Lok Sabha Election 2024 : नेतृत्वाला विनंती, मला सरकारमधून मोकळं करावं- देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचे निकाल हाती आले आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. बघा प्रत्येक अपडेट लाईव्ह...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live News Updates: लोकसभा निवडणूकीचे निकाल हाती आले आहेत. त्यानंतर हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं आहे. तर देशात एनडीएला बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. अशाच राजकीय तसंच इतर अपडेट्ससाठी मुंबई Tak चा हा लाइव्ह ब्लॉग नक्की वाचा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 06:56 PM • 05 Jun 2024
नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सर्वांचे- संजय राऊत
नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांनी काँग्रेससोबतही काम केलं आहे. त्यामुळे ते सर्वांचे आहेत. नरेंद्र मोदींचं काम हम करे सो कायदा आहे. त्यामुळे त्याला इतर पक्षांना घेऊन सरकार चालवणं कठीण आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
- 06:55 PM • 05 Jun 2024
Maharashtra News : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची पिछेहाट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. यासह त्याने राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या निवासस्थानी जमली आहे. राजीनामा त्यांनी मागे घ्यावा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे.
- 05:04 PM • 05 Jun 2024
Maharashtra News : विशाल पाटील खर्गेंची भेट घेणार?
विशाल पाटील उद्या किवा पर्वा दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत.सांगली लोकसभा विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून पाठिंबा देणार आहेत. विश्वजीत कदम यांच्यासोबत विशाल पाटील दिल्लीत येणार आहेत.
- 03:23 PM • 05 Jun 2024
Maharashtra News : नेतृत्वाला विनंती, मला सरकारमधून मोकळं करावं- देवेंद्र फडणवीस
'मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, जनतेचा आशीर्वाद मिळाला. निकालानंतर देशातल्या जनतेचं आभार मानतो. राज्यात ज्यांना जास्त जागा मिळाल्या मी त्यांचंही अभिनंदन करतो. आम्हाला नॅरेटीव्हची लढाई लढावी लागली, आम्ही कमी पडलो. भाजप पक्ष, 'इंडिया' आघाडीपेक्षा मोठा पक्ष राहिला. महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. राज्यात अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. आम्ही काही जागा अगदी 2-3 हजाराच्या फरकाने हरलो. कांद्याच्या प्रश्नाचा निश्चित काहीसा परिणाम झाला. जो काही पराभव झाला असेल जागा कमी आल्या असतील त्याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी सुधारतो, मी हे मान्य करतो की, मी स्वत: कुठेतरी कमी पडलेलो आहे आणि ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करणार आहे. पक्षाला मी अजून एक विनंती करतो, आता मला विधानसभेकरता, पूर्णवेळ त्याठिकाणी उतरायचं आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शिर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल.' असं देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत स्पष्ट म्हणाले आहेत.
- 03:11 PM • 05 Jun 2024
संजय शिरसाट यांचे अत्यंत मोठे विधान
एनडीएचं सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितेश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. सरकारला कोणताच धोका नाही, सव्विस पक्षांपेक्षा या चार पक्षाचं सरकार केव्हाही चांगलं, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
- 01:51 PM • 05 Jun 2024
Maharashtra News : जयंत पाटील-उद्धव ठाकरेंच्या भेटीला, मातोश्रीवर बैठक!
'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर गेले आहेत. नाशिकचे नव निर्वाचित खासदार राजाभाऊ वाजेही उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झाले आहेत.'
- 01:16 PM • 05 Jun 2024
Maharashtra News : माझ्या आयुष्यातील विचित्र निवडणूक- पंकजा मुंडे
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, 'विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील. माझ्या आयुष्यातील ही वेगळी आणि विचित्र निवडणूक होती. मी कोणाची अवहेलना केली नाही, प्रक्षोभक बोलले नाही.' असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
- 12:30 PM • 05 Jun 2024
Lok Sabha News : 'नितीश कुमारांसोबत संपर्क करण्याची...', शरद पवार नेमकं काय म्हणाले?
'आजच्या बैठकीत आम्ही पुढची रणनीती ठरवू. नितीश कुमारांसोबत संपर्क करण्याची आमच्यात अजून चर्चा नाही. त्यामुळे कुणाच्या नावाच्या अजून चर्चा नाहीत. आज आम्ही संध्याकाळी एकत्र बसून चर्चा करू, पुढची दिशा ठरवू. सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. जनतेत मोदींबाबत नाराजी आहे.' पत्रकार परिषदेत शरद पवार असं स्पष्टच बोलले.
- 12:13 PM • 05 Jun 2024
Maharashtra News : राज्यात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार?
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आज भाजप अंतर्गत बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे.
- 11:59 AM • 05 Jun 2024
Maharashtra News : 'मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली'- संजय राऊत
'लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका. नरेंद्र मोदी हे भगवान ते पराभूत झाले आहेत. मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली आहे. तुम्ही पराभव स्वीकारा बीजेपीला बहुमत मिळालं नाही', असं राऊत म्हणाले.
- 10:11 AM • 05 Jun 2024
Mumbai News : मुंबईत पावसाला सुरुवात
निवडणूक प्रचारात निर्माण झालेल्या गरम वातावरण आणि उन्हाचा पारा वाढल्यानंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर मुंबईतील सर्वच भागात पाऊस पडत आहे.
- 09:49 AM • 05 Jun 2024
Lok Sabha News : 'पक्ष जिंकला नाही म्हणून मी...', लोकसभा निवडणुकीतील पराभवावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रीया
'लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो.
मी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानतो. अशा आशयाचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.ॲड. आंबेडकर म्हणाले की, मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला.
पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही.माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू. असेही त्यांनी नमूद केले आहे.' असं प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट केलं आहे.
- 09:43 AM • 05 Jun 2024
Lok Sabha : आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक!
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्न होणार असल्याचं समजत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT