लाइव्ह

Maharashtra Lok Sabha election Live : 'ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी...', आशिष शेलारांची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeray,Ashish shelar
उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान अजून व्हायचं आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढू लागली आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील ४८ जागांबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असून, महाविकास आघाडी आणि महायुतीत कोण सर्वाधिक जागा जिंकणार याबद्दल राजकीय विश्लेषकांची वेगवेगळी मते आहेत.

दुसरीकडे महायुतीचे नेते ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे दावे करत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेतेही ३० ते ३५ जागा जिंकणार असल्याचे म्हणत आहेत. 

सहाव्या टप्प्यासाठी २५ मे म्हणजे, आज मतदान होत असून, ५८ लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्याचबरोबर सातव्या टप्प्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा पाराही वाढला आहे.

 वाचा लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रातील घडामोडी आणि राजकीय घटनांचे लाईव्ह अपडेट्स... (Lok Sabha election 2024)

ADVERTISEMENT

  • 09:12 PM • 25 May 2024

    'ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी...', आशिष शेलारांची टीका

    शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांची काळजी घेतली. यापुर्वी उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करत होते, अशी टीका आशिष शेलारांनी केली.मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का? असा खोचक सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.

  • 07:21 PM • 25 May 2024

    Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय झालेले मतदान -  

    पहिल्या टप्प्यातील एकूण मतदान - 63.71% 

    भंडारा -गोंदिया - 67.04%
    चंद्रपूर - 67.55%
    गडचिरोली-चिमूर - 71.88%
    नागपूर - 54.32%
    रामटेक - 61.01%

    दुसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान - 62.71%

    अमरावती - 63.67%
    नांदेड - 60.94%
    यवतमाळ वाशिम - 62.87%
    अकोला - 61.79%
    बुलढाणा - 62.03%
    हिंगोली - 63.54%
    परभणी - 62.26%
    वर्धा - 64.85%

    तिसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान - 63.55%

    लातूर - 62.59%
    बारामती - 59.50%
    कोल्हापूर - 71.59%
    रायगड - 60.51%
    उस्मानाबाद - 63.88%
    सांगली - 62.27%
    सातारा - 63.16%
    हातकणंगले - 71.11%
    सोलापूर - 59.19%
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 62.52%
    माढा - 63.65%

    चौथ्या टप्प्यातील एकूण मतदान - 62.21%

    बीड - 70.92%
    जालना - 69.18%
    छ. संभाजीनगर - 63.03%
    पुणे - 53.54%
    मावळ -54.87%
    शिरूर- 54.16%
    अहमदनगर - 66.61%
    जळगाव - 58.47%
    नंदूरबार - 70.68%
    रावेर - 64.28%
    शिर्डी - 63.03%

    पाचव्या टप्प्यातील एकूण मतदान - 56.89%

    धुळे - 60.21%
    दिंडोरी - 66.75%
    नाशिक - 60.75%
    पालघर - 63.91%
    भिवंडी - 59.89%
    कल्याण - 50.12%
    ठाणे - 52.09%
    मुंबई उत्तर - 57.02%
    मुंबई उत्तर-पश्चिम - 54.84%
    मुंबई उत्तर-पूर्व - 56.37%
    मुंबई उत्तर-मध्य - 51.98%
    मुंबई दक्षिण-मध्य - 53.60%
    मुंबई दक्षिण - 50.06%

     

     

  • 02:31 PM • 25 May 2024

    Maharashtr News Live : वेदांत अगरवाल व्हायरल रील प्रकरणी मोठी अपडेट

    वेदांत अगरवाल व्हायरल रील प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या दिसण्याचे साधर्म्य ठेऊन अश्लील रील केल्याप्रकरणी आणि ते प्रसारित केल्याप्रकरणी करणाऱ्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात २९४ बी ,५०१,६७ आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

  • 01:37 PM • 25 May 2024

    Maharashtr News Live : 10वी चा निकाल कसा आणि कुठे पाहता येणार?

    • mahahsscboard.in, mahresult.nic.in, sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येईल.
    • वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
    • लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. 
    • यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आणि रिझल्ट पाहा.
    • ज्यांना ऑफलाइन निकाल बघायचा असेल ते SMS च्या माध्यमातून निकाल पाहू शकतात.
    • यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जावून यात MH10 लिहून पुढे तुमचा रोल नंबर टाका.
    • हा मॅसेज तुम्हाला 57766 वर पाठवायचा आहे. हा एसएमएस पाठवल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला SMS केला जाईल.
     
  • ADVERTISEMENT

  • 01:17 PM • 25 May 2024

    Maharashtr News Live : अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेला लागणार 10वीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी अपडेट आले आहे. 'मे'च्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आली आहे. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.

  • 12:29 PM • 25 May 2024

    Lok Sabha Election Live : सहाव्या टप्प्यात पहिल्या चार तासात किती झालं मतदान?

    लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होत आहे. 

    दिल्लीतील 7, उत्तर प्रदेशातील 14, बिहारमधील 8, पश्चिम बंगालमधील 8, हरियाणातील 10, झारखंडमधील 4, ओडिशातील 6 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान होत आहे.

    लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात 62.2 टक्के मतदान झाले. आतापर्यंत 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 428 जागांवर पाच टप्प्यात मतदान झाले आहे. 

    आज सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार असून त्यानंतर ४ जूनला निकाल लागणार आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.76 टक्के मतदान झाले आहे

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत 25.76 टक्के मतदान झाले. सकाळी 11 वाजेपर्यंत बिहारमध्ये 23.67, हरयाणामध्ये 22.09, जम्मू काश्मिरमध्ये 23.11, झारखंडमध्ये 27.80, दिल्लीत 21.69, ओडिशामध्ये 21.30, उत्तर प्रदेशमध्ये 27.06 आणि पश्चिम बंगालमध्ये 36.88 मतदान झाले.

  • ADVERTISEMENT

  • 12:14 PM • 25 May 2024

    Sindhudurga News: सिंधुदुर्गात बोट दुर्घटनेतील 4 बेपत्ता खलाशांचे सापडले मृतदेह

    वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट पलटी झाली होती. या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह आता सापडले आहेत. काल दोन तर आज दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेल्या चार पैकी तीन मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी होता.

  • 12:08 PM • 25 May 2024

    Maharashtr News Live : ठाकरे गटातील पांडुरंग सकपाळ यांचं अल्पशा आजाराने निधन

    उद्धव ठाकरे यांच्या गटातील माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच अल्पशा निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सकपाळ यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते

     

  • 11:33 AM • 25 May 2024

    Maharashtr News Live : मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा शून्य!

    मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. संभाजीनगर जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील ढेकू मध्यम प्रकल्प देखील कोरडेठाक पडला आहे. त्यामुळे धरणातील जमिनीवर अक्षरशा भेगा पडल्या आहे. नजर जाईल तिथपर्यंत अशीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या अनेक ग्रामपंचायतीचा पाणी उपसा देखील बंद पडला आहे.
     

  • 11:30 AM • 25 May 2024

    Mumbai Local News: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉग

    उपनगरी रेल्वे मार्गावरील रूळांची दुरूस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 26 मे 2024 रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे.

  • 10:58 AM • 25 May 2024

    Maharashtr News Live : डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरणात स्पेशल टास्क फोर्स

    डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरणाच्या तपासाकरीता स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. या विशेष पथकाकडे तपास सोपविण्यात आला आहे. या टास्क फोर्स मध्ये ठाणे खंडणी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखा तपास करत आहे. ⁠ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणि गुन्हे शाखेने मलय मेहता आणि मालती मेहता यांना अटक केली आहे.

     

  • 10:05 AM • 25 May 2024

    'त्या' अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक

    कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्या अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. 

    सुरेंद्र अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

    पोर्श गाडी चालक गंगाराम यांना सुरेंद्र अग्रवालसह त्याचा मुलगा विशाल अग्रवाल आणि सूनकडून धमक्या देण्यात आल्या. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपघात झाला त्यावेळी मी गाडी चालवत होतो, असा जबाब देण्यासाठी त्यांनी धमक्या दिल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाललाही अटक केली.

  • 09:03 AM • 25 May 2024

    Lok Sabha Election Updates : महाराष्ट्रातील 1.83 कोटी महिलांनी मतदानाकडे फिरवली पाठ

    महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले. काही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे, तर काही ठिकाणी कमी झाला आहे. 

    महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात यावेळी १.८३ कोटी महिलांनी मतदानच केले नाही, अशी माहिती समोर आली आहे. 

    १ कोटी ८३ लाख २३ हजार ६७६ म्हणजे ४१.०६ टक्के महिला मतदारांनी मतदानच केले नाही. 

    महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या ४ कोटी ४६ लाख २५ हजार ७४२ इतकी आहे. यातील २ कोटी ६३ लाख २ हजार ६६ म्हणजे ५८.९४ टक्के महिला मतदारांनीच मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

  • 09:01 AM • 25 May 2024

    Maharashtr News Live : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

    माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर २४ मे पासून अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाली. त्यानुसार पहिल्याच दिवशी ८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करत अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात केली. दहावीचा निकाल सोमवारी दि. २७ मे रोजी आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.

     

  • 08:55 AM • 25 May 2024

    Maharashtr News Live : जरांगेंच्या विरोधामुळे उमेदवारी टाळली; भुजबळ काय बोलले?

    नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेवर दावा केल्यानंतर अमित शाह यांनी छगन भुजबळ यांचे नाव सूचवले होते. पण, त्यांना उमेदवारीच दिली गेली नाही. 

    हेमंत गोडसे निवडणूक लढवत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी का दिली गेली नाही, याबद्दल आता छगन भुजबळ यांनी मौन सोडले आहे. महत्त्वाचे म्हणजे मला उमेदवारी न दिल्याने ओबीसी समाज नाराज झाला, असेही भुजबळांनी म्हटले आहे. 

    भुजबळ म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो. भाजपचे नेते अमित शाह यांनीच उमेदवारी संदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितले होते. त्यामुळे उमेदवारी घोषित होणे अपेक्षित होते, पण ती झाली नाही."

    "खरं तर अमित शाहांच्या निर्णयाला विरोध करण्याचे कारण नव्हते, पण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्याला विरोध केला असावा. मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. या त्यांच्या इशाऱ्यामुळेच माझी उमेदवारी घोषित झाली नाही. अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती", असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

    "मला उमेदवारी देऊ नका. दिली तर नंतर घोळ घालू नका, असे मी अगोदरच सांगितले होते; कारण नंतर ओबीसी समाज नाराज होईल. पण, झालंही तसंच. त्यामुळे अपमानाची भावना निर्माण झाली. मी नाराज नव्हतो. मी नाशिकमध्ये बसून सूत्रं हलवत होतो, असे भुजबळ यांनी सांगितले.

follow whatsapp

ADVERTISEMENT