लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : विशाल अग्रवालच्या नातेवाईकाची पत्रकारांसोबत बाचाबाची

मुंबई तक

ADVERTISEMENT

vishal agarwal, pune accident
पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याच्या नातेवाईकांनी पत्रकारांसोबत अरेरावी केल्याची घटना घडली आहे.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झालं असलं, तरी राजकीय धुळवड सुरूच आहे. महायुतीमध्ये सुरूवातीपासून असलेल्या धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली असून, नेतेच आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. 

ADVERTISEMENT

महायुतीच्या उमेदवारांना मित्रपक्षाकडून मदत न झाल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे निकालापूर्वी ही नाराजी वाढणार की कमी होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. 

सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असून, आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान झाले आहे. तर सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी मतदान बाकी आहे. सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी मतदान होणार असून, सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.

सहाव्या आणि सातव्या टप्प्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघातील प्रचार जोरात सुरू आहे. 

महाराष्ट्र आणि देशभरातील ताज्या घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीबद्दलचे लाईव्ह अपडेट्स वाचा....

ADVERTISEMENT

  • 08:12 PM • 23 May 2024

    विशाल अग्रवालच्या नातेवाईकांनी पत्रकारांसोबत बाचाबाची

    पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याच्या नातेवाईकांनी पत्रकारांसोबत अरेरावी केल्याची घटना घडली आहे. अग्रवालचे नातेवाईक पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आले होते. त्यावेळी अग्रवालच्या नातेवाईकांनी पत्रकारांना चित्रीकरण करण्यास अडवत त्याच्यासोबत अरेरावी केली होती. त्यानंतर पत्रकार आणि नातेवाईकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. 

    पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलीस सध्या अग्रवाल यांच्या नातेवाईकांची चौकशी करते आहे. आज सुद्धा अशाच चौकशीसाठी अग्रवाल यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी अनेक पत्रकार त्यांचे चित्रीकरण करत असताना नातेवाईकाने थेट पत्रकाराच्या मोबाईवरच हात घातला आणि दमदाटी केली. या दमदाटीनंतर पत्रकार आणि नातेवाईकामध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे. 

  • 06:22 PM • 23 May 2024

    डोंबिवली स्फोटाच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

     

  • 05:17 PM • 23 May 2024

    Maharashtra News : महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

     

    दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज तर कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या (२४) रोजी तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

     

  • 04:31 PM • 23 May 2024

    डोंबिवलीत झालेल्या बॉयलरच्या स्फोटात चौघांचा होरपळून मृत्यू

    डोंबिवलीत गुरुवारी (23 मे) एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज 2 मधील एका कारखान्यात हा अपघात झाला असून आगीच्या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळाचे अनेक फोटो-व्हिडीओही व्हायरल होत आहेत. पण, या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, हा आकडा आणखी वाढू शकतो.

  • ADVERTISEMENT

  • 01:21 PM • 23 May 2024

    Maharashtra News : "पुण्याला गर्दुल्ल्यांचे माहेरघर करू नका", दानवे भडकले

    पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. यावरून आता राजकारण तापलं असून, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोट ठेवत लक्ष्य केलं आहे. 

    दानवे म्हणाले की, "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत ठासून सांगतात की, पुणे प्रकरणात पोलिसांनी पहिल्यापासून कलम ३०४ लावले. मग एफआयआरमध्ये ३०४ हे कलम कुठे आहे, हे सांगा?", असा सवाल त्यांनी पुणे पोलिसांना केला आहे.

     

    "पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील ३०४ लावल्याची वकिली करत आहेत, मग ते एफआयारवर का अवतरले नाही? एफआयआरमध्ये हे कलम कुठे आहे, याचं उत्तर त्यांनीही द्यावं. कोणाची बाजू लावून धरत आहात, हे जरा पहा. चुकीची पाठराखण करून पुण्याला 'गर्दुल्ल्यांचे माहेरघर' करू नका", असे म्हणत दानवे यांनी मोहोळ यांनाही सुनावले आहे.

  • 12:15 PM • 23 May 2024

    Maharashtra Lok Sabha Election Live : "बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे जिंकणार"

    महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात थेट लढत असून, काही ठिकाणी अपक्षांमुळे निकाल फिरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेत. 

    महाराष्ट्रातील काही मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती होत असून, यात बारामती, बीडचाही समावेश आहे. याच मतदारसंघाबद्दल महायुतीतीचे नेते आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी मोठं भाकित केले आहे. 

    महादेव जानकर यांनी असा दावा केला आहे की, यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार विजयी होतील. 

    "मी ५५ प्रचार सभा लोकसभा निवडणुकीत घेतल्या आहेत. मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसली. पण, महायुतीच्या ४२ जागा येतील", असा दावा महादेव जानकर यांनी केला. 

    पुढे ते म्हणाले की, "बीडमध्ये पंकजा मुंडे, परभणीत मी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडून येतील", असा दावा जानकर यांनी केला आहे.

  • ADVERTISEMENT

  • 11:26 AM • 23 May 2024

    Lok Sabha election updates : 'आचार संहित शिथील करा', शिंदे सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

    महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान झाले आहे. दुसरीकडे राज्यात पाण्याचा प्रश्न बिकट बनला असून, अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

    राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर असल्याकडे राज्य सरकारने निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथील करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. 

    महाराष्ट्रातील शेवटच्या ५ व्या टप्पाच मतदान संपून दोन दिवस झाले. लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाय योजना राबवण्याला गती मिळू शकते.

    याबाबत आज निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. 

    आज दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे.या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परीस्थितीची आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. 

    या बैठकीत दुष्काळसदृष्य परीस्थितीचा आढावा घेऊन… तात्काळ मदत कशी आणि कोणती करावी याचं देखील नियोजन करण्यात येणार आहे. 

    जनावरांना लागणारा चारा पुरवठ्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

  • 10:00 AM • 23 May 2024

    Maharashtra News Live : मतदान का केले नाही? भाजपचे जयंत सिन्हांनी पक्षाला दिले उत्तर

    झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

    हजारीबाग मतदारसंघातून मनीष जैस्वाल यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर तुम्ही ना निवडणूक प्रचारात रस घेत आहात, ना तुम्ही मतदान केले, असे पक्षाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते. 

    भाजपने जयंत सिन्हा यांना या नोटिशीला दोन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. या नोटिशीला माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी उत्तर दिले आहे.

    त्यांनी म्हटले आहे की, "लोकसभा अध्यक्षांना माहिती दिल्यानंतर ते वैयक्तिक खासगी कामासाठी 10 मे रोजी परदेशात गेलो होतो. पक्ष मला कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रित करत नव्हता, त्यानंतर मला तिथे राहण्याची विशेष गरज वाटली नाही."

    मतदान न केल्याच्या मुद्द्यावर जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे की, "परदेशात जाण्यापूर्वी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले आहे, त्यामुळे त्यांनी मतदानाचे कर्तव्य बजावले नाही, असा आरोप करणे चुकीचे आहे. पक्षासोबतचा आपला २५ वर्षांचा प्रवास आहे. मी प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली आहे. हे सर्व पाहता आपण हे पत्र जाहीरपणे प्रसिद्ध करणे अयोग्य आहे", अशी नाराजी सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.

  • 09:53 AM • 23 May 2024

    Gajanan Kirtikar News : गजानन कीर्तिकरांबद्दल शिवसेनेचे नेते नाराज

    अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्याबद्दल शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानाचे पक्षात आणि महायुतीत तीव्र पडसाद उमटले आहेत. 

    अमोल डायरेक्ट खासदार होणार, रवींद्र वायकर यांनी तुरुंगात जाणे टाळण्यासाठी उमेदवारी घेतली, अशी विधाने गजानन कीर्तिकर यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीनेही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

    यानंतर शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले. गजानन कीर्तिकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

    त्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, शिवसेनेच्या शिस्तभंग समितीकडे गजानन कीर्तिकर यांची तक्रार करण्यात आली आहे. शिस्तभंग समिती गजानन कीर्तिकर यांच्यावर काय कारवाई करणार हे महत्त्वाचं असलं, तरी हकालपट्टी करण्याची मागणी होणार का? हे बघावं लागेल.

follow whatsapp

ADVERTISEMENT