Maharashtra News Live : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCPकडून उमेदवार जाहीर
Maharashtra Lok Sabha 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, हे जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत... राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News :
ADVERTISEMENT
सातवा टप्पा पार पडल्यानंतर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. देशात कुणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होण्याआधीच महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन राजकीय आघाड्या असून, लोकसभेच्या जागावाटपावेळी बराच पेच निर्माण झाला होता.
हा पेच टाळण्यासाठी आणि लवकर प्रचार सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे आघाड्यांमधील पक्ष आतापासून दबाव निर्माण करताना दिसत आहेत.
महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
- 07:28 PM • 28 May 2024
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCPकडून उमेदवार जाहीर
मुंबई शिक्षक मतदार संघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील तटकरेंनी आज शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज. मो.अभ्यंकर आणि पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली होती.
- 06:34 PM • 28 May 2024
रेल्वे ट्रकवरून मालगाडीचे डब्बे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणारी मालगाडी पालघर स्थानकात घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेत मालगाडीचे 5 ते 6 डब्बे घसरल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
- 02:49 PM • 28 May 2024
Maharashtra News : 'संजय राऊत तुमचे नेते बघा...', बावनकुळेंचा व्हिडीओ ट्वीट करत निशाणा
'स्वतःला ईश्वर का अवतार म्हणून घेणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरही लेख लिहा' असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचा व्हिडिओ ट्विट करत बावनकुळे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
- 01:55 PM • 28 May 2024
"देवेंद्र फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा", काँग्रेसची मागणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील अपघात प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
"आमचे मित्र देवेंद्र फडणवीस, ते वकील आहेत. मग अशा गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत. जे लोकांना चिरडून टाकतात. ड्रग्ज आणि दारू घेऊन दहशत निर्माण करतात. त्यांना दहा तासांत जामीन मिळवून देण्याचे काम, त्यात राज्याचे गृहमंत्री वकिलीचा वापर करताहेत का? काँग्रेसची भूमिका आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आपल्याला पदाचा राजीनामा दिला पाहिजे", अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
- 01:46 PM • 28 May 2024
Maharashtra News Live : मनसेचे उमेदवार अभिजीत पानसेंनी घेतली शिंदेंची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पानसे यांनी मुख्यमंत्री तथा शिवेसना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे आमदार आहेत. त्यांना पुन्हा भाजप उमेदवारी देणार आहे, अशी माहिती आहे. पण, त्याच मतदारसंघातून आता मनसेने उमेदवार उतरवला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधान परिषदेत उडी घेतली आहे. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो. अशात शिंदेंची भेट पानसे यांनी घेतल्याने शिवसेना काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे.
- 01:41 PM • 28 May 2024
Maharashtra News : अकोल्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत व्यक्त केला रोष!
अकोल्यात शेतकरी चांगले आक्रमक झाले आहेत. टिळक रोडवर थेट शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला आहे. जास्त उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मागील 4 दिवसांपासून शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा लावतायेत. मात्र कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत चक्का जाम आंदोलन केलं. या हंगामात बी-बियाणे खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. केंद्रावर नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोनच पॅकेट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- 01:04 PM • 28 May 2024
तीन सदस्यीय समितीकडून ससून रुग्णालय प्रशासनाची चौकशी सुरू
समितीच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे, डॉ गजानन चव्हाण आणि डॉ सुधीर चौधरी अशा तीन जणांच्या समितीकडून ससून रुग्णालय प्रशासनाची चौकशी केली जातेय.
- 01:02 PM • 28 May 2024
Pune News : पुणे पोलीस आयुक्तांनी फेटाळले अंजली दमानियांचे आरोप
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी फेटाळलेत अंजली दमानियांचे आरोप... अंजली दमनियांचे आरोप असत्य असून बिनबुडाचे आहेत... पुणे पोलीस आयुक्तांची टीव्ही 9 ला माहिती... पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का ? अंजली दमानियांनी अजित पवारांवर केले होते आरोप
- 01:00 PM • 28 May 2024
Pune Accident : चौकशीच्या भीतीने ससून रुग्णालयातील एक कर्मचारी फरार
ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीने पळून गेला आहे. पुणे पोलिसांची एक टीम त्या व्यक्तीच्या शोधात आहे. आपल्याला ताब्यात घेतील या भीतीने तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्याने अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना मदत केल्याची माहिती आहे. आज त्याला पुणे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात येतेय.
- 09:40 AM • 28 May 2024
तावरेंशी आमदार टिंगरेंचं कनेक्शन काय, शिफारस का केली?
डॉ. अजय तावरेंना अधीक्षकपदाची जबाबदारी देण्याबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केली होती. त्यामुळे ते वादात सापडले आहेत.
यावर आता आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'लोकप्रतिनिधी असल्याने अनेकजण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात', असं टिंगरेंनी म्हटलं.
'डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी', असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी लिहिलं होतं.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी हे पत्र लिहिण्यात आल्याचं समजतंय. त्यावर आता टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
- 08:23 AM • 28 May 2024
घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते – मुंबई हायकोर्ट
घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते. ऑडिट न करताच थेट कारवाई नको, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं सिडकोला खडसावलं. होर्डिंग्जबाबत व्यापक धोरण सादर करण्याची गरज आहे. घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळे उघडले असते का? अश्याप्रकारे कारवाईला वेग आला नसता, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी सिडकोला खडसावलं.
- 08:19 AM • 28 May 2024
Maharashtra News : यंदाच्या पावसाविषयी IMD कडून महत्त्वाची अपडेट
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. त्यामुळे देशातील जनतेसाठी ही दिलासादायक बातमी ठरत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT