A R Rahman च्या मुलीचा झाला साखरपुडा, पाहा कोण आहे रेहमानचा होणारा जावई.
Ajay Shriram Parchure

A R Rahman च्या मुलीचा झाला साखरपुडा, पाहा कोण आहे रेहमानचा होणारा जावई.

ए.आर. रहमान यांची मुलगी खतिजा रहमानचा साखरपुडा झाला आहे आणि ही आनंदाची बातमी खुद्द म्युझिक मास्टरच्या मुलीने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केली आहे.

ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांची मुलगी खतिजा रहमान, जी आपल्या जादूई संगीतामुळे नेहमीच चर्चेत असते. हिने तिच्या आयुष्यातील एक नवीन इनिंग सुरू केली आहे. खरं तर खतिजा रेहमानची एंगेजमेंट झाली आहे आणि ही आनंदाची बातमी खुद्द म्युझिक मास्टरच्या मुलीने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केली आहे. तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक कोलाज बनवून तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पारंपारिक ड्रेसमध्ये दिसत आहे.

फोटोत, खतिजाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि तिच्याशी जुळणारा हिजाब डोक्यावर बांधला होता. तिने मॅचिंग दुपट्टा आणि डिझायनर मास्क देखील घातला आहे. साऊथमधील संगीताशी संबंधित अनेक सेलिब्रिटी रहमानच्या मुलीचं अभिनंदन करत आहेत. नीती मोहननेही त्यांना त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खतिजा यांच्या पतीचं नाव रियासदीन शेख मोहम्मद आहे.

Ajay Shriram Parchure

29 डिसेंबर रोजी कुटुंबाच्या एका खाजगी समारंभात दोघांनी साखरपूडा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रहमानने या कार्यक्रमात जास्त लोकांना आमंत्रित केलं नाही. यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. रियासदीन हा व्यवसायाने उद्योजक आणि ऑडिओ इंजिनिअर आहे.

Ajay Shriram Parchure

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in