लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 'या' जागांवर उमेदवार ठरला असणार समावेश?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi, amit shah, lok sabha
pm narendra modi, amit shah, lok sabha
social share
google news

Maharashtra News Live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. दुसरीकडे लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरू असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून घोषणा होऊ शकते. याबद्दलचे अपडेट्स आणि इतर घटनांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा मुंबई तक लाईव्ह ब्लॉग...

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • 06:41 PM • 13 Mar 2024

    भाजप दुसरी उमेदवार यादी जाहीर करणार

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवारी यादी जाहीर करणार आहे. या जागा हिमाचल प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु, तेलंगाणा राज्याील असणार असल्याची माहीती आहे. त्यामुळे आता भाजपकडून लोकसभेसाठी कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

  • 04:03 PM • 13 Mar 2024

    शिंदे सरकारचा मोठा निर्णय, अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर

    लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करण्यात आल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता दिली असून, केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हे नामांतर होणार आहे.  

  • 02:13 PM • 13 Mar 2024

    ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

    31 मार्चपर्यंत या महाराष्ट्र सरकारने, घटनाबाह्य सरकारने स्वत:च्या जाहिरातीवर 85 कोटी देऊन टाकले आहेत. नुसत्या नुसत्या जाहिराती...मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा कोरोनाच्या जाहीराती यायच्या, त्यावेळी कोरोनाचा तो व्हायरस दिसायचा, आता यांची दाढी दिसते, म्हणजे कळत नाही कोरोना व्हायरसने नवीन रूप धारण केले आहे की काय? रोज दिसायला लागला, इतके तिकडे बसवर पण काम शुन्य, अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली आहे. 
     

  • 01:58 PM • 13 Mar 2024

    ठाकरेंचा जोरदार हल्ला, 'थापाड्या भाजपविरोधात...'

    जमिनीवरती सुर्यापेक्षा जास्त आग या थापाड्या भाजपविरोधात पेटली आहे. 10 वर्ष यांनी नसुत्या थापा दिल्यात यांनी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  

    इकडून तिकडे गेले आणि राखी बांधावी, भय्या मेरे राखी के बंधन को निभाना, सगळे भ्रष्ट गोळा करतायत, असा हल्ला ठाकरेंनी मोदींवर चढवला. राखी बांधणाऱ्या बहिनीने केलेला भ्रष्टाचार मोदींनी झाकुन ठेवला. 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेले अजित पवार कुठे आहे. आदर्श घोटा्ळा करणारे अशोक चव्हाण कुठे आहेत, असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. 

    भापज पक्षाला भ्रष्टाचारीच चाकं लागली आहेत. मिंधे, अजित पवार, अशोक चव्हाण ... पण तुमचे पुढचे रुळ जनतेने उखडून टाकले आहे, अशी टीका ठाकरेंनी महायुतीवर केली आहे. 

    शेतकरी म्हणून तुम्ही एकजुटीने शिवसेनेला मतदान करत आला आहात. तसे मतदान तुम्हाला करावचं लागेल. तुमच्या हक्काचा माणूस हा तिकडे पाठवावा लागेल. जे मोदी सरकार दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या काटे टाकतंय, खिळे ठोकतंय, अश्रू धुर सोडतोय, त्या मोदी सरकारला दिल्लीत येऊ न देण्याची जबाबदारी मी शेतकऱ्यांवर सोपवतोय.हे काम तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले आहेत. 

  • ADVERTISEMENT

  • 01:37 PM • 13 Mar 2024

    "भाजपचे 250 खासदार असे आहेत, जे पुन्हा निवडून येणार नाहीत"

    भाजप अनेक खासदारांची तिकिटे कापणार, अशी चर्चा आहे. याकडे पत्रकारांनी संजय राऊत यांचं लक्ष वेधलं. ते म्हणाले की, "भाजपने हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचंच तिकीट कापलं. ती भीती आहे निवडून न येण्याची. भाजपमधले किमान 250 खासदार असे आहेत, जे परत निवडून येणार नाही. 400 पारचा जो नारा आहे, तो कदाचित 200 पार पर्यंतच थांबू शकेल, असे चित्र आहे. त्यामुळे एका-एका जागेसाठी भाजप रोज रात्रीचे बारा तास वाया घालवतोय. रोज 12 तास, रात्री. एका-एका जागेवर चर्चा करण्यासाठी... अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा दिली. जी भाजपकडे आहेच, ती जागा टिकावी म्हणून भाजप एका नेत्याला राज्यसभा देत असेल, काँग्रेस पक्षाच्या तर याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे, हे लक्षात घ्या."

  • 12:52 PM • 13 Mar 2024

    मनसे सोडताच वसंत मोरेंना दोन पक्षांकडून ऑफर, लोकसभा लढवणार?

    पक्षातील गटबाजीला कंटाळून वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला. मनसेतून बाहेर पडताना वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. 

    वसंत मोरे यांना काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार मोहन जोशी यांनी कॉल करून पक्षात येण्याची ऑफर दिली. स्वतः 
    वसंत मोरे यांनीच ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, "दोन पक्षांनी संपर्क साधला आहे."

    "काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे. माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता, तसेच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा त्यांना ऑफर दिली आहे", अशी माहिती त्यांनी दिली. 
     
    “मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. कुणाकडून लढणार ते लवकरच जाहीर करणार आहे. कालच्या निर्णयामुळे माझ्या आईला दुःख झालं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला राज ठाकरेंशी बोलायचं नाहीय. अविनाश जाधव यांनी काही बोलू नये, अन्यथा मलाही बोलावं लागेल आणि लवकरच त्यांच्या टीकेला उत्तर देणार", असा इशारा वसंत मोरेंनी दिला आहे. 

  • ADVERTISEMENT

  • 11:05 AM • 13 Mar 2024

    काँग्रेसला आणखी धक्का, माजी मंत्र्यांच्या भाजप प्रवेश

    राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ज्या नंदुरबारमधून महाराष्ट्रात दाखल झाली. तिथला एक महत्त्वाचा नेता भाजपमध्ये दाखल झाला आहे. 

    नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी बुधवारी (13 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. पद्माकर वळवी यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. 

    नंदूरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व पद्माकर वळवी यांनी केलेले आहे. पद्माकर वळवी हे राज्याच्या क्रीडा खात्याचे मंत्री होते. 

    नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी एक म्हणून पद्माकर वळवींची ओळख आहे. 2009 मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला.

  • 09:54 AM • 13 Mar 2024

    "महाराष्ट्रात लवकरच मोठे भूकंप होतील", गिरीश महाजनांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

    लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात मोठे राजकीय धक्के बसणार, असे विधान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले आहे. ते म्हणाले की, "मी याआधी देखील सांगितलं होतं की, माझ्या संपर्कात काँग्रेसमधील अनेक नेते आहेत. अनेक भूकंप होतील. त्यापैकीच एक म्हणजे अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला. ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील", असे सूचक विधान महाजन यांनी केले.

    "शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. शिल्लक सेना आणि शरद पवार यांची शिल्लक राष्ट्रवादी, त्यांनी स्वतः कडे बघावं. आणखी काही नेते भाजपमध्ये येतील. जे आज टीका करत आहेत ते उद्या आमच्यात प्रवेश करतील. मी सर्वांची नावे घेत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची रॅली जशीजशी मुंबईत शिवाजी पार्क येथे येईल तसे अनेक धक्के त्यांना बसतील", असे महाजन यांनी म्हटले आहे.

  • 09:23 AM • 13 Mar 2024

    भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार?

    भाजपने महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांत एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये जागावाटपावरून अद्याप चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये अकाली दलासोबत, तर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. या बैठकीत नितीन गडकरींना नागपूर, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, जालना रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा झाली. महाराष्ट्रातील २५ जागांबाबत भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली असून ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.  

follow whatsapp

ADVERTISEMENT