Aashram 3 Trailer : आश्रम येणार भेटीला, ३ जूनला दर्शन देणार 'भगवान निराला'

Aashram 3 Trailer : बॉबी देओलची वेबसीरिज आश्रम ३ चा ट्रेलर रिलिज झाला आहे, प्रकाश झा दिग्दर्शित ही सीरिजचा तिसरा सिझन कसा असणार याची उत्सुकता
Aashram 3 Trailer : आश्रम येणार भेटीला, ३ जूनला दर्शन देणार 'भगवान निराला'
Bobby Deol's Ashram 3 will be released on Max Player

Aashram 3 Trailer Release: आपल्या खास अंदाजात काशीपूरवाला बाबा निराला परत येतो आहे. होय आश्रम या वेबसीरिजचा तिसरा सिझन येतो आहे. बदनाम आश्रमाचे दार ३ जूनला उघडणार आहे. काशीपूरवाला बाबा निराला आता आपल्या खास अंदाजात लोकांना चकित करायला येतो आहे. बॉबी देओलची मच अवेटेड सीरिज आश्रम ३ चा तिसरा सिझन येतो आहे. या सीरिजचा ट्रेलर रिलिज झाला आहे. इतर दोन सिझनपेक्षाही हा सिझन जास्त चर्चेत राहिल आणि लोकांना आवडेल अशी चिन्हं दिसत आहेत. कारण ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आश्रम सीरिजमध्ये बॉबी देओलच्या अभिनयाचं कौतुक

सिझन ३ मध्ये बाबा निरालाचं काळं सत्य समोर येणार आहे असं दिसतं आहे. या सीरिजमध्ये अनेक ट्विस्ट्स असणार आहेत हेच ट्रेलर सांगतो आहे. या सीरिजच्या तिसऱ्या सिझनचं आणखी एक आकर्षण आहे इशा गुप्ता. होय या सिझन इशा गुप्ताही असणार आहेत. अंधश्रद्धा, राजकारण, बलात्कार आणि ड्रग्ज अशा सगळ्यांशी संबंधित घडामोडी या सीरिजमध्ये दिसणार आहेत. लोकांसाठी काम करणारा, समाजसेवेला आयुष्य वाहिलेला बाबा निराला हा जगासमोर आला आहे. आश्रमाच्या नावाखाली तो काय काय करत असतो, कोणत्या काळ्या करामती करतो? या सगळ्याची उत्तरं पहिल्या दोन सिझनमध्ये मिळाली आहेत.

आता उत्सुकता आहे ती तिसऱ्या सिझनची. कारण या सगळ्या घडामोडी जगासमोर कधी आणि कशा येतात? हे सगळं या सीरिजमधून कळणार आहे. या वेब सीरिजमध्ये बाबा निरालाची भूमिका बॉबी देओलने केली आहे. त्याच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुकही झालं आहे. या सीरिजचं दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केलं आहे. यामध्ये त्रिधा चौधरी, ईशा गुप्ता, चंदन रॉय, दर्शन कुमार आणि आदिती पोहनकर यांच्याही भूमिका आहेत.

आश्रम या वेबसीरिजवरून वादही झाला होता. ही सीरिज MX Player वर स्ट्रीम होणार आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सेटवर पोहचत तोडफोड केली होती. प्रकाश झावर हिंदुंना आणि आश्रम पद्धतीला बदनाम केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला होता.

Related Stories

No stories found.