अनुपम खेर यांचं खास गाणं ऐकलंत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टक्कल पडणं ही अनेक जणांची मोठी समस्या असते. ‘बाला’ तसंच ‘उजडा चमन’ या सिनेमांच्या माध्यमातून टक्कल पडण्याबाबतची समस्या मांडण्यात आली आहे. तर आता या समस्येवर एक गाणंही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. अभिनेते अनुपम खेर यांनी हे गाणं तयार केलं असून या गाण्याचा व्हीडियो त्यांना ट्विटरवर शेअर केला आहे.

या गाण्यामध्ये अनुपम खेर यांनी त्यांचा एक अनुभव शेअर केला आहे. अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ डोक्यावर केस नसणाऱ्या सर्वांना समर्पित केला आहे. ‘ऐ मेरे बिछडे बालो…फिरसे उग जाओ’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अनुपम यांनी हा एक गमतीशीर व्हिडीयो तयार केलाय.

या व्हिडीयोच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर म्हणतात, “40 वर्षांपूर्वी जेव्हा मी चित्रपटात नशीब आजमवण्याठी मुंबईला आलो होतो तेव्हा माझे केस गळून पडत होते. त्यावेळी लोकं ते माझं नशीब म्हणत असतं. आणि मी त्याला माझं वैशिष्ट्य म्हणायचो. यासाठीच मी स्वतःला आणि इतरांना हसवण्यासाठी हे गाणं लिहिलं आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान अनुपम खेर यांनी यापूर्वी देखील हे गाणं गातानाचा व्डिडीयो शेअर केला होता. त्यावेळी अनुपम यांच्या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT