लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, बाल सुधारगृहात रवानगी

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune accident news, vishal agarwal
pune accident news, vishal agarwal
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडले. 

ADVERTISEMENT

लोकांनी दिलेला कौल ईव्हीएममध्ये बंद झाला असला, तरी वेगवेगळे अंदाज आता मांडले जात आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाबरोबरच देशातील चित्र काय असेल, याबद्दलही भाकिते केली जात आहे. 

महाराष्ट्रातील प्रचार पूर्णपणे थांबला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि उमेदवारांच्या वेगवेगळ्या विधानांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे बाकी असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. 

महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, सर्व ताजे अपडेट्स वाचा लाईव्ह...

ADVERTISEMENT

  • 08:30 PM • 22 May 2024

    पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

    पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला आहे. तसेच बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय हक्क मंडळाने हा निर्णय दिला आहे. 

  • 06:29 PM • 22 May 2024

    अभिनेता शाहरुख खान रुग्णालयात दाखल

    बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याला अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरूख खानला उन्हाचा त्रास झाला होता.ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. 

  • 04:16 PM • 22 May 2024

    विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात कार अपघातात दोन जणांचे जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीचे वडील विशास अग्रवाल यांना कोर्टाने तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी राहावे लागणार आहे. 

  • 02:54 PM • 22 May 2024

    Pune Accident live updates : "फडणवीसांकडून पुणेकरांची दिशाभूल", धंगेकरांनी ठेवलं मुद्द्यावर बोट

    पुण्यातील अपघात प्रकरणाचे हादरे राजकारणाला बसू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबत नाही, तोच ही घटना घडली. यात राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांची भूमिका यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यात आता कसब्याचे आमदार आणि पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

    रवींद्र धंगेकर यांची पोस्ट काय?

    काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.

    1) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती.

    2) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले.
    3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का?

    आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे. अधिकारी-मंत्री तर निघून जातील, पण शहराला लागलेली ही कीड आमच्या पुण्याच्या पिढ्या न् पिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा...!

  • ADVERTISEMENT

  • 02:48 PM • 22 May 2024

    विशाल अग्रवालवर शाईफेक

    विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्यातल्या वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक केली होती. विशाल अग्रवाल यांना कोर्टात आणताना हा प्रकार घडला होता. 

  • 02:37 PM • 22 May 2024

    पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने निकाल ठेवला राखून

    पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर बाल हक्क कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. दुपारी 4 नंतर कोर्ट यावर निकाल देणार आहे. 
     

  • ADVERTISEMENT

  • 02:21 PM • 22 May 2024

    Maharashtra News Live : "खरं तर या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांनीच द्यायला हवीत"

    पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताच्या घटनेने महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योराप होत असून, पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. 

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे या प्रकरणामुळे वादात सापडले आहेत. त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. मात्र, आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट अजित पवार यांनाच घेरलं आहे. 

    अंबादास दानवे यांचे अजित पवारांना सवाल

    विरोधी पक्षनेते दानवे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमदार सुनील टिंगरे सांगतात की, मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे! याचे उत्तर द्या मग...

    1) गेले का होतात तुम्ही पोलिस ठाण्यात मध्यरात्री? 
    2) एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोचला आहात?
    3) प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते अनेकदा अशा वेळी. यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते?

    या प्रश्नांची उत्तरे आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी द्यायला हवीत", असे दानवे यांनी म्हटले आहे. 

  • 11:33 AM • 22 May 2024

    Maharashtra News live : "अहो थोडी तर लाज वाटू द्या, कारण...", अनिल देशमुखांवर भाजप आमदार भडकला

    "देवेंद्रजी, काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात; गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील... आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी) देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?",असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. 

    भाजपचे आमदार राम कदम यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "अहो थोडी तर लाज वाटू द्या, कारण 1. एकतर देवेंद्र फडणवीसजी घरी बसून राहिले नाहीत . थेट पुणे आयुक्तालयात गेले आणि कारवाईला गती दिली. तुमच्या माहितीसाठी आता प्रौढ आरोपी म्हणून त्याच्यावर खटला चालणार आहे.
    2. तुम्हाला तर राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. कारण 100 कोटींची वसुली करायला", असे राम कदम यांनी म्हटले आहे. 

     

  • 09:12 AM • 22 May 2024

    Pune Porsche Accident : 'प्रश्न न्यायाचा आहे', धंगेकरांनी शेअर केला राहुल गांधींचा व्हिडीओ

    पुण्यात विशाल अग्रवाल या बिल्डरच्या मुलाने पोर्शे मद्यधुंद अवस्थेत तरुणी आणि तरुणीच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले आहेत. पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या धंगेकरांनी आता राहुल गांधी यांचा व्हिडीओ पोस्ट करत हा प्रश्न न्यायाचा आहे, असे म्हटले आहे. 

    "प्रश्न न्यायाचा आहे. गरीब असो वा श्रीमंत, दोघांना ‘न्याय’ मिळाला पाहिजे. न्याय सर्वांसाठी सारखाच पाहिजे म्हणूनच आम्ही लढतोय. अन्यायाच्या विरोधात लढतोय! काल पुण्यातील व्यावसायिकाच्या मुलाने एका युवक-युवतीला गाडीखाली चिरडून पैश्याच्या जिवावर मिळवलेल्या जामीनानंतर आपण केलेल्या आंदोलनाची संपूर्ण व्यवस्थेला दखल घ्यावी लागली. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी देखील या प्रकरणात सर्वसामान्य कुटुंबातील त्या मुलांची बाजू घेत सर्वांना समान न्याय द्यायला दिला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे", असे धंगेकर यांनी म्हटले आहे. 

     

  • 08:59 AM • 22 May 2024

    Maharashtra News : इगतपुरीत धरणात बुडून तीन मुलींसह पाच जणांचा मृत्यू 

    इगतपुरी तालुक्यात असलेल्या भावली धरणामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

    भावली धरणावर नाशिकरोड भागातून पाच जण फिरायला गेले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला.

    मंगळवारी (21 मे) संध्याकाळी ही घटना घडली असून, हे पाच जण नाशिकरोड येथून रिक्षातून धरणावर फिरण्यासाठी आले होते.

    मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश असून, हे पाच जण बुडाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहे.

    अनस खान दिलदार खान (वय १५ वर्ष), नाझिया इमरान खान (वय १५ वर्ष), मिसबाह दिलदार खान (वय १६ वर्ष), हनीफ अहमद शेख (वय २४ वर्ष), इकरा दिलदार खान (वय १४ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. 

  • 08:50 AM • 22 May 2024

    Maharashtra News Live : "शरद पवारांना १२ वर्षांनी जाग आली"

    लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असला, तरी आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अण्णा हजारे यांना डिवचले होते. त्याला आता हजारेंनी उत्तर दिले. 

    अण्णा हजारे म्हणाले, "माझ्यासमोर हाच प्रश्न आहे की, इतक्या वर्षांनी कशी जाग आली? हा त्यांचे काही मंत्री मी घरी पाठवले पूर्वी, पण ते १२ वर्षांपूर्वी. १२ वर्षांनंतर आता जाग आली. एक तप गेले झोपेचे. १२ वर्षांनंतर बोलायला लागले."

    "शरद पवारांचा नातलग आहे ना पद्मसिंह पाटील मी त्यांचे पुरावे काढले. त्यांचे चुकीचे कृत्ये बाहेर न काढणे आपला दोष आहे. म्हणून जिथे जिथे मला दिसलं, तिथे तिथे मी बोलत गेलो. पण, हे आज अचानक कशी जाग आली मला माहिती नाही", असे हजारे म्हणाले. 

    "मी जर हवेत बोललो असतो, तर शरद पवारांचे चार मंत्री घरी गेले नसते ना? घरी आपोआप गेले का? मी आंदोलने केली म्हणून तर घरी गेले. अनेक पक्षातील अनेक मंत्री मी घरी पाठवले, फक्त समाज आणि देशासाठी", असे उत्तर शरद पवारांना अण्णा हजारे यांनी दिले.

follow whatsapp

ADVERTISEMENT