लाइव्ह

Maharashtra News Live : माझा अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय होईल- श्रीरंग बारणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Marathi News Live Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी देखील करता येणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 03:34 PM • 21 May 2024

    maval lok sabha : विजय तर माझाच- श्रीरंग बारणे

    'मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कुठे ही ताकद नाही. मतदारांचा कौल पाहता माझा अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय होईल.चिंचवड आणि पनवेल येथून मला लाखापेक्षा अधिक लीड मिळणार आहे. हे लीड विरोधक तोडू शकणार नाही,' असा दावा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला.

     

  • 12:34 PM • 21 May 2024

    Maharashtra News Live: ठाकरे कुटुंब 4 जूननंतर लंडनला पळण्याच्या तयारीत- नितेश राणे

    “उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि संजय राऊत यांचं गाऱ्हाणं बघून पुन्हा मोदीच येणार हे समजलं. ठाकरे कुटुंबीयांचे पासपोर्ट जप्त करावेत. कारण 4 जून नंतर ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत आहे,” अशा शब्दांत नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

  • 11:28 AM • 21 May 2024

    HSC Results 2024: महाराष्ट्रात '12वी'चा 93.37 टक्के निकाल जाहीर! 

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra HSC Results 2024 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. 

  • 10:38 AM • 21 May 2024

    Pune Accident : पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा- संजय राऊत

    'पोलीस आयुक्तांविरोधात जनतेनं आंदोलन केलं पाहिजे. आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला देतायेत. पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा. हा सर्व पैशांचा खेळ सुरू आहे.' अशा शब्दात संजय राऊतांनी पुणे अपघात प्रकरणावर आक्रमक भूमिका मांडली. 

  • ADVERTISEMENT

  • 10:23 AM • 21 May 2024

    Pune Accident : 'मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे'

    पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांनीच मला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं म्हटलय. मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याची परवानगी नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे, असं पोलीस चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितलय. कल्याणीनगर घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले

  • 09:49 AM • 21 May 2024

    Mumbai Live news Update : CSMT च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन 20 मिनिटे उशीरा

    मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेन 20 मिनिट उशिरा आहेत. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहाड, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्टेशवर चाकरमान्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT