'विचार केला नव्हता अशा परिस्थितीतून जावं लागतंय'; आलिया भट्टची पोस्ट व्हायरल

आलिया क्वारंटाईन काळातील अनुभव सोशल मीडियावरून सांगत असते.
'विचार केला नव्हता अशा परिस्थितीतून जावं लागतंय'; आलिया भट्टची पोस्ट व्हायरल

देशभरात कोरोनाचा कहर असून बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यामध्ये नुकतंच अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली. आलिया क्वारंटाईन काळातील अनुभव सोशल मीडियावरून सांगत असते. तर आज तिने कोरोनामुळे काय वेदना होतायत हे देखील सांगितलं आहे.

इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर आलियाने हार्पर निकोलस याचा एक कोट शेअर केलाय. या कोटचा अर्थ, “कधी विचार केला नव्हता अशा परिस्थितीतून सध्या जावं लागतंय. हे सर्व तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं ज्याविषयी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.” आलियाच्या या पोस्टवरून सध्या ती खूप कठीण काळातून जात असल्याचं स्पष्ट होतंय.

एका दिवसापूर्वी आलियाने तिचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती तिच्या टेडीसोबत दिसत होती. दोन दिवसांपूर्वी आलियाने तिला कोरोना झाला असल्याची माहिती दिली होती. आलिया सध्या होम क्वारंटाईनमध्ये असून डॉक्टरांच्या सूचनेने ती वैद्यकीय उपचार घेतेय.

आलिय भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होती. दरम्यानच्या काळात संजय लीला भन्साळी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी सिनेमाचं शूटींग बंद करण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in