#BirthdaySpecial- ...म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अजय केक कापत नाही!

अजय आज त्याचा 52वा वाढदिवस साजरा करतोय.
#BirthdaySpecial- ...म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अजय केक कापत नाही!

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस आहे. अजय आज त्याचा 52वा वाढदिवस साजरा करतोय. सेलिब्रिटींचा वाढदिवस म्हटला की सेलिब्रेट, केट कटींग आणि मोठी पार्टी या गोष्टी आल्याच. मात्र अभिनेता अजय देवगण त्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करत नाही. इतकंच नाही तर तो वाढदिवसाच्या दिवशी केक देखील कापत नाही.

एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये अजयने स्वतः आपण वाढदिवसाच्या दिवशी केक कापत नसल्याचं सांगितलं होतं. अजय फार शांत स्वभावाचा आहे आणि त्याला कधीही वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याचं मन होत नसल्याचं अजयने सांगितलं होतं. अजय म्हणतो, मी माझा वाढदिवस अजिबात साजरा करत नाही. तुम्ही मला शांत व्यक्ती म्हणू शकता.

अजय पुढे म्हणला, ऑफिसमध्ये किंवा शूटवर असल्यावर केक कापला जातो. मात्र ज्यावेळी मी घरी असतो तेव्हा मी ही जबाबदारी माझ्या मुलांना देतो. मी वाढदिवसाच्या दिवशी जास्त उत्साही नसतो मात्र काजोल आणि माझी आई नेहमी या दिवशी काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असतात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या घरीच छोटी पार्टी साजरी करतात.

दरम्यान सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने अजयने त्याच्या या वाढदिवशी सर्व काही पहिल्याप्रमाणे होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ज्याचं आयुष्य कोरोनामुळे विस्कळीत झालंय त्यांचं जीवन योग्य पद्धतीने मार्गी लागावं अशी अजयची इच्छा आहे. दरम्यान अजयचे भूज, मैदान तसंच आरआरआर हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचप्रमाणे अजय संजय लीला भन्साळी यांच्या गंगबाई काठावाडी सिनेमात देखील छोटीशी भूमिका साकारणार आहे.ो

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in