Maharashtra Lok Sabha Election Phase 5: महाराष्ट्रातलं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची
Lok Sabha Election Maharashtra Live News : महाराष्ट्र आणि देशभरातील लोकसभा निवडणुकीसंदर्भातील घडामोडी, राजकीय बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Mumbai: Maharashtra Lok Sabha Election Phase 5 Live Polling: Voting In Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Thane, Kalyan, Palghar, Dhule, Dindori, Nashik, Bhiwandi Constituencies : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे लोकसभा, दिंडोरी लोकसभा, नाशिक लोकसभा, पालघर लोकसभा, भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, उत्तर मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा, उत्तर पूर्व मुंबई लोकसभा, उत्तर मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 10:29 PM • 20 May 2024
पाचवा टप्पा: 7 वाजेपर्यंत नेमकं किती टक्के झालं मतदान?
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात 48.66 टक्के मतदान झाले.
पाहा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी...
भिवंडी - 56.41% मतदान
धुळे - 56.61% मतदान
दिंडोरी - 62.66% मतदान
कल्याण - 47.08% मतदान
उत्तर मुंबई - 53.50% मतदान
उत्तर मध्य मुंबई - 48.80% मतदान
उत्तर पूर्व मुंबई - 52.37% मतदान
उत्तर पश्चिम मुंबई - 53.67% मतदान
दक्षिण मुंबई - 46.07% मतदान
दक्षिण मध्य मुंबई - 51.88% मतदान
नाशिक - 53.76% मतदान
पालघर - 61.18% मतदान
ठाणे - 49.81% मतदान
- 09:43 PM • 20 May 2024
महाराष्ट्रातलं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील मतदान आज संपुष्ठात आले आहे. आज पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदार संघात मतदान पार पडले होते. यामध्ये मुंबईतील सहाही मतदार संघात संथगतीने मतदान सुरु असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर ताषेरे ओढले होते. मात्र त्यानंतरही अनेक मतदान केंद्रावर उशिराने मतदान पार पडले होते. आता हे मतदान देखील संपुष्ठात आले आहे. त्यामुळे आता सगळ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
- 07:35 PM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha: पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची तुलना
1. धुळे - 57.05% - (2019)
धुळे - 48.81% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत2. दिंडोरी - 65.71% - (2019)
दिंडोरी - 57.06% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत3. नाशिक - 59.53% - (2019)
नाशिक - 51.16% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत4. पालघर - 63.76% - (2019)
पालघर - 54.32% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत5. भिवंडी - 53.20% - (2019)
भिवंडी - 49.43% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत6. कल्याण - 45.31% - (2019)
कल्याण - 41.70% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत7. ठाणे - 49.39% - (2019)
ठाणे - 46.77% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत8. मुंबई उत्तर - 60.09% - (2019)
मुंबई उत्तर - 46.91% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत9. मुंबई उत्तर-पश्चिम - 54.31% - (2019)
मुंबई उत्तर-पश्चिम - 49.79% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत10. मुंबई उत्तर-पूर्व - 57.23% - (2019)
मुंबई उत्तर-पूर्व - 48.67% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत11. मुंबई उत्तर-मध्य - 53.68% - (2019)
मुंबई उत्तर-मध्य - 47.46% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत12. मुंबई दक्षिण-मध्य - 55.40% - (2019)
मुंबई दक्षिण-मध्य - 48.26% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत13. मुंबई दक्षिण - 51.59% - (2019)
मुंबई दक्षिण - 44.63% - (2024) सायंकाळी 5 वाजेपर्यंत - 05:49 PM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha: पाचवा टप्पा: 5 वाजेपर्यंत नेमकं किती टक्के झालं मतदान?
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात 48.66 टक्के मतदान झाले. पाहा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी...
- भिवंडी - 48.89% मतदान
- धुळे - 48.81% मतदान
- दिंडोरी - 57.06% मतदान
- कल्याण - 41.70% मतदान
- उत्तर मुंबई - 46.91% मतदान
- उत्तर मध्य मुंबई - 47.32% मतदान
- उत्तर पूर्व मुंबई - 48.67% मतदान
- उत्तर पश्चिम मुंबई - 49.79% मतदान
- दक्षिण मुंबई - 44.22% मतदान
- दक्षिण मध्य मुंबई - 48.26% मतदान
- नाशिक - 51.16% मतदान
- पालघर - 54.32% मतदान
- ठाणे - 45.38% मतदान
- 03:42 PM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha: पाचवा टप्पा: 3 वाजेपर्यंत नेमकं किती टक्के झालं मतदान?
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात 38.77 टक्के मतदान झाले. पाहा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी...
- भिवंडी -37.06% मतदान
- धुळे - 39.97% मतदान
- दिंडोरी - 45.95% मतदान
- कल्याण - 32.43% मतदान
- उत्तर मुंबई - 39.33% मतदान
- उत्तर मध्य मुंबई - 37.66% मतदान
- उत्तर पूर्व मुंबई - 39.15% मतदान
- उत्तर पश्चिम मुंबई - 39.91% मतदान
- दक्षिण मुंबई - 36.64% मतदान
- दक्षिण मध्य मुंबई - 38.77% मतदान
- नाशिक - 39.41% मतदान
- पालघर - 42.48% मतदान
- ठाणे - 36.07% मतदान
- 03:24 PM • 20 May 2024
lok Sabha Election : 'मतदानाचा वेग कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे' फडणवीसांची आयोगाकडे मागणी
मुंबई तसेच परिसरात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांवरुन येत असल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यात तातडीने लक्ष घालून मतदानाचा वेग कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाकडे केली आहे. तसंच मुंबई आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्हाधिकार्यांशी चर्चा करुन मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच मतदानाची गती वाढेल, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
- 03:22 PM • 20 May 2024
Lok sabha Election: वरळीतील बूथवर पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे दाखल
वरळीतील पाच बूथवरून तक्रारी येत असल्याने आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी वरळीत दाखल झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनीही गंभीर आरोप केले. गणपत कदम शाळेतील मतदान निवडणूक अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कमी होत असल्याचे शिंदे यांचे आरोप, निवडणूक अयोगकडे तक्रार केली.
- 02:34 PM • 20 May 2024
Lok Sabha Election: 'राधे माँ'ने केलं मतदान
बोरिवलीत राधे माँ यांनी पहिल्यांदाच कुटुंबासह मतदान केलं. मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि आपण आपल्या आवडीच्या नेत्याला मतदान करू शकतो. तुमच्या आवडत्या उमेदवाराला मतदान करा, आम्ही त्यालाच मतदान करू जो देशाचा विकास करत आहे, असं राधे माँ म्हणाल्या.
- 01:44 PM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha: पाचवा टप्पा: 1 वाजेपर्यंत नेमकं किती टक्के झालं मतदान?
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सुरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी 27.78 टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- भिवंडी - 27.34 % मतदान
- धुळे - 28.73 % मतदान
- दिंडोरी - 33.25 % मतदान
- कल्याण - 22.52 % मतदान
- उत्तर मुंबई - 26.78 % मतदान
- उत्तर मध्य मुंबई - 28.05 % मतदान
- उत्तर पूर्व मुंबई - 28.82 % मतदान
- उत्तर पश्चिम मुंबई - 28.41 % मतदान
- दक्षिण मुंबई - 24.46 % मतदान
- दक्षिण मध्य मुंबई - 27.21 % मतदान
- नाशिक - 28.51 % मतदान
- पालघर - 31.06 % मतदान
- ठाणे - 26.05 % मतदान
- 12:53 PM • 20 May 2024
Lok Sabha Election : ओशिवरामध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या ओशिवरा येथील एका मतदान केंद्रावर स्थानिक आमदार भारती लवेकर आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले या मतदान केंद्रात फिरत असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला असून या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- 12:41 PM • 20 May 2024
Lok Sabha Election : EVM मशीन बंद असल्याने आदेश बांदेकर संतापले
पवईमध्ये आदेश बांदेकरांनी संताप व्यक्त केला. EVM मशीन बंद असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर त्यांनी याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
- 12:15 PM • 20 May 2024
Lok Sabha Election : मिलिंद नार्वेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
आज सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर लोकांची गर्दी दिसत आहे. आता मिलिंद नार्वेकर यांनीही मतदानाचा बक्क बजावला आहे.
- 12:12 PM • 20 May 2024
Lok Sabha Election : भारती कामडी यांनी बजावला मतदानाचा हक्क
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी यांनी सेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबसहित आपला मतदानाचा हक्क बजावला.
- 11:55 AM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha: पाचवा टप्पा: 11 वाजेपर्यंत नेमकं किती टक्के झालं मतदान?
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरू झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- भिवंडी - 14.79 % मतदान
- धुळे - 17.38 % मतदान
- दिंडोरी - 19.50 % मतदान
- कल्याण - 11.46 % मतदान
- उत्तर मुंबई - 14.71 % मतदान
- उत्तर मध्य मुंबई - 15.73 % मतदान
- उत्तर पूर्व मुंबई - 17.01 % मतदान
- उत्तर पश्चिम मुंबई - 17.53 % मतदान
- दक्षिण मुंबई - 12.75 % मतदान
- दक्षिण मध्य मुंबई - 16.69 % मतदान
- नाशिक - 16.30 % मतदान
- पालघर - 18.60 % मतदान
- ठाणे - 14.86 % मतदान
- 11:51 AM • 20 May 2024
Lok Sabha Voting Live : महाराष्ट्रात पहिल्या चार तासांत किती मतदान?
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज (२० मे) सकाळी ७ वाजेपासून सुरु झाले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक - १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण - ११.४६ टक्के
ठाणे - १४.८६ टक्के
मुंबई उत्तर - १४.७१ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - १७.५३ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - १७.०१ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण - १२.७५ टक्के - 09:48 AM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha election Live : पहिल्या दोन तासांत महाराष्ट्रात किती झालं मतदान?
सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ६.३३ टक्के मतदान झाले. पहा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी...
भिवंडी -4.86
धुळे - 6.92
दिंडोरी - 6.40
कल्याण - 5.39
उत्तर मुंबई - 6.19
उत्तर मध्य मुंबई - 6.01
उत्तर पूर्व मुंबई - 6.83
उत्तर पश्चिम मुंबई - 6.87
दक्षिण मुंबई - 5.34
दक्षिण मध्य मुंबई - 7.79
नाशिक - 6.45
पालघर - 7.95
ठाणे - 5.67
- 08:20 AM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha phase 5 live : अभिनेत्री जान्हवी कपूरने केले मतदान
अभिनेत्री जान्हवी कपूरने मुंबईत मतदान केले. 'घराबाहेर पडा आणि मतदान करा', असे आवाहन जान्हवीने मतदारांना केले.
- 08:04 AM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha election Live : कोणत्या मतदारसंघात कसं सुरूये मतदान, प्रत्येक क्षणाची अपडेट लाईव्ह
- 07:44 AM • 20 May 2024
Palghar Lok Sabha election 2024 : भारती कामडी यांनी केले मतदान
पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार भारती कामडी यांनी शेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबसहित आपला मतदानाचा हक्क बजावला.
- 07:37 AM • 20 May 2024
Maharashtra Lok Sabha Election voting Live : अंनिल अंबानी, अक्षय कुमारने केले मतदान
पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुंबईत मतदान केले. त्याचवेळी अक्षय कुमार-फरहान अख्तर मतदानासाठी सकाळीच मतदान केंद्रावर आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT