Uddhav Thackeray : मोदींबद्दल प्रश्न ऐकताच ठाकरेंना हसू अनावर, असं काय घडलं?
Uddhav Thackeray vs PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मताधिक्य 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत प्रचंड घटले आहे. यावरून आता त्यांना लक्ष्य केले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोदींची ठाकरेंनी उडवली खिल्ली
मोदींच्या मताधिक्याची देशभरात चर्चा
वाराणसी लोकसभा मतदारसंघ निकाल २०२४
Uddhav Thackeray on PM Modi : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मोदींनी विजयाची हॅटट्रिक केली असली, तरी त्यांच्या मताधिक्याची चर्चा जास्त होत आहे. याच मुद्द्यावरून जेव्हा ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ठाकरेंना हसू अनावर झाले. त्याला उत्तर देताना ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवली. (Uddhav Thackeray Reaction on PM Modi’s victory margin)
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या वचननामा आज (12 जून) उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे परत निघाले तेव्हा त्यांना पंतप्रधान मोदींच्या मताधिक्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांना हसू अनावर झाले.
मोदींबद्दल प्रश्न ऐकून ठाकरे का हसले?
झालं असं की ठाकरे वचननामा जाहीर केल्यानंतर परत निघाले. त्याचवेळी 'मोदींचे मताधिक्य जे घटलेले आहे, त्यावर भाजप नेते असे म्हणताहेत की,जग हळहळले. मोदींना जागा कमी आल्या त्यामुळे जग हळहळले', असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला.
हेही वाचा >> शरद पवारांचा खासदार अजित पवारांसोबत जाणार, सत्य काय?
हा प्रश्न ऐकताच माघारी निघालेले ठाकरे हसतच येऊन खुर्चीवर बसले. त्यानंतर त्यांनी मोदींबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिले.
