लाइव्ह

Lok Sahba 2024 Live : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Arvinde kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ED ची टीम दाखल
social share
google news

Maharashtra News live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोंडी, भेटीगाठींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीकडूनही काही जागांची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. याबद्दलचे ताजे अपडेट्स वाचा....

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • 07:47 PM • 21 Mar 2024

    ED ची टीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी, अटक होणार?

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली आहे. ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. सध्या त्यांच्या घराबाहेर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान एक्साईज पॉलिसी प्रकरणात आतापर्यंत 9 समन्स ईडीने केजरीवालांना बजावले आहे. या प्रकरणात आधीच उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएसच्या नेत्या के कविता यांना ईडीने अटक केली आहे. 
     

  • 07:06 PM • 21 Mar 2024

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला आहे. या अपघाताल गाडीच्या बोनेटचा चक्काचूर झाला आहे.सुदैवाने या अपघातात रामदास आठवले बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आहे. 

  • 05:43 PM • 21 Mar 2024

    'ठाकरेंनी औरंगजेबी वृत्ती दाखवली', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

    हे दुदैव आहे देशभक्त मोदींनी देशाला वेगळ्या उंचीवर नेहून ठेवलं, मोदींनी बाळासाहेब यांचं राम मंदीर व ३७० कलम हटवलं ही स्वप्न पूर्ण केली. त्या मोदींना औरंगजेब म्हणणे हा देशाचा अपमान आहे. मोदींना औरंगजेबाची तुलना करणे हा देशद्रोह आहे. यांची निंदा करावी तितकी थोडी आहे. कारण औरंगजेब वृत्ती त्याने दाखवली, त्यांनी भावालाही सोडलं नाही, बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही दाखवली नाही. तिच  औरंगजेबीची वृत्ती त्यांनी दाखवली. याचे उत्तर महाराष्ट्राची जनता मतपेटीतून देईल. मोदी साहेबांच्या अपमानाचा सूड मतपेटीच्या माध्यमातून घेईल 

    निवडणुका जाहिर झालेल्या आहेत महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा आल्या पाहिजेत यासाठी शिवसैनिकांनी काम केलं पाहिजे याची आढावा बैठक घेतली. या जागा जिंकता कशा येतील यासाठी ही महत्वाची बैठक होती
     

  • 05:42 PM • 21 Mar 2024

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, SBI ने इलेक्टोरल बाँड नंबर्ससह सर्व डेटा दिला निवडणूक आयोगाला

    स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले की अल्फान्यूमेरिक नंबरसह इलेक्टोरल बाँड्सचे सर्व तपशील निवडणूक आयोगा समोर उघड केले आहेत. 21 मार्च 2024 रोजी, SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडचे सर्व तपशील दिले आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 05:38 PM • 21 Mar 2024

    या निवडणुकीत आपण योग्य मतदान नाही केले तर लोकशाही संपेल - प्रणिती शिंदे

    ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची निवडणूक आहे, ही निवडणूक करो या मरो अशी ठरणार आहे. या निवडणुकीत आपण योग्य मतदान नाही केले तर लोकशाही संपेल तर संविधान संपेल असे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 05:37 PM • 21 Mar 2024

    शेतकऱ्यांच्या खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो, आचारसंहितेचा भंग होतोय – रोहिणी खडसे

    खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो आहेत. शहराच्या भिंती रंगून ठेवल्या आहेत. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल राष्ट्रवादीच्या रोहीणी खडसे यांनी केला आहे

  • ADVERTISEMENT

  • 04:20 PM • 21 Mar 2024

    Lok sabha election 2024 : प्रचाराला येणारच, पण विजयी सभेलाही येणार -उद्धव ठाकरे

    "शाहू महाराजांची भेट घेतली. ठाकरे कुटुंब आणि छत्रपतींच्या कुटुंबाचे ऋणानुबंध सगळ्यांना माहिती आहे. ते असेच घनिष्ठ राहतील. शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. मी महाराजांना तसं वचन दिलं आहे की, प्रचाराला येणारच, पण विजयी सभेलाही येणार. या संघर्षात विजय मिळावा म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो. आशीर्वाद घेऊन निघालोय", असे ठाकरे म्हणाले.

  • 03:49 PM • 21 Mar 2024

    Lok sabha election 2024 : मी केस कापायला चाललोय, माझ्या मागे येऊ नका -राज ठाकरे

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर राज ठाकरे घरी आले. त्यानंतर दुपारी ते घराबाहेर पडले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलून घेतले. राज ठाकरे म्हणाले, "मी केस कापायला चाललो आहे. माझ्या मागे येऊ नका. मला काहीही विचारू नका."

  • 03:14 PM • 21 Mar 2024

    ९००० कोटीचं घबाड जमा करून... वडेट्टीवारांची मोदींवर टीका

    काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याच्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाला निवडणूक लढता येऊ नये यासाठी INCOME TAX Dept ला हाताशी धरून काँग्रेस पक्षाच्या बँक अकाउंटशी संबंधित ३० वर्षे जुनी म्हणजे १९९४-९५ पासून आता पर्यंतची सर्व फाईली उघडून केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी इन्कम टॅक्स विभागाला कामी लावले आहे." 

    "२०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ येताच इन्कम टॅक्स विभागाने आधी काँग्रेसी पक्षाची बँक खाती गोठवली. आणि आता ही उचापत! १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे, नरेंद्र मोदी स्वतः १० वर्षांपासून पंतप्रधान आहे मग १० वर्षात हा तपास का करण्यात आला नाही ?"

    "दुसऱ्यांचे पक्ष फोडून, बाँडच्या माध्यमातून ९००० कोटीचं घबाड जमा करून ही निवडणुकीत स्वतःचा पराभव जवळ दिसत असल्यामुळे ही केविलवाणी धडपड भाजपची सुरू आहे", असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 
     

  • 12:52 PM • 21 Mar 2024

    ठाकरे, शिंदे, फडणवीसांची दीड तास चर्चा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तीन नेत्यांची आज ताज लॅण्ड्स हॉटेलमध्ये बैठक झाली. दीड तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर तिन्ही नेते माध्यमांशी न बोलता निघून गेले. 

    माहितीनुसार, मनसेला दोन जागा हव्या आहेत. दक्षिण मुंबई, शिर्डी किंवा नाशिक जागांची मागणी मनसेने केली आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांना या जागा दिल्या जातात का? असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडून काय भूमिका मांडली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. 

  • 11:21 AM • 21 Mar 2024

    शाहांसोबत खलबतं; मनसेला महायुतीत घेण्यासाठी हालचाली वाढल्या

    राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन शाह यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. 

    देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून मुंबईत परतताच राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे चर्चा करत आहे. तिन्ही नेत्यांची बैठक ताज लँड्स हॉटेलमध्ये सुरू आहे. 

  • 10:57 AM • 21 Mar 2024

    अमित शाहांच्या भेटीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीत

    सातारा लोकसभा मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळणार, याचा सस्पेन्स वाढला आहे. गेल्या वेळी पराभूत झालेले उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. मात्र, उमेदवारीबद्दल अनिश्चितता असल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. उदयनराजे भोसले अमित शाह यांची भेट घेणार आहे. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. 

  • 08:26 AM • 21 Mar 2024

    काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत काय चर्चा झाली?

    काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, "जवळपास १८ जागांवर चर्चा झाली आहे. उद्या (२१ मार्च) सकाळी दहा वाजता मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची बैठक होणार आहे. त्यामध्ये काही जागांवर शिक्कामोर्तब होईल. स्कोप आणि मेरिटच्या आधारावर काही निर्णय घेतले जातील. आज आमचा १५ जागांवर फायनल निर्णय झालेला असून त्याची यादी उद्या जाहीर केली जाईल."

  • 08:24 AM • 21 Mar 2024

    मविआची आज 'वंचित बहुजन आघाडी'शिवाय बैठक

    आज (२१ मार्च) सकाळी मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीमधील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सकाळी १० वाजता सिव्हर ओक येथे मविआ नेत्यांची बैठक होत असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलेले नाही. आंबेडकरांसोबत मविआची बोलणी फिस्कटल्याचं चित्र यामुळे पुढे आले आहे. 

    बुधवारी (२० मार्च) दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांची नावे आणि मतदारसंघाबद्दल चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची असणार आहे. लोकसभेच्या जागावाटपाचाही महाविकास आघाडी अंतिम निर्णय घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

follow whatsapp

ADVERTISEMENT