Bigg Boss Marathi 3 : Victim Card खेळू नकोस! दोन लग्नांवरुन काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं

स्नेहा वाघचा पहिला पती अविष्कारही बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी
Bigg Boss Marathi 3 : Victim Card खेळू नकोस! दोन लग्नांवरुन काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला रविवारपासून सुरुवात होते आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच या शो मधल्या ड्रामाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती अविष्कार दारव्हेकर हे या शो मध्ये सहभागी झाल्यामुळे सर्वांच्या नजरा या शो कडे लागल्या आहेत.

स्नेहाने ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये प्रवेश करताच आपल्या वैवाहिक जीवनाचा खुलासा केला आहे. स्नेहा वाघने १९ व्या वर्षी अभिनेता अविष्कार दारव्हेकरसोबत लग्न गाठ बांधली होती. मात्र काही काळातच ते विभक्त झाले. यानंतर स्नेहाचं दुसं लग्न केलं परंतू ते लग्नदेखील फार काळ टिकलं नाही. ‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात स्नेहाने तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचं कारणदेखील सांगितलं आहे. यावर अभिनेत्री काम्या पंजाबीने स्नेहावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये काम्या म्हणते, "तुला बिग बॉसच्या घरात जायचं होतं चांगली गोष्ट आहे. तू आलीस देखील, पण आता व्हिक्टीम कार्ड कशाला खेळते आहेस? पहिल्या लग्नाबद्दल मला काहीही माहिती नाही पण दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही सांगू नकोस, तुला माहिती आहे मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळू नकोस."

Bigg Boss Marathi 3 : Victim Card खेळू नकोस! दोन लग्नांवरुन काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं
Bigg Boss Marathi 3 : टॉवेलवरुन घरात झालं पहिलं भांडण, मीरा-जय मध्ये जुंपली; पाहा व्हिडीओ

दरम्यान, स्नेहाचा दुसरा पती अनुरागनेही काम्या पंजाबीच्या ट्विटवर आपली प्रतिक्रीया देत स्नेहा वाघला, बाहेर आलीस की मी तुला कधी त्रास दिला याचे पुरावे देण्याचं आव्हान दिलं आहे.

स्नेहाने आपला पहिला पती अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत दुसरं लग्न केलं मात्र हे लग्न जवळपास आठ महिनेच टिकलं. स्नेहा दुसऱ्या पतीपासून देखील विभक्त झाली.

Bigg Boss Marathi 3 : Victim Card खेळू नकोस! दोन लग्नांवरुन काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं
Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात

Related Stories

No stories found.