Gauri Khan Birthday: आपल्या आईच्या वाढदिवशी तरी आर्यन खान असणार का घरी?

गौरी खानचा आज ५१ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आर्यन खानला जामिन मिळाल्यास तिला जास्त दिलासा मिळेल.
Gauri Khan Birthday: आपल्या आईच्या वाढदिवशी तरी आर्यन खान असणार का घरी?

शाहरूख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. NCB ने ड्रग्स प्रकरणात ही कारवाई केली आहे. क्रूझवरील धाड टाकून NCB ने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेता यांच्यासह इतरांना अटक केली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानच्या वकिलांनी सतीश मानेशिंदे यांनी जामीनाची मागणी केली आहे. याबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे. एनसीबीला देखील उत्तर देण्यास सांगितले आहे. या गोष्टी न्यायालयातील युक्तिवादांवर अवलंबून असताना. जर आर्यन खान जामीन मिळवण्यात यशस्वी झाला, तर तो आई गौरी खानच्या वाढदिवसाला घरी येणार आहे. 8 ऑक्टोबरला शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा वाढदिवस आहे. आर्यनला जामीन मिळाल्यास शाहरुख खान आणि गौरी खानला दिलासा मिळेल.

Related Stories

No stories found.