सांगली देऊन जालन्याची जागा ठाकरेंच्या सेनेला द्यायची असे भूमिका काँग्रेसची असल्याचे समजते. याचे उत्तरही आज मिळणार आहे.
महाविकास आघाडीची सकाळी ११ वाजता मुंबईतील शिवालय येथे पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT