Maharashtra News Live : बांगलादेशी लोकांच्या मतदानामुळे उद्धव ठाकरेंची लाज राखली- किरीट सोमय्या
Maharashtra News live Updates : देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra News Live Marathi : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवे सरकार अस्तित्त्वात आले असले, तरी महाराष्ट्रातील राजकीय धुरळा अद्यापही खाली बसलेला नाही.
ADVERTISEMENT
राज्यात लोकसभेच्या निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली असून, राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
याच संदर्भातील घडामोडींची माहिती आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घ्या लाईव्ह अपडेट्समध्ये....
ADVERTISEMENT
- 03:52 PM • 12 Jun 2024
Maharashtra New : नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विसपुते यांची माघार
नाशिक शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी वेगवान घडामोडी घडत आहेत. अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी माघार घेतली आहे. भाजपचे राजेंद्र विखे यांनीही माघार घेतली आहे. महायुतीत आता अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, शिंदे गटाचे किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे मैदानात आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे दिलीप पाटील आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांनीही माघार घेतली आहे.
- 03:43 PM • 12 Jun 2024
Maharashtra New : काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी घेतली माघार
- काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी घेतली माघार
- ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या सह निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल होत घेतली माघार
- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात काँग्रेस आणि ठाकरे गटात दिल जमाई
- ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासह, जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख , काँग्रेस उमेदवार विभागीय आयुक्तालयांच्या कार्यालयात उपस्थित होते.
- 03:25 PM • 12 Jun 2024
Pune News : ससून रूग्णालयातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
ससून रूग्णालयातील आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कर्मचारी आणि खासगी मेडिकलवाल्यांमध्ये हातमिळवणी करून रूग्णाची लूट करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. स्टिंग ऑपरेशन करत नागरिकांनी ससून रूग्णालयातील हा प्रकार समोर आणला आहे. उपचारासाठी ससूनमधील कर्मचाऱ्यांनी रूग्णाच्या नातेवाईकांना 24 हजार रूपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- 03:19 PM • 12 Jun 2024
Pune Accident: पुण्यात पुन्हा गंभीर अपघात, भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं!
पुण्यात पुन्हा गंभीर अपघात झाला आहे. मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं आहे. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील गंगाधाम चौक परिसरातील घटना आहे. पदचारी महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
- 02:17 PM • 12 Jun 2024
Maharashtra New : बांगलादेशी लोकांच्या मतदानामुळे उद्धव ठाकरेंची लाज राखली गेली- किरीट सोमय्या
“गेला आठवडाभर वोट जिहाद बांगलादेशी मतदान झाले, त्या बाबत मी आवाज उठवला. मला धमकी मिळाली आहे. पोलिसांनी मला सतर्क राहण्यास सांगितले आहे. मोर्चा तुमच्याकडे येणार आहे. मिनी कोकण ईशान्य मुंबईमध्ये भाजप पुढे आहे. बांगलादेशी लोकांच्या मतदानामुळे उद्धव ठाकरे यांची लाज राखली गेली” असं किरीट सोमय्या म्हणाले.
- 01:17 PM • 12 Jun 2024
Maharashtra News : सरकारच्या भवितव्याशी नाही, देशाच्या भवितव्याशी देणंघेणं- उद्धव ठाकरे
आज शिवसेनेच्या पदवीधर मतदार संघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, 'माझं पदवीधरचं सर्टिफिकेट खरं आहे', असं म्हणत ठाकरेंनी मोदींना टोला लगावला. 'शिवसेना आणि मुंबईकर हे वेगळं नातं, ते नातं आणखी घट्ट करू... वेळ जाऊ नये म्हणून आधीच अर्ज भरून ठेवले होते, विधानपरिषद निवडणुकांवर मविआसोबत समजौता झाला आहे.' तसंच, मणिपूरवर बोलताना ते म्हणाले, 'वर्षभरानंतर तरी मोहन भागवत मणिपूरवर बोलले... मोदी-शाह मणिपूरमध्ये आतातरी जाणार आहेत का?... मोहन भागवत जे बोलले ते मोदी गांभीर्यानं घेणार आहेत का?... भाजपची RSS ची गरज संपलीय का?' असे सवालही ठाकरेंनी यावेळी केले.
- 12:56 PM • 12 Jun 2024
Maharashtra New : लोकसभा निकालानंतर शरद पवार मैदानात, शेतकऱ्यांशी थेट संवाद
आज (12 जून) शरद पवार पुरंदरमधील वाल्हा गावात पोहोचले आहेत. लोकसभा निकालानंतर ते अॅक्शनमोडमध्ये दिसत आहेत. 'नेते लोकांनी या भागात बरीच गुंतवणूक केली आहे असं ऐकलं आहे. अशोक टेकवडे यांनी 500 एकर जमीन घेतली आहे. विजय शिवतारे आणि डीएसके यांनी 500 एकर जमीन घेतली आहे. शरद पवारांनी याबाबत स्थानिकांकडून माहिती घेतली. बाहेरचे लोक जर जमिनी घेत असतील तर पाणी नेमकं कुणासाठी द्यायचं याचा विचार करावा लागेल', असं शरद पवार यावेळी बोलले.
- 12:19 PM • 12 Jun 2024
Sharad pawar Updates : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पवारांनी दिला धीर
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शरद पवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन देत धीर दिला.
- 12:16 PM • 12 Jun 2024
Maharashtra News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर- देवेंद्र फडणवीस
'मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या बाबतीत सरकार गंभीर आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर कारवाई देखील सरकार करत आहे', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
- 12:14 PM • 12 Jun 2024
Dombivli News: डोंबिवली पुन्हा एकदा आगीमुळे हादरली
डोंबिवलीमधील एमआयडीसीत पुन्हा आग लागली आहे. या वेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. दूरपर्यंत धुरांचे लोट दिसून आले. तीन आठवड्यापूर्वीच इथे अग्नीतांडव झाला होता आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील मालदे आणि इंडो अमाईन्स कंपनीला आग लागली. आग लागल्याचे कारण अस्पष्ट आहे. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
- 11:58 AM • 12 Jun 2024
Maharashtra News: शिंदे सेना किती हप्ते गोळा करते याचे आकडे घ्यावे लागतील- संजय राऊत
'शिंदे सेना किती हप्ते गोळा करते याचे आकडे घ्यावे लागतील.' डोंबिवलीमध्ये पुन्हा स्फोट झाल्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 'डोंबिवली एमआयडीसीतून शिंदे सेना हप्ते गोळा करते', असं देखील यावेळी राऊत म्हणाले.
- 10:01 AM • 12 Jun 2024
Solapur News : पुरात दुचाकीसह तिघे गेले गेले वाहून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवरून पूल ओलांडताना तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली.
दोघेजण झाडाला पकडून बाहेर आले, तर अद्याप एकाचा शोध लागला नाही.
ज्ञानेश्वर संभाजी कदम (वय 30), बबन संदीपान जाधव (वय 50) आणि महादेव रेड्डी (वय 25) तिघेही दक्षिण सोलापूरमधील रहिवाशी असून, बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी पुरात वाहून जाताना झाड पकडले आणि बाहेर आले. तर ज्ञानेश्वर कदमचा शोध सुरू आहे.
- 08:51 AM • 12 Jun 2024
Maharashtra live Updates : काँग्रेस-ठाकरेंमध्ये का सुरू झालाय वाद?
लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. याला निमित्त ठरले आहे विधान परिषद निवडणूक.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, ठाकरेंनी चारही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस ठाकरेंना दोन जागा सोडण्यास तयार असून, नाशिक आणि कोकण मतदारसंघातील उमेदवार मागे घेण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना यासंदर्भात बोलण्यासाठी कॉल केले. मात्र, ते कॉलच घेत नसल्याचे पटोलेंनी सांगितले. त्यामुळे वादाची ठिणगी पडली असून, ठाकरे काय करणार आणि महाविकास आघाडीतील कुरबुरी संपणार की वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT