लाइव्ह

Lok Sabha elections 2024 : 16 पैकी 7 उमेदवार मुस्लिम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Marathi News live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे... त्यामुळे राजकीय वर्तुळात अनिश्चितता निर्माण झाली आहे. याबद्दलचे सर्व अपडेट्स वाचा...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 06:31 PM • 24 Mar 2024

    Lok Sabha elections 2024 : 16 पैकी 7 उमेदवार मुस्लिम... मायावतींचा 'हत्ती' पंक्चर करणार 'सायकल'

    बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या 16 पैकी 7 मुस्लिम उमेदवार आहेत. मायावतींच्या उमेदवारांची यादी पाहता, याचा थेट फटका इंडिया आघाडीलाच बसण्याची शक्यता आहे. 

    उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करून मायावतींनी स्पष्ट संदेश दिला आहे की, इंडिया आघाडीत सामील होण्याच्या शक्यता संपल्या आहेत. 

    बसपच्या या यादीवर नजर टाकली तर मायावतींनी 7 जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. इंडिया आघाडीच्या उमेदवारांचे नुकसान करणे हा त्यांचा हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

    मायावतींनी ज्या जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत, त्यात सहारनपूर, मुरादाबाद, रामपूर, संभल, अमरोहा, आमला आणि पिलीभीत यांचा समावेश आहे.

  • 05:35 PM • 24 Mar 2024

    शिंदे, फडणवीस, पवारांची 'वर्षा'वर बैठक

    अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत परतले. रविवारी पाच वाजता तिन्ही नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक होत आहे. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, कोणत्याही क्षणी महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

  • 05:25 PM • 24 Mar 2024

    सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रही -बाळासाहेब थोरात

    शिर्डी येथे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, "फक्त महाविकास आघाडीत नाही, तर महायुतीतही तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा… तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू. चर्चेतून प्रश्न मिटतील. पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत", असे थोरात म्हणाले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने कोल्हापूर, रामटेक, अमरावती या जागा सोडूनही काँग्रेस सांगलीही आपल्याकडेच ठेवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. 
     

  • 12:41 PM • 24 Mar 2024

    Lok Sabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर

    महाविकास आघाडीला अल्टिमेटम देतानाच प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. आंबेडकर रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मी महाविकास आघाडीला त्यांच्या चार जागा परत करतोय. ते चार जागा बोलतात. पण, बैठकीत अकोला आणि उर्वरित दोन जागांची ऑफर दिली. मविआचा 15 जागांचा तिढा अजून संपत नाहीय, तर मी कुठे जागा मागणार?”

    पूर्व विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आलीय. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, "ज्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, त्याला फॉर्म भरायला वेळ लागतो. ज्याचा असा कुठला रेकॉर्डच नाही, त्याचा फॉर्म दोन तासात भरुन होतो.”

    याच मुद्द्यावर आंबेडकर पुढे म्हणाले, "आम्ही जे उमेदवार फायनल केलेत, त्यांचा रेकॉर्ड पाहिलाय. 27 तारखेला मी अकोल्यातून फॉर्म भरणार. मी माझ्या पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढणार आहे", अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

  • ADVERTISEMENT

  • 11:10 AM • 24 Mar 2024

    Marathi News Live : "घड्याळ तर जाईलच पण वेळ...", रोहित पवारांचा अजित पवारांना इशारा

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवदेन प्रसिद्ध केले आहे. त्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. 

    "या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं, तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय. राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं पण विचार बदलल्यामुळे आणि ज्याचं राजकारणच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही वेळ आली, हे नाकारता येणार नाही!", असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

    Rohit Pawar tweet about ajit pawar's Ncp
    अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवदेन प्रसिद्ध केले आहे, त्यावर रोहित पवारांची टीका.
  • 10:24 AM • 24 Mar 2024

    Lok Sabha Elections 2024 : दडपण टाकण्यासाठी सत्तेचा वापर -शरद पवार

    "आज देशासमोर महागाई व बेकारी संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न आहेत. हजारो हात असे आहेत की, जे कामासाठी आसुसलेले आहेत, पण कामाची संधी मिळत नाही आणि असं असताना या गोष्टीकडे लक्ष हे किती दिलं जातं? लक्ष याच्याकडे आहे की, सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्या सत्तेचा वापर विरोधी विचारावर दडपण कसं टाकता येईल यासंबंधी भूमिका घेतली जाते", असे शरद पवार बारामती येथे झालेल्या व्यापारी महासंघ मेळाव्यात बोलताना म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 10:13 AM • 24 Mar 2024

    Mahayuti Seats Sharing Updates : शिंदे-पवारांची अमित शाहांसोबत बैठक, तिढा सुटणार!

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (२३ मार्च) रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (२४ मार्च) एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांची भेट घेतली. मार्च महिन्यातच गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली होती. त्यात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, जेपी नड्डा आणि अजित पवार सहभागी झाले होते. या बैठकीत जागावाटपावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला 3-4 जागा मिळतील, तर एकनाथ शिंदे यांना 10-12 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे. याशिवाय भाजप आणि शिवसेना यांच्यात काही जागांची देवाणघेवाणही होऊ शकते.

    राज्यातील महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असून, दोन-तीन जागांवर चर्चा सुरू असून, लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, लोकसभेसाठी तिकीट वाटपाचा विषय जेव्हा येतो तेव्हा तो वास्तवावर आधारित असतो.

follow whatsapp

ADVERTISEMENT