लाइव्ह

Maharashtra lok sabha 2024 3rd phase Voting Live : संतापलेल्या मतदाराने EVM मशीनच जाळले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election Voting Phase 3 Updates : महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांसाठी आज (७ मे) मतदान होत आहे. 

ADVERTISEMENT

या मतदारसंघात होत आहे मतदान

बारामती लोकसभा, रायगड लोकसभा, उस्मानाबाद लोकसभा, लातूर लोकसभा, सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा, सांगली लोकसभा, सातारा लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा, कोल्हापूर लोकसभा, हातकणंगले लोकसभा.

देशातील कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?

देशभरात ९३ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. यात सर्वात जास्त जागांसाठी गुजरातमध्ये म्हणजे २५ जागांसाठी मतदान होत आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ११, कर्नाटकात १४, छत्तीसगडमध्ये ७, पश्चिम बंगाल ४, आसाम ४, बिहार ५, मध्य प्रदेश ९, दादरा-नगर-हवेली, दमण दीव २, गोवा २, उत्तर प्रदेश १०. 

ADVERTISEMENT

  • 01:31 PM • 09 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: तिसऱ्या टप्प्यात 6 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी किती?

    • तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात 62.59% मतदान झालं आहे.
    • सांगली मतदारसंघात 62.27% मतदान झालं आहे.
    • बारामती मतदारसंघात 59.50% मतदान झालं आहे.
    • हातकणांगले मतदारसंघात 71.11% मतदान झालं आहे.
    • कोल्हापूर मतदारसंघात 71.59% मतदान झालं आहे.
    • माढा मतदारसंघात 63.65% मतदान झालं आहे.
    • उस्मानाबाद मतदारसंघात 63.88% मतदान झालं आहे.
    • रायगड मतदारसंघात 60.51% मतदान झालं आहे.
    • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 62.52% मतदान झालं आहे.
    • सातारा मतदारसंघात 63.16% मतदान झालं आहे.
    • सोलापूर मतदारसंघात 59.19% मतदान झालं आहे.
  • 06:07 PM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: तिसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी किती?

    • तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात 55.38% मतदान झालं आहे.
    • सांगली मतदारसंघात 52.56% मतदान झालं आहे.
    • बारामती मतदारसंघात 45.68% मतदान झालं आहे.
    • हातकणांगले मतदारसंघात 62.18% मतदान झालं आहे.
    • कोल्हापूर मतदारसंघात 63.71% मतदान झालं आहे.
    • माढा मतदारसंघात 50.00% मतदान झालं आहे.
    • उस्मानाबाद मतदारसंघात 52.78% मतदान झालं आहे.
    • रायगड मतदारसंघात 50.31% मतदान झालं आहे.
    • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 53.75% मतदान झालं आहे.
    • सातारा मतदारसंघात 54.11% मतदान झालं आहे.
    • सोलापूर मतदारसंघात 49.17% मतदान झालं आहे.
  • 06:01 PM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: संतापलेल्या मतदाराने EVM मशीनच जाळले!

    लोकसभा मतदारसंघातील सांगोल्या तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदार केंद्रावरती मतदारांनी ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ  ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली  संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांगोला पोलीस ठाण्यात सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • 04:27 PM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: तिसऱ्या टप्प्यात 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी किती?

    • तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात 44.48% मतदान झालं आहे.
    • सांगली मतदारसंघात 41.30% मतदान झालं आहे.
    • बारामती मतदारसंघात 34.96% मतदान झालं आहे.
    • हातकणांगले मतदारसंघात 49.94% मतदान झालं आहे.
    • कोल्हापूर मतदारसंघात 51.51% मतदान झालं आहे.
    • माढा मतदारसंघात 39.11% मतदान झालं आहे.
    • उस्मानाबाद मतदारसंघात 40.92% मतदान झालं आहे.
    • रायगड मतदारसंघात 41.43% मतदान झालं आहे.
    • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 44.73% मतदान झालं आहे.
    • सातारा मतदारसंघात 43.83% मतदान झालं आहे.
    • सोलापूर मतदारसंघात 39.54% मतदान झालं आहे.
  • ADVERTISEMENT

  • 01:42 PM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 1 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात 32.71% मतदान झालं आहे.

    सांगली मतदारसंघात 29.65% मतदान झालं आहे.

    बारामती मतदारसंघात 27.55% मतदान झालं आहे.

    हातकणांगले मतदारसंघात 36.17% मतदान झालं आहे.

    कोल्हापूर मतदारसंघात 38.42% मतदान झालं आहे.

    माढा मतदारसंघात 26.61% मतदान झालं आहे.

    उस्मानाबाद मतदारसंघात 30.54% मतदान झालं आहे.

    रायगड मतदारसंघात 31.34% मतदान झालं आहे.

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 33.91% मतदान झालं आहे.

    सातारा मतदारसंघात 32.78% मतदान झालं आहे.

    सोलापूर मतदारसंघात 29.32% मतदान झालं आहे.

  • 01:05 PM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: धैर्यशील माने यांची राजू शेट्टींवर जोरदार टीका

    दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं काम राजू शेट्टी करतात. त्यांच्या बुडक्या डोक्याला मीच फेटा बांधणार. इचलकरंजी शहराला पाणी कोण देणार हा येणारा काळच ठरवेल. त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काय कामे केली हे जनतेला माहित आहे, असे धैर्यशील माने यांनी म्हटले.

  • ADVERTISEMENT

  • 11:44 AM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    • तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात 20.74% मतदान झालं आहे.
    • सांगली मतदारसंघात 16.61% मतदान झालं आहे.
    • बारामती मतदारसंघात 14.64% मतदान झालं आहे.
    • हातकणांगले मतदारसंघात 20.74% मतदान झालं आहे.
    • कोल्हापूर मतदारसंघात 23.77% मतदान झालं आहे.
    • माढा मतदारसंघात 15.11% मतदान झालं आहे.
    • उस्मानाबाद मतदारसंघात 17.06% मतदान झालं आहे.
    • रायगड मतदारसंघात 17.18% मतदान झालं आहे.
    • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 21.19% मतदान झालं आहे.
    • सातारा मतदारसंघात 18.94% मतदान झालं आहे.
    • सोलापूर मतदारसंघात 15.69% मतदान झालं आहे.
       
  • 09:53 AM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: महाराष्ट्रात पहिल्या दोन तासात किती झालं मतदान? महाटक्केवारी..

    • तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात 7.91% मतदान झालं आहे.
    • सांगली मतदारसंघात 5.81% मतदान झालं आहे.
    • बारामती मतदारसंघात 5.77% मतदान झालं आहे.
    • हातकणांगले मतदारसंघात 7.55% मतदान झालं आहे.
    • कोल्हापूर मतदारसंघात 8.04% मतदान झालं आहे.
    • माढा मतदारसंघात 4.99% मतदान झालं आहे.
    • उस्मानाबाद मतदारसंघात 5.79% मतदान झालं आहे.
    • रायगड मतदारसंघात 6.84% मतदान झालं आहे.
    • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 8.17% मतदान झालं आहे.
    • सातारा मतदारसंघात 7.00% मतदान झालं आहे.
    • सोलापूर मतदारसंघात 5.92% मतदान झालं आहे.
  • 09:40 AM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: सोलापूरात कोणत्या केंद्रात EVM मध्ये बिघाड?

    सोलापूरातील पाथुर्डीमध्ये 20 मिनिटांपासून EVM बंद आहे. 

  • 08:51 AM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: शरद पवारांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

    शरद पवार, सुप्रिया सुळे, रेवती सुळे यांच्यासह मतदानासाठी रवाना झाले होते. शरद पवार काटेवाडी मतदान केंद्रावर मतदान पोहोचले असून त्यांनी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, तर सुप्रिया सुळे यांनी बारामती शहर येथे मतदान केलं आहे. सुप्रिया सुळेंविरूद्ध सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवत आहेत, अशात ही भावकीची लढत पाहणं रंजक ठरणार आहे.
     

  • 08:37 AM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: लातूरमध्ये देशमुख कुटुंबीयांसह अभिनेता रितेश-जेनेलियाने केलं मतदान

    आपल्या मूळगावी बाभळगाव येथे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी कुटुंबासह आज मतदानाचा हक्कबजावला. तसंच तरूणांसह वृद्धांपर्यंत सर्वांनी नक्की मतदान करावं असं आवाहन देशमुख कुटुंबीयांनी केलं आहे. 

  • 08:01 AM • 07 May 2024

    Maharasthra Lok Sabha Election Phase 3 Voting: पंतप्रधान मोदींनी केले मतदान

    Lok Sabha election Third phase updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी गुजरातमधील अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. मोदी गाडीने मतदान केंद्रावर पोहोचले. तिथे गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते.  

    "आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन करतो. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील", असे आवाहनही मोदींनी मतदारांना केले. 

     

  • 07:49 AM • 07 May 2024

    Baramati Lok Sabha updates : अजित पवारांनी पत्नी आणि आईसह केलं मतदान

    बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार आणि आईसह मतदान केंद्रावर सकाळीच मतदान केलं. 

    यावेळी अजित पवार म्हणाले की, "सुनेत्रा, मी आणि आईने मतदान केलं. ही भावकीची निवडणूक नाही. आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचे दाखवले. पण, माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. माझी आई माझयासोबत आहे."

    "विकासाला महत्त्व द्यायचं आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक केली असून, निवडून येण्यासाठी प्रचार केला. कामे करण्यासाठी केंद्राचा निधी हवा आहे. जनतेने नेहमी साथ दिली, आजही साथ देईल. महायुतीने चांगलं काम केलं आहे. उन्हामुळे थोडा परिणाम होतो, पण नागरिकांनी मतदान करावं", असे आवाहन त्यांनी केले. 

    "पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय. आज ते आरोप करीत आहेत. तुम्ही स्वतः  pdcc बँक उघडी बघितली का? जो आरोप करतोय, त्यावर परिणाम झाला आहे असं वाटत आहे. मी त्याला उत्तर देत नाही", असे अजित पवारांनी सांगितले.  

    "माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. फक्त 3 कुटुंब माझ्या विरोधात आहे बाकी कुणी माझ्या विरोधात नव्हते", असेही ते यावेळी म्हणाले.

     

  • 07:37 AM • 07 May 2024

    Maharashtra voting Live : तिसरा टप्पा - 11 मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार

    1. रायगड लोकसभा मतदारसंघ
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- सुनील तटकरे
    शिवसेना (ठाकरे) - अनंत गीते
    वंचित - कुमुदिनी चव्हाण
     
    2. बारामती लोकसभा मतदारसंघ
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) - सुनेत्रा पवार
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) - सुप्रिया सुळे

    3. धाराशिव लोकसभा मतदारसंघ
    भाजप - अर्चना पाटील
    शिवसेना (ठाकरे) - ओमराजे निंबाळकर 
    वंचित - भाऊसाहेब आंधळकर
     
    4. लातूर लोकसभा मतदारसंघ
    भाजप - सुधाकर श्रृंगारे
    काँग्रेस - शिवाजीराव कलगे
    वंचित - नरसिंहराव उदगीरकर 

    5. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 
    भाजप - राम सातपुते
    काँग्रेस - प्रणिती शिंदे

    6. माढा लोकसभा मतदारसंघ
    भाजप - रणजितसिंह नाईक निंबाळकर 
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) - धैर्यशील मोहिते पाटील
    वंचित - रमेश बारसकर

    7. सांगली लोकसभा मतदारसंघ
    भाजप - संजय काका पाटील (विद्यमान)
    शिवसेना (ठाकरे) - चंद्रहार पाटील
    अपक्ष - विशाल पाटील (वंचित पाठिंबा)
    ओबीसी स्वतंत्र पक्ष - प्रकाश शेंडगे

    8. सातारा लोकसभा मतदारसंघ
    भाजप - उदयनराजे भोसले
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - शशिकांत शिंदे
    वंचित - प्रशांत कदम
    अपक्ष - अभिजीत बिचुकले

    9. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
    भाजप - नारायण राणे
    शिवसेना (ठाकरे) - विनायक राऊत
    वंचित - मारोती काका जोशी

    10. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
    शिवसेना (शिंदे ) - संजय मंडलिक (विद्यमान)
    काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती 

    11. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
    शिवसेना (शिंदे) - धैर्यशील माने 
    शिवसेना (ठाकरे) - सत्यजित पाटील 
    स्वाभिमानी - राजू शेट्टी 
    वंचित - दादासाहेब चवगौंडा पाटील

follow whatsapp

ADVERTISEMENT