छोट्या पडद्यावरील अभिनेत्री (Tv Actress) तुनिषा शर्माने (tunisha sharma) शनिवारी (24 डिसेंबर) मृत्यूला मिठी मारली. या प्रकरणात पोलिसांनी तिचा एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहम्मद खान (sheezan mohammad khan) याला अटक केलीये. या प्रकरणात नवनवी माहिती समोर येत असून, तुनिषा शर्माच्या काकानी काही दावे केले आहेत. (tunisha sharma uncle says actress was hospitalised after anxiety attack 10 days back)
अभिनेत्री तुनिषा शर्माने शीजान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तुनिषाच्या काकाने गंभीर आरोप केले आहेत. तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. काही गोष्टींमुळे ती त्रस्त होती असं तुनिषाच्या काकाने म्हटलंय.
तुनिषा शर्मा हिच्या काकाने दहा दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली. ते म्हणाले, 'अली बाबा शो सुरू झाल्यानंतर तुनिषा आणि शीजान एकमेकांच्या जवळ आले होते. जवळपास 10 दिवसांपूर्वी तुनिषाला एंजायटी अटॅक (Anxiety attack) आला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं."
तुनिषाचे काका पुढे म्हणाले, 'जेव्हा मी आणि तिची आई (तुनिषाची आई) भेटायला गेलो, तेव्हा तिने सांगितलं की, तिच्यासोबत (तुनिषा शर्मा) चुकीचं घडलं आहे. तिला धोका दिला गेलाय."
"काहीतरी गडबड झालीये, याची आम्हाला कल्पना आली होती. तिच्या आईने तुनिषाला विचारलं होतं की, नातेच ठेवायचं नव्हतं, तर इतक्या जवळ येण्याची काय गरज होती? या प्रकरणात जो कुणी दोषी आहे, त्याला शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे,' असं तुनिषाचे काका म्हणाले.
तुनिषाची मावशी इंग्लंडमध्ये राहते. त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार आहे. मावशी आल्यानंतर तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 27 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहितीही तुनिषाच्या काकाने दिलीये.
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीये. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सरकारकडे ही मागणी केलीये.
श्यामलाल गुप्ता म्हणाले, 'जिथे तुनिषाने आत्महत्या केलीये, आज त्या सेटवर गेलो होतो. तिथले लोक घाबरलेले आहेत. काहीतरी गडबड आहे. सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि एसआयटी चौकशी करावी. खूप काही पुढे येईल. सेटवर महिला सुरक्षित नाहीयेत. सेट खूपच आतमध्ये आहे. तिथे लोकांना जायला यायला भीती वाटत आहे,' असं गुप्तांनी सांगितलं.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकांबरोबरच काही चित्रपटातही भूमिका साकारल्या होत्या. 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल' या मालिकेत ती सध्या काम करत होती. फितूर, बार बार देखो या चित्रपटात तिने कतरिना कैफने साकारलेल्या भूमिकेची तरुणपणातील भूमिका साकारली होती. विद्या बालनची भूमिका असलेल्या कहानी 2 मध्येही तुनिषा शर्माने काम केलेलं आहे. इंटरनेट वाला लव्ह, इश्क सुभानल्लाह, गायब, शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंग या शो मध्येही तिने भूमिका साकारलेल्या होत्या.