लाडाची गं लेक मालिकेतील अभिनेता आरोह वेलणकरवर नवी मोठी जबाबदारी आली आहे. आरोहच्या घरी नुकतंच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आरोह आता बाबा झाला असून त्याची पत्नी अंकिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
मुलगा झाल्याची गुडन्यूज आरोहने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत त्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीच्या डोहाळं जेवणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आई आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.
3 वर्षांपूर्वी अभिनेता आरोह वेलणकरने त्याची मैत्रिण अंकिता शिंगवी सोबत लग्नगाठ बांधली होती. आरोह आणि अंकिताचं डेस्टिनेशन वेडींग पार पडलं होतं. अंकिताचा सिनेमा किंवा अभिनय क्षेत्राशी कोणताही संबध नाहीये.
दरम्यान प्रविण तरडे यांनी लिहीलेल्या आणि अभिजीत पानसे यांचं दिग्दर्शिन असलेल्या ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं होतं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. त्याचप्रमाणे सध्या तो लाडाची गं लेकं मालिकेत काम करतोय.