Maharashtra Lok Sabha Election Live : शरद पवारांच्या नेत्याचा कारखाना जप्त, मोठी कारवाई
Lok Sabha Election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीसंदर्भातील बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Maharashtra Live latest News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होत आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे.
ADVERTISEMENT
उन्हाच्या झळा सोसत राजकीय नेते प्रचारात गुंतले आहेत. सर्व पक्षांचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्रात फिरत असून, राज्यातील घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.
महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणुकीचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
- 05:12 PM • 26 Apr 2024
Madha Lok Sabha : शरद पवारांच्या नेत्याचा कारखाना जप्त, मोठी कारवाई
Madha Lok Sabha Election Updates : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार सोलापुरात होते. शरद पवारांसोबत व्यासपीठावर असतानाच अभिजित पाटील यांना धक्का बसला.
अभिजित पवार यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र सहकारी बँकेकडून कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. अधिकाऱ्यांनी १ लाख साखरेची पोती असलेला साठाही सील केला आहे. त्यामुळे हा अभिजित पाटील यांना धक्का मानला जात आहे.
या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कारवाई म्हणजे माढा मतदारसंघात लख्खपणे दिसणाऱ्या पराभवाच्या भितीने सुरु असलेली दडपशाही आहे. पण सोलापूरची स्वाभिमानी जनता या दडपशाहीचं चंद्रभागेमध्ये विसर्जन करुन माढा मतदारसंघात विजयाची तुतारी फुंकल्याशिवाय राहणार नाही."
"आम्ही सर्वजण अभिजित पाटील आणि सर्व सभासद शेतकऱ्यांसोबत आहोत. या लढ्यात बोलवाल तेंव्हा हजर राहू. काळजी नसावी! कारवाई करणाऱ्यांनाही सांगतो की, कारखाना ही तुमची खासगी मालमत्ता नाही तर शेतकऱ्यांचा आहे… सत्ता आल्यावर सर्वांचा हिशोब कायदेशीर मार्गाने चुकता होईल!", असा इशारा रोहित पवारांनी दिला.
- 04:35 PM • 26 Apr 2024
दुसऱ्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान?
1. नांदेड लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.93 टक्के एवढं मतदान झालं आहे.
2. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 29.07 टक्के एवढं मतदान झालं आहे.
3. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 31.47 टक्के मतदान झाले.
4. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.32 टक्के एवढं मतदान झालं आहे.
5. अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.04 टक्के मतदान पार पडले.
6. अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.25 टक्के एवढं मतदान झालं आहे.
7. हिंगोली, लोकसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.46 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
8. परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 33.88 टक्के एवढं मतदान झालं आहे.
- 02:51 PM • 26 Apr 2024
दुपारी 1 वाजेपर्यंत 'या' 8 मतदारसंघांमध्ये किती टक्के मतदान?
1. नांदेड लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.93 टक्के एवढं मतदान झालं आहे.
2. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 29.07 टक्के एवढं मतदान झालं आहे.
3. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 31.47 टक्के मतदान झाले.
4. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.32 टक्के एवढं मतदान झालं आहे.
5. अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.04 टक्के मतदान पार पडले.
6. अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.25 टक्के एवढं मतदान झालं आहे.
7. हिंगोली, लोकसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.46 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
8. परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 33.88 टक्के एवढं मतदान झालं आहे.
- 10:17 AM • 26 Apr 2024
Maharashtra Lok Sabha Updates : बावनकुळेंनी मागितली माफी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांची माफी मागितली.
झालं असं की, दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या आठ लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, बूथ प्रमुखांची बावनकुळे यांनी ऑनलाईन बैठक घेतली.
यावेळी त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. "अनेक कामे मी तुम्हाला गेली १६ महिन्यांपासून लावली होती. तुम्हाला त्याचा त्रास झाला असेल, त्यासाठी मी माफी मागतो. ज्या बूथवर ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल त्या बूथप्रमुखाला शाबासकीचे पत्र दिले जाईल", असे बावनकुळे म्हणाले.
- 09:14 AM • 26 Apr 2024
Maharashtra Heat Wave News : काळजी घ्या! चार दिवस उष्णतेची लाट
उन्हाच्या झळा वाढल्या असून, पुढील चार दिवस काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
आखाती देशातून मुंबईसह राज्यात वाहणाऱ्या उष्णतेच्या वाऱ्यामुळे पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट येईल आणि तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईचे तापमान ३८ अंशावर, तर राज्यातील इतर शहरांतील तापमान ४० अंशाच्या पलिकडे जाईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
- 08:41 AM • 26 Apr 2024
Maharashtra Lok Sabha Updates : शिंदेंच्या उमेदवारांना नेत्यांचा विरोध, मनसेचा नाही
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर किंवा संजय निरुपम यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याला मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरेंनी विरोध केला होता. त्यामुळे शिंदेंचं टेन्शन वाढू शकतं अशी चर्चा सुरू झाली.
"मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये", असं त्यांनी म्हटलं होतं.
यावर आता मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आमचा पाठिंबा नाही, उमेदवाराबद्दल नाराजी आहे अशी विधाने केली. ही विधाने त्यांची व्यक्तिगत आहेत. माध्यमांनी ही भूमिका पक्षाची म्हणून बघू नये."
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून खुलासा करण्यात आल्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन कमी झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT