Maharashtra Lok Sabha Election Live : "टेंडरसाठी दबाव आणणाऱा आरोग्यमंत्रीच आहे का?" तानाजी सावंत वादात
Lok Sabha Election Maharashtra Live News : लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून, सातव्या टप्प्यातीलच मतदान बाकी आहे. लोकसभा निकालाची तारीख जवळ येत असून, वेगवेगळे अंदाज आणि राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत... वाचा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : लोकसभा २०२४ निवडणूक सात टप्प्यांमध्ये होत असून, सहा टप्पे पू्र्ण झाले आहेत. आता शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.
ADVERTISEMENT
यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी अशी लढत होत असून, महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लढा आहे. देशाच्या निकालाबरोबरच महाराष्ट्रातील निकालाकडेही सगळ्याचे लक्ष आहे.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान होत असताना निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काही अंदाज मांडले आहेत. यादव यांच्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजप पुन्हा सत्तेत येईल असे काही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. तर काही विश्लेषकांच्या मते भाजपला स्वःबळावर बहुमत मिळणार नाही, पण एनडीएला मिळेल. त्यामुळे या निकालाची उत्सुकता वाढली आहे.
दुसरीकडे पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत... महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात काय घडतंय वाचा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
- 05:14 PM • 26 May 2024
Maharashtra News Live : "हिंमत असेल तर 'त्यावर' रोखठोक लिहा", ऱाऊतांना भाजपचं चॅलेंज
नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी मोदी-शाह-फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून केला आहे. त्यांच्या या दाव्यावरून भाजपने पलटवार केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांनी एका विषयाचा उल्लेख करत त्यावर रोखठोक लिहिण्याचे चॅलेंज दिले आहे.
बावनकुळे म्हणाले, "उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?"
"आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार."
"२०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या!"
- 03:35 PM • 26 May 2024
Maharashtra News : "टेंडरसाठी दबाव आणणाऱा आरोग्यमंत्रीच आहे का?" तानाजी सावंत वादात
- 12:14 PM • 26 May 2024
Lok Sabha Election Live : भाजप पुन्हा सत्तेत येणार?
देशात लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान होत असताना निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काही अंदाज मांडले आहेत. यादव यांच्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजप पुन्हा सत्तेत येणार? यादवांनी काय मांडलं गणित?
भाजप 240 - 260
एनडीए 35 - 45
काँग्रेस 85 - 100
इंडिया 120 - 135
- 12:13 PM • 26 May 2024
Lok Sabha Election Live : मोदी म्हणाले, "मी अविनाशी आहे"
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान केले आहे.
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, "काशी ही अविनाशी आहे. मी काशीचा आहे म्हणून मी अविनाशी आहे."
"पंडित जवाहरलाल नेहरू हे तीन वेळा पतंप्रधान राहिले आहेत. मी तीन वेळा, पाच वेळा, सात वेळा जिंकू शकतो. मला १४० कोटी भारतीयांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे होत राहणार आहे", असे मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT