'आदिपुरुष' सिनेमात सीतेच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

सितेच्या भूमिकेसाठी दिपीका पदुकोण, क्रिती सेनॉन आणि किर्ती सुरेश यांची नावं चर्चेत होती.
'आदिपुरुष' सिनेमात सीतेच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

दिग्दर्शक ओम राऊत यांचा आदिपुरूष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाहुबली फेम प्रभास आणि अभिनेता सैफ अली खान हे दोघंही या चित्रपटात झळकणार आहेत. रामायणाच्या कथेवर आधारित हा सिनेमा आहे. तर या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण दिसणार याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेरीस या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

आदिपुरुष सिनेमात अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास भगवान राम यांची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सितेच्या भूमिकेसाठी दिपीका पदुकोण, क्रिती सेनॉन आणि किर्ती सुरेश यांची नावं चर्चेत होती. अखेर अभिनेत्री क्रिती सेनॉनची वर्णी लागली आहे.

फोटो शेअर करत त्यासोबत क्रितीने ‘नव्या प्रवासाला सुरुवात’ असं कॅप्शनही दिलंय आहे. तर काही दिवसांपूर्वी ओम राऊत यांनी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. ऑगस्ट 2022 मध्ये आदिपुरूष हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टेकनिक्स या सिनेमामध्ये वापरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सिनेमात व्हीएफएक्सचाही चांगला वापर करण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी यापूर्वी कोणत्याही भारतीय सिनेमात न पाहिलेले हे व्हीएफएक्स असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in