Maharashtra News Live : मोठी बातमी! 'या' जिल्ह्यांना रेड तर कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट
Maharashtra News Live updates : भाजपच्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना आज मुंबईत बोलावण्यात आले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या अनुषंगाने आमदारांना मार्गदर्शन करतील. अशाच राजकीय तसंच इतर अपडेट्ससाठी हा लाइव्ह ब्लॉग वाचा...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Live Updates : लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात दुपारी एक वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे.
ADVERTISEMENT
यासंदर्भातील सर्व लाइव्ह अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचा...
ADVERTISEMENT
- 07:14 PM • 08 Jun 2024
मोठी बातमी! 'या' जिल्ह्यांना रेड तर कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि इतर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे.
- 05:42 PM • 08 Jun 2024
Monsoon News: पावसामुळे नागरिकांना दिलासा, काही भागांमध्ये अजूनही प्रतीक्षा कायम
गोंदिया जिल्ह्यात आज काही भागात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचे आगमन झाले जिल्ह्यात काही भागात उन तर काही भागात पाऊस आल्याने अनेक भागातील नागरिकांना आता उघड्यापासून दिलासा मिळणार आहे तर काही भागांमध्ये उकाळा कायम असल्याची दिसून आले आहे .मात्र जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.
- 04:24 PM • 08 Jun 2024
Maharashtra News : कोल्हापूरात मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. 9, 10 आणि 11 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
- 04:02 PM • 08 Jun 2024
Satara News: म्हसवड येथे एका शेतात लांडग्यांच्या कळपाने तब्बल 15 शेळ्या मेंढ्यांचा पाडला फडशा
म्हसवड येथील विरकरवाडी नजिकच्या शिंदे वस्ती शेत शिवारातील धनाजी शिंदे यांच्या बंदीस्त मेंढराच्या वावरीत लांडग्याच्या टोळीने प्रवेश करुन त्यामधील तब्बल 15 शेळ्या व मेंढरांचा फडशा पाडला.एकाच वेळी तब्बल 12 मेंढराची कोकरी व तीन शेळ्या लांडग्यांना ठार केल्या.या घटनेत श्री. शिंदे कुटुंबाचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
- 03:43 PM • 08 Jun 2024
Maharashtra News : पडलेले किल्ले आम्ही पुन्हा जिंकणार- देवेंद्र फडणवीस
'मोदींचं अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलोत. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत. लोकांनी NDA आणि मोदींवर विश्वास ठेवला. या निवडणुकीत आपण सिंहाचा वाटा उचलू शकलो नाही. महाराष्ट्रात अपेक्षित यश आपल्याला आलं नाही. अपयशाची कारणं आपण शोधून काढू. नव्यानं पेरण्याची वेळ आता आलीये. देवेंद्र फडणवीस हा लढणारा व्यक्ती आहे. लोकसभा निवडणुकीत आपण कमी पडलो. पडलेले किल्ले आम्ही पुन्हा जिंकणार... विधानसभेच्या तोंडावर माझ्याकडे अनेक रणनिती आहेत. मुंबईत विरोधकांपेक्षा आपल्याला 2 लाख मतं जास्त आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशात आपलं सरकार आलंय. खोट्या मुद्द्याची ताकद एका निवडणुकीपुरती असते.' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र भाजपच्या बैठकीत बोलले.
- 01:39 PM • 08 Jun 2024
Maharashtra News : मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंबडच्या तहसीलदार
अंबड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार धनश्री भालतीन यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलीय. शासन स्तरावर मागण्या मान्य करण्यासंदर्भात कारवाई सुरू, तुम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू नये. अशी मागणी नायब तहसीलदार यांनी जरांगे यांच्याकडे केलीय. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याच मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांचा निरोप शासनाला कळविणार असल्याची प्रतिक्रिया नायब तहसीलदार धनश्री भालतीन यांनी दिलीय.
- 01:31 PM • 08 Jun 2024
Maharashtra News : रवींद्र धंगेकर यांचा खोचक टोला
खासदार मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दिल्लीतल्या फोटोचा प्रश्न विचारताच रवींद्र धंगेकरांनी हात जोडले. मेधाताई आणि त्यांचे पटलं हेच महत्त्वाचा आहे कोथरूडचे हे दोघे एकत्र आले हेच पुण्यासाठी मोठी गोष्ट, रवींद्र धंगेकर यांचा खोचक टोला
- 12:33 PM • 08 Jun 2024
Maharashtra lok sabha News : प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
उद्धव ठाकरेंनी २१ जागा लढल्या ९ जागा मिळाल्या, शिंदेंनी १५ लढवल्या ७ मिळाल्या, कोंकणाचीही जागा गेली. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली पण यश मिळालं नाही, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
- 12:25 PM • 08 Jun 2024
Maharashtra News : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास ग्रामपंचायतीकडून पाठिंबा
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणास अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीने पाठिंबा दिलाय. ग्रामपंचायतीने उपोषणाला पाठिंबा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिलीय. यावर जरांगे म्हणालेत की आम्ही अंतरवाली सराटीतील गावकर्यांच्या सह्या घेतल्या त्यावर सर्व जातीच्या लोकांच्या सह्या आहेत. दोन दिवसात गावातील 900/950 सह्या झाल्याच जरांगे म्हणालेत. ग्रामपंचायतची उपोषणासाठी आतापर्यंत कोणी परवानगी घेतली असं म्हणत परवानगी घेण्याचा काय संबंध आहे असा सवाल जरांगे यांनी विचारलाय. मला गावाचा पाठिंबा पहिल्यापासूनच आहे आणि आता ग्रामपंचायतनेही ठराव घेतल्याची प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे. गावात थोडं राजकारण चालू असतं, मी त्यावर लक्ष देत नाही आणि देणारही नाही अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी अंतरवाली सराटी ग्रामपंचायतीने दिलेल्या पाठिंब्यावर दिली आहे.
- 09:36 AM • 08 Jun 2024
Mumbai Local News : उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक!
रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (9 जून) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
- 09:27 AM • 08 Jun 2024
Maharashtra News : 'जयंत पाटील स्वतः अजित पवार गटात येणार...', धर्मरावबाबा आत्राम यांचं मोठं विधान!
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या निराशाजनक संख्याबळानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटात आमदारांच्या निष्ठा बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर बोलावलेल्या बैठकीत देखील धर्माराबाबा आत्राम सहभागी झाले नव्हते. त्यावरून भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मात्र स्वतः धर्मरावबाबा आत्राम यांनी आपण अजित पवार यांच्या सोबतच राहणार असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत या गटात येणार असल्याचे विधान आत्राम यांनी केले. दिल्लीत भक्कम सरकार स्थापनेनंतर आता लवकरच हे घडून येईल असेही आत्राम म्हणाले.
- 09:24 AM • 08 Jun 2024
Maharashtra News : नाशिक महामार्गावर कळंब जवळ कंटेनरला धडकल्याने एक ठार
पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यात कळंब जवळ वरपे मळा येथे समोरून चालणाऱ्या कंटेनर ने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारा मोटरसायकल स्वार धडकल्याने एका तरुण युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव जाकीर बशीर सय्यद टिकेकरवाडी(ता. जुन्नर) असे आहे.हा युवक हा शेतीची खते घेऊन नारायणगावच्या दिशेने चालला होता. त्याच्या समोर डीजे एक्सपोर्टस या कंपनीचा कंटेनर लोड घेऊन चाललेला होता.परंतु पुढे चाललेल्या कंटेनर चालकाला मागून येणाऱ्या मोटरसायकलस्वार न दिसल्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला असता मोटरसायकलस्वार मागील बंपरला धडकून जागीच गत प्राण झाला सदर मोटरसायकल व कंटेनर मंचर पोलीस ठाण्यात नेऊन घटनेचा तपास मंचर पोलीस स्टेशनचे एस आय गणपत डावकर हे करत आहेत.
- 09:16 AM • 08 Jun 2024
Maharashtra News : उद्धव ठाकरेंना मुस्लिम व्होटबँकेकडून भरभरुन मतदान
लोकसभा निवडणूक 2024 शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची होती. पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरेंसाठी ही महत्त्वाची लढाई होती. अशातच यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लीम व्होटबँकेकडून भरभरुन मतदान झालं आहे. लोकसभेतील हे आकडे हादरवणारे आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT