लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : राज ठाकरे दिल्लीला रवाना, मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray devendra fadnavis
raj thackeray devendra fadnavis
social share
google news

Latest Marathi news live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक नेत्यांच्या भूमिकांमुळे समीकरणे बदलत आहे. यासंदर्भातील सर्व माहिती वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • 07:24 PM • 18 Mar 2024

    राज ठाकरे दिल्लीला रवाना, मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग

      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत उपस्थित आहेत. कारण दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सूरू आहे. या दरम्यान दिल्लीत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे. या भेटीत मनसे-भाजप युतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

  • 06:29 PM • 18 Mar 2024

    'वंचित'ने प्रणिती शिंदेंना डिवचलं

    ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. 

    आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. 

    आम्ही महाराष्ट्रातील वंचित - बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. 

    असो, या सर्व गोष्टी बंद करा.

    तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही.

    नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?

  • 04:20 PM • 18 Mar 2024

    'कालची सभा फॅमिली गॅदरिंग', CM शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका!

    अडीच वर्षाच केलेली कामं जनतेसमोर आहेत. शेती, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आम्ही दोन वर्षात केलेली कामंही जनतेसमोर आहेत. बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली. शेतकरी, महिला आणि तरूणांसाठी अनेक योजना केल्या. महायुतीच्या डबल इंजिन सरकारनं वेगानं कामं केलीत. राज्यात गेमचेंजर प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. स्पीडब्रेकर हटवून आम्ही बंद पडलेल्या प्रकल्पांना गती दिली. 55 मंत्रिमंडळ बैठकीत 500 निर्णय जनतेसाठी घेतले. कालची सभा फॅमिली गॅदरिंग होती. ठाकरेंनी काल माफी मागायला पाहिजे होती. हिंदूंचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे बसले होते. ठाकरेंनाच जनतेनं तडीपार केलंय. हा विश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीकास्त्र सोडले. 

  • 04:17 PM • 18 Mar 2024

    एकनाथ शिंदेंची राहुल गांधीवर टीका

    राहुल गांधी यांनी भाषणात शक्ती शब्द वापरला यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी हिंदुत्वाची शक्ती म्हटलीय. आमच्याकडे साडेतीन शक्तीपीठ आहे ती, देवी-देवतांची शक्ती, नारीशक्ती, भारतमातेची शक्ती या सगळ्या शक्तीला नष्ट करणार तो, इतकी ताकद आहे त्याच्यात, याचं उत्तर नारीशक्ती निवडणुकीतून  त्यांना देईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

    उमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये होऊ देणार नाही असे विधान केले आहे. यावर शिंदे म्हणाले. हेच दुदैव आहे.जे भक्त अमरनाथ यात्रेला जातात, त्या यात्रेकरूंसाठी मी स्वत: राज्यपालांना विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. आणि फारूक अब्दुल्ला म्हणतो किती द्वेश आहे? हा द्वेश उबाठाला मान्य आहे का? महाराष्ट्र भवन होऊ देणार आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली. 

  • ADVERTISEMENT

  • 04:04 PM • 18 Mar 2024

    CM शिंदेंची ठाकरेंवर टीका, ''अडीच वर्षांचं सरकार नकारात्मक होतं''

    विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे अजेंडा आहे, असे इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेवर एकनाथ शिंदे म्हणाले आहे. हे साधा पंतप्रधानाचा उमेदवारही जाहीर करू शकले नाही. हे एक दुसऱ्याकडे पाहतात, असा टोला शिंदेंनी इंडिया आघाडीली लगावला आहे. 

    दीड पावने दोन वर्षापूर्वीच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना तडीपार केले आहे. जे इतर राज्यातून तडीपार झालेली लोक आली ती मोदींनी कसे तडीपार करू शकतात. काँग्रेसच्या कार्यकाळात 40 ते 50 वर्षात ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं. देशाची अर्थव्यवस्था 11 व्या वरून पाचव्या वर आणली आता तिसऱ्यावर आणण्याच त्यांचे लक्ष्य आहे. 

    दीड वर्षात महायुतीने केलेले काम तुमच्यासमोर आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा वर्ग या सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली.  समृद्धी महामार्ग, अटल सेतु अशी कामे झाले. अनेक 

    अडीच वर्ष जे सरकार होतं हे नकारात्मक होत. प्रकल्प थांबवलं, आमचं सरकार आल्यानंतर युद्धपातळीवर निर्णय घेतले, वेगवान पद्धतीने काम केली. 

    एफडीआयमध्ये आपण पहिल्या नंबर आहे. जीडीपी आपलं योगदान मोठं आहे. बंद प्रकल्पांना चालना दिली. आणखी नवीन प्रकल्पांचे प्रायोजन केले. 

  • 02:55 PM • 18 Mar 2024

    Iqbal Singh chahal : मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली

    केंद्रीय निवडणूक आयोगाने  सलग तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानुसार अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आणि आचारसंहिता लागल्याने आता आयोगानेच त्यांची बदली केली आहे. देशातील काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या आयोगाने केल्या आहेत. 

    दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आदेशाचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाने इक्बाल सिंह चहल यांची बदली करण्याच्या आदेशाचे मी स्वागत करतो, असे सोमय्यांनी ट्विट करून म्हटले आहे.

    Kirit somaiya tweet on iqbal singh chahal transfer news
    किरीट सोमय्या यांनी इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीच्या वृत्तानंतर केलेले ट्विट.
  • ADVERTISEMENT

  • 01:41 PM • 18 Mar 2024

    CM एकनाथ शिदेंनी पुन्हा शिवतारेंना वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं!

    विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा वर्षा बंगल्यावर भेटीसाठी बोलावलं आहे. शिवतारे बारामती लढण्यावर ठाम असल्याने तणाव पाहायला मिळत आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न इतर नेते करत आहेत. आज मुख्यमंत्री शिंदेही शिवतारेंची समजूत काढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

  • 01:18 PM • 18 Mar 2024

    आम्ही रवि राणा-नवनीत राणांना खूप घाबरतो -बच्चू कडू

    "जे लोक 'एनडीए'चे घटक पक्ष म्हणून इमानदारीने पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करायला लावू. आगामी काळात सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणा मंचावर दिसतील. एनडीएचा घटक म्हणून खासदार राणांचा प्रचार करू. काहींनी जर पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार केला, तर त्यांच्यावर कारवाई करणार", असा इशारा बच्चू कडूंनी आनंदराव आडसूळांना अप्रत्यक्षपणे दिला. 

    आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवि राणा आणि नवनीत राणा यांची खिल्ली उडवली. "आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना घाबरतो. आम्ही रवि राणा आणि नवनीत राणांनाही खूप घाबरतो", असे बच्चू कडू म्हणाले.

  • 11:57 AM • 18 Mar 2024

    किरण सामंत नारायण राणेंच्या पाया पडले 

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत. शिवसेनेबरोबर भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहेत. अशात शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार असलेल्या किरण सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. ते राणेंच्या पाया पडले. 

    निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण सामंत राणे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 

  • 10:50 AM • 18 Mar 2024

    उद्धव ठाकरेंना शेलारांचे चार सवाल, म्हणाले, "मर्दासारखे..."

    भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपात उद्धव ठाकरेंचे भाषण झाले. याच भाषणावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. चार सवाल करत शेलारांनी ठाकरेंवर पलटवार केला. 

    शेलारांनी काय म्हटले आहे वाचा, पोस्ट जशीच्या तशी...

    "आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे..
    - श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ?
    - भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का?
    - भाषणाची सुरुवात
    “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”
     अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ?
    - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल "मर्दा"सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का?
    - हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने
    "हिंदुत्वाला केले तडीपार" हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच "शिवतीर्थावर" सभा घेण्यात आली होती का?
    - सभा एक झालीय... पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेलीय..
    काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल"
    आता खंजीर, वाघ, मर्द... कोथळा... अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!!"

    Ashish Shelar Attacked on Uddhav Thackeray
    आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी सोशल मीडियावरील पोस्ट.
  • 10:36 AM • 18 Mar 2024

    "मोदी यांचा हा आत्ममग्नपणा हीच हुकूमशाही", ठाकरेंच्या शिवसेनेची सामनातून टीका

    सामना अग्रलेखात म्हटलेलं आहे की, "हुकूमशहा लोकशाहीचे चिलखत घालून राज्य करू लागले आहेत. सरकारी खर्चाने, सरकारी यंत्रणेचा पूर्ण गैरवापर करून मोदी हे भाजपचा प्रचार करीत आहेत. हेच हुकूमशाहीचे मुख्य लक्षण आहे. भारतीय जनता पक्ष हा सदैव निवडणूक प्रचारात गुंतलेला पक्ष आहे. पंतप्रधान मोदी हे निवडून आल्यावर पुढची पाच वर्षे भाजप व स्वतःचा प्रचार करीत असतात. मोदी यांचा हा आत्ममग्नपणा हीच हुकूमशाही आहे. सत्य व स्पष्ट बोलणाऱ्यांची मुंडकी उडवायची हेच मोदी सरकारचे धोरण आहे."

    "पंतप्रधान मोदी यांनी काल ‘ईडी’ वगैरे तपास यंत्रणांचे पुन्हा कौतुक केले. याच तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदींनी भाजपच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केले. त्यामुळे मोदी त्यांच्या 'नाझी' फौजांचे कौतुक करणारच! या नाझी फौजांच्या बळावरच मोदी उद्याच्या निवडणुका जिंकण्याची भाषा करत असतील तर ते जगातल्या लोकशाहीचे दुर्दैव ठरेल!"

    "मोदी यांचा पंतप्रधानपदाचा काळ हा अन्याय व भ्रष्टाचाराचा काळ ठरला. मोदी यांच्या काळात आर्थिक गुन्हेगारांना मोकाट रान मिळाले. कारण हे सर्व गुन्हेगार भारतीय जनता पक्षाला हजारो कोटींच्या खंडण्या देत होते. देशाची लूट करण्याचा मुक्त परवाना या खंडणीखोरांना देण्यात आला व लुटीचा वाटा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचला. हे सर्व सुप्रीम कोर्टाने उघड केले. मोदी सरकारची पुरती फजिती झाली. उरलेले वस्त्रहरण 4 जूनला होईल. त्या दिवशी देशातील हुकूमशाहीचा पराभव झालेला असेल!"
     

follow whatsapp

ADVERTISEMENT