Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB कडून ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्यांदा अटक

वाचा संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB कडून ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्यांदा अटक

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग अर्थात NCB ने शनिवारी अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला तिसऱ्यांदा अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आगिसिल्सला तिसऱ्यांदा ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. मुंबई NCB गोवा NCB यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

NCB ला आगिसिल्सकडे काही प्रमाणात चरस आढळून आलं आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याआधीही आगिसिल्सला अटक करण्यात आली होती. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यावेळी ड्रग्ज पेडलर्सना पकडणं ही मोहीम त्यांनी हाती घेतली होती. बेकायदेशीर मार्गाने जे ड्रग्जचं सेवन आणि तस्करी करत होते त्या लोकांवर धाड टाकून त्यांना पकडण्यात आलं. यामध्ये आगिसिल्सही होता. गेल्या वर्षी सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन समोर आलं होतं.

जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर बॉलिवूडमधल्या अभिनेत्री, डायरेक्टर्स, निर्माते यांचं ड्रग्ज विश्वाशी असलेलं कनेक्शन समोर आलं होतं. सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला या प्रकरणी तुरूंगातही जावं लागलं होतं. त्याशिवाय भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनाही अटक करण्यात आली होती. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांचीही ड्रग्ज प्रकरणात चौकशी झाली होती. त्यामुळे ते प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

सुशांतच्या आयुष्यावर येणार सिनेमा

गेल्या वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. दरम्यान अजूनही सुशांतच्या मृत्यूच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणावर सिनेमा तयार करण्यात आला आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर देखील लाँच करण्यात आला. ‘न्याय- द जस्टिस’ असं या सिनेमाचं नाव आहे.

दिलीप गुलाटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, ‘न्याय- द जस्टिस’ या सिनेमात अभिनेता सुशांतची भूमिका सुशांतची भूमिका जुबेर करत आहे. तर रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया साकारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.