'मला काम मिळत नव्हतं म्हणून मी.....' पूनम पांडेने केला धक्कादायक खुलासा

जाणून घ्या काय म्हटलं आहे अभिनेत्री पूनम पांडे
'मला काम मिळत नव्हतं म्हणून मी.....' पूनम पांडेने केला धक्कादायक खुलासा

लॉक अप हा रिअॅलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये विविध सेलिब्रिटी भाग घेत आहेत. बबिता फोगाट, निशा रावल यांनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. पूनम पांडेने या शोमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. या शोमध्ये हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींवर काही आरोप केले जातात आणि त्यावर ते स्पष्टीकरण देतात.

अत्यंत बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली आणि कॉन्ट्रोव्हर्सींमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडेनं नुकतीच या शोमध्ये आली होती. या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यात पूनमवर काही आरोप करण्यात आले आहेत. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच माहित नसतानादेखील लोक माझ्याबद्दल मतं व्यक्त करतात” असं म्हणत असताना पूनमने तिने केलेल्या चुकांचीही कबुली दिली. या शोदरम्यान पूनमने धक्कादायक खुलासासुद्धा केला आहे. काम मिळत नव्हतं म्हणून पूनमने कोणती युक्ती लढवली, याबद्दल तिने सांगितलं.

पती सॅम बॉम्बेवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्यामुळे पूनम गेल्या वर्षी चर्चेत आली होती. अलीकडेच तिचं नाव एका पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणातही आलं होतं, ज्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचाही समावेश होता. पूनमने राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांवर फसवणूक, चोरी आणि तिचे फोन नंबर लीक केल्याचा आरोप केला होता. ‘लॉक अप’ या शोमध्ये तिच्यावर झालेल्या आरोपांची कबुली देत पूनमने तिची चूक सुधारणार असल्याचंही स्पष्ट केलं.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनम म्हणाली, “मला काम मिळत नव्हतं म्हणून मी कॉन्ट्रोव्हर्सी केली. मला कामाची खूप गरज होती. काही गोष्टींवर मी डोळे मिटून विश्वास केला. कोणीही मला म्हटलं की एखादी गोष्ट कर किंवा ते केल्याने तुझ्या करिअरला फायदा होईल, तर ते मी आंधणेपणानं करायचे. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे ते निर्णय चुकीचे होते. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेहनत करूनच तुम्ही पुढे येऊ शकता. १५ मिनिटांची प्रसिद्धी ही कधीच महत्त्वाची नसते, हे मला समजलं. यापुढे मी माझ्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करेन. माझ्या कामातून मी स्वत:ला सिद्ध करेन.”

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in