अभिनेत्री भूमी पेडणेकर करतेय कोरोना रूग्णांची मदत; ‘त्या’ घटनेनंतर घेतला निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाने कहर माजवला असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये भूमी पेडणेकर तसंच तिच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. योग्य उपचारांनंतर भूमी आणि तिच्या आईने कोरोनावर मात केली.

या परिस्थितीनंतर भूमीने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. इंडिया टूडेला दिलेल्या इंटरव्ह्यू दरम्यान बोलताना भूमी म्हणाली, “ज्यावेळी मला कोरोना झाला होता त्यावेळी मी फार घाबरले होते. त्याचसोबत आईला देखील कोरोना झाल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करावं लागलं होतं. तिला प्लाझ्मा मिळवणं माझ्यासाठी फार कठीण झालं होतं. आणि त्यावेळी मला समजलं की माझ्यासाठी हे इतकं कठीण आहे तर सामान्य लोकांची काय परिस्थिती असेल. या गोष्टींनंतर मग मी लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला.”

भूमी पुढे म्हणते, “त्यावेळी लोकांच्या मदतीसाठी सोशल मीडिया हा योग्य प्लॅटफॉर्म होता. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मदतीसाठी मग मी सोशल मीडियाचा पर्याय निवडला. या ठिकाणी मी एक टीम तयार केली. या माध्यमातून आम्ही ज्या लोकांना प्लाझ्माची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोवत आहोत. सध्या मदतीसाठी मला अनेकांचे फोन येतात. या लसर्व लोकांसोबत मी व्हिडीयो कॉलद्वारे संवाद साधते.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या व्हिडीयोच्या माध्यमातून भूमीने इतर लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे. “सध्या लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या परीने लोकांना मदत करावी. मात्र यावेळी कोरोनाचे प्रोटोकॉल देखील पाळले पाहिजेत,” असंही भूमीने सांगितलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT