Lok Sabha Election 2024 : राम सातपुतेंना मराठा आंदोलकांनी प्रचारापासून रोखले...
Lok Sabha election Maharashtra Live Latest Update : लोकसभा निवडणुकीमुळे देशाबरोबर महाराष्ट्रही ढवळून निघाला आहे. सर्वच मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास अशीच सरळ लढत होताना दिसत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीबद्दलचे अपडेट्स आणि इतर घडामोडींबद्दल वाचा 'मुंबई Tak लाईव्ह अपडेट्स
ADVERTISEMENT
Lok Sabha election Maharashtra live Update : उन्हाच्या झळांबरोबर राज्यातील राजकारणही तापू लागले आहे. लोकसभेच्या प्रचाराचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. दुसरीकडे अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे. क्षणाक्षणाला राज्यातील समीकरणे बदलत आहेत... या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी... (Maharashtra Politics latest Live News)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 09:09 PM • 08 Apr 2024
राम सातपुतेंना मराठा आंदोलकांनी प्रचारापासून रोखले...
मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे सोमवारी प्रचारासाठी आलेले भाजपचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना मराठा आंदोलकांनी रोखल्यामुळे प्रचाराचा शुभारंभ न करताच त्यांना परत जावे लागले.
यावेळी मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणेसह विविध घोषणा दिल्या.यामुळे आमदार राम सातपुते यांना आल्यापावली माघारी फिरावे लागले.
- 08:03 PM • 08 Apr 2024
अमोल कीर्तिकरांची जवळपास साडे 7 तास ईडी चौकशी
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने अमोल कीर्तिकरांना चौकशीला बोलावले होते. यावेळी तब्बल साडे सात तास ईडीने त्याची चौकशी केली होती. या चौकशीनंतर आता त्यांना सोडण्यात आले आहे.
- 05:57 PM • 08 Apr 2024
'कडू कारले..', पंतप्रधान मोदींचा मराठीतून काँग्रेसवर निशाणा!
नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरूवात केली आहे. देशात गरमीचा पारा वाढतोय, आणि राजकीय वातावरणही तापतंय. पण तुमच्या उत्साह आणि जोशमध्ये काहीच कमी नाही आहे, असे मोदींनी कार्यकर्त्यांना म्हटलं.
राम मंदिर निर्माणासाठी चंद्रपुरने लाकडे पाठवली. नवीन संसद बनवण्यासाठी देखील चंद्रपुरच्या लाकडाचा वापर झाला असल्याचे मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुढीपाडव्याच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात स्थिरता विरूद्ध अस्थिरता अशी लढत असणार आहे.
जिकडेही सत्ता मिळाली की मलाई खावी अशी टीका देखील काँग्रेसवर केली होती. तसेच इंडी आघाडीने देशाला अस्थिरतेकडे पाठवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून काँग्रेसवर टीका केली आहे. ' कडू कारले, तूपात तळले, साखरेत घोळले.. कडू ते कडूच' असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
- 05:45 PM • 08 Apr 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चंद्रपुरातून लाइव्ह भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेत मराठीतून सुरुवात केली. मोदी यांनी यावेळेस फिर एक बार मोदी सरकार; चंद्रपुरकरांनी मन बनवलं आहे, असं म्हटलं. तसेच चंद्रपुरातील लाकडांचा वापर करुन राम मंदिर बनववल्याचा उल्लेख केला. तसेच मोदींनी गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या.
- 05:43 PM • 08 Apr 2024
Eknath Shinde : त्यांना समान नागरी कायदा नकोय, समलिंगी संबंध हवेत -CM शिंदे
चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "त्यांनी जाहीरनामा दिलाय, पण आपण त्यांना ५० वर्षांचा हिशोब मागितला पाहिजे. त्यांना जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही. त्यांनी खरंतर माफीनामा जाहीर करायला पाहिजे होता."
"मोदींमुळे करोडो रामभक्तांचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. मोदी है तो सब मुमकिन है असं काम ते करत आहेत. आपल्या सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे."
"त्यांच्याकडे करप्शन फर्स्ट, तर आपल्याकडे नेशन फर्स्टचा अजेंडा आहे. देशाला महासत्ता करण्याचा अजेंडा आपल्याकडे आहे. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना समान नागरी कायदा नको, त्यांना समलिंगी संबंध हवेत, अशा प्रकारचे बोगस लोक आपल्या समोर उभे आहेत. त्यांना चारीमुंड्या चीत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे", असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.
- 05:17 PM • 08 Apr 2024
'मविआत कोणतेही मतभेद नाहीत'- संजय राऊत
'मविआत कोणतेही मतभेद नाहीत. जागा सोडल्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी जाहीर विधानं केली नाहीत. जागा सोडल्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी जाहीर विधानं केली नाहीत. उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद आहे. सांगलीत कोणताही वाद नाही. निरूपमांना काहीही बोलू द्या, त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही.' संजय राऊत असं पत्रकार परिषदेत म्हणाले.
- 05:05 PM • 08 Apr 2024
Beed Lok Sabha election : 'वंचित बहुजन आघाडीची ऑफर ज्योती मेटेंनी नाकारली'
बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांना उमेदवारी दिली आहे. वंचितकडून तिकीट मिळाल्यानंतर अशोक हिंगे यांनी शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांच्याबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने ज्योती मेटे यांना ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ती ऑफर नाकारल्यामुळे आम्ही उमेदवार जाहीर केला, अशी माहिती हिंगे यांनी दिली.
- 01:22 PM • 08 Apr 2024
Baramati Lok Sabha election 2024 : घाबरू नका, त्यांना त्या खर्चीवर बसवणारा मी आहे -शरद पवार
सुपे येथे भाषण आटोपल्यानंतर शरद पवार निघत होते. इतक्यात त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. ती वाचल्यावर शरद पवार म्हणाले, "माझ्याकडे एक चिठ्ठी आली आहे. त्यात असं आहे की, 'तुम्हाला जनाई योजनेचं पाणी हवं असेल, तर घड्याळाला मतदान करा. नाहीतर तुम्हाला पाणी मिळणार नाही. कारखान्याला ऊस पाहिजे असेल, द्यायचा असेल, तर तुम्ही घड्याळाचा निकाल घ्या नाहीतर गावातील विकासकामे बंद होतील, असा दबाव आमच्यावर येतो.' चिठ्ठी वाचून दाखवल्यानंतर पवार म्हणाले दबावाला घाबरायचं नाही. तुम्हाला मी सांगतो की, कुणीही दबाव दिला तरी घाबरायचं नाही. असं आहे की, जे दबाव देत आहेत. त्यांना माहिती नाही की, त्यांना त्या जागेवर कुणी बसवलं आहे. तो बसवणारा मी आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका", असे पवार यावेळी म्हणाले.
- 12:24 PM • 08 Apr 2024
संजय निरूपम यांचे खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांवर गंभीर आरोप!
'संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावावर पैसे घेतले. खिचडी चोरांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. राऊतांनी मुलीच्या नावाने चेकद्वारे लाच घेतली. राऊतांच्या कुटुंबाने एकूण 1 कोटींची दलाली घेतली. लोकांना खायला मिळत नव्हतं तेव्हा ठाकरे गटाने घोटाळा केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खिचडी घोटाळा झाला आहे. अमोल कीर्तिकरच नव्हे तर राऊतही खिचडी चोर, हा घोटाळा रह्याद्री रिफ्रेशमेंट नावाच्या कंपनीद्वारे झाला आहे. ' असे गंभीर आरोप संजय निरूपम यांनी राऊतांवर केले आहेत.
- 11:43 AM • 08 Apr 2024
'उद्या कदाचित आम्हाला उमेदवारी जाहीर होईल'- विशाल पाटील
'सांगलीतून आम्ही लढणार असं आधीच ठरवलं होतं. या जागेवर लडण्यासाठी आम्ही ठाम आहोत. गेल्या २ महिन्यात अनेक घडामोडी घडल्या. सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा अजूनह संयम आहे. संजय राऊतांसाठी आमच्या मनात आदर आहे. पण, ते सांगलीत येऊन विरोधात बोलले याची मनात खंत आहे. विश्वजीत कदम आमच्या सर्वांसाठी लढत आहेत. ते फुटणार असं बोलणं योग्य नाही. सांगलीची लढाई विश्वजीत कदम यांची एकट्याची नव्हती. उद्या कदाचित या जागेवर आम्हाला उमेदवारी जाहीर होईल', असं विशाल पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.
- 11:15 AM • 08 Apr 2024
PM Modi Rally : पंतप्रधान मोदींची आज महाराष्ट्रात पहिली प्रचार सभा
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा होत आहे. पहिली प्रचारसभा सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात होत असून, याबद्दल मोदींनीही ट्विट करत माहिती दिली आहे.
"महाराष्ट्रातील जनमानसाने लोकसभा निवडणुकीत भाजपा - एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचा महाप्रण केला आहे. चंद्रपुरात आज संध्याकाळी ५ वाजता आपल्या प्रियजनांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळणार आहे", असे मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- 10:24 AM • 08 Apr 2024
'योगींनी यूपीत थांबंलं पाहिजे...', संजय राऊतांचा टोला!
'योगींनी यूपीत थांबंलं पाहिजे, तिथे परिस्थिती गंभीर आहे. योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांनी टोला लगावला. 10 वर्षानंतरही भाजपला मतं मागण्यासाठी भटकावं लागतंय. मविआत कोणतेही वाद नाहीत, उद्या एकत्र पत्रकार परिषद होईल. पटोले, थोरात काही बोलत असतील तर त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मविआत कुणीही टोकाची भूमिका घेत नाही.' असं संजय राऊत म्हणाले.
- 09:51 AM • 08 Apr 2024
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची उद्या घोषणा?
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याचे दिसत आहे. उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, त्यात जागावाटपाची घोषणा होईल, असे कळते. महत्त्वाचे म्हणजे सांगलीची जागा कुणाला मिळणार, याचेही उत्तरही या पत्रकार परिषदेतून मिळेल.
- 09:33 AM • 08 Apr 2024
Kalyan Lok Sabha election 2024 : 'गद्दारांना मदत करणार नाही', मनसे आमदार राजू पाटील
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण लोकसभा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला. त्यावर राजू पाटलांनी नकार दिला.
आमदार राजू पाटील म्हणाले की, "बघा. सध्या इथे आमचा उमेदवार नाही. काय करायचं आहे, त्याबद्दल राज ठाकरे यांचे आदेश नाहीत. त्यामुळे इथे कुणाच्या पाठी जायचं, याबद्दल आमचं काही ठरलेलं नाही. परंतु एक नक्की की, ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली. त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही. आमच्या भावना राज ठाकरेंना आम्ही पोहोचवू. हा पुढचा विषय आहे. पण, आमच्या भावनांपेक्षा आमच्या साहेबांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे", अशी भूमिका आमदार राजू पाटील यांनी मांडली.
- 08:12 AM • 08 Apr 2024
Lok Sabha election 2024 : 'विरोधकांचे पैसे घ्या अन् मतदान मविआला करा', वाघेरे काय म्हणाले?
प्रचार सभेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे म्हणाले, "मला असं वाटतं की, निवडणूक लोकांनी ताब्यात घेतलेली आहे. मावळ तालुक्यात सर्वसामान्य म्हणताहेत की यांना धडा शिकवायचा आहे. गद्दारांना गाडायचं आहे. अशा पद्धतीची भूमिका सर्वसामान्य नागरिकांची आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होत आहे."
"मी तर सगळ्यांना सांगेन की, जे काही ते पैसे वाटताहेत ना, ते सगळे पैसे आपण घ्यावेत आणि मतदान मात्र आपल्या महाविकास आघाडीला करायचं, अशी भूमिका घेतली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातून आम्ही किमान अडीच ते तीन लाखांची आघाडी घेऊ असा विश्वास आम्हाला आहे", असे संजोग वाघेरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT