4 चित्रपटांमध्ये बिग फाईट! 'लाल सिंह चढ्ढा', 'केजीएफ-2'सह प्रभास, वरुणच्या सिनेमाची 'टक्कर'

Laal Singh Chaddha, KGF 2 Release Date : बहुप्रतिक्षित 'लाल सिंह चढ्ढा', 'केजीएफ-2' 'सालार', 'भेडिया' चित्रपट एकाच दिवशी होणार प्रदर्शित
4 चित्रपटांमध्ये बिग फाईट! 'लाल सिंह चढ्ढा', 'केजीएफ-2'सह प्रभास, वरुणच्या सिनेमाची 'टक्कर'
सालार, केजीएफ-२, भेडिया आणि लाल सिंह चढ्ढा एकाच दिवशी झळकणार...India Today

कोरोनामुळे बंद असलेली चित्रपटगृहे सुरू झाली असून, अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या जात आहे. मात्र, एप्रिलमध्ये चार बिग बजेट सिनेमांमध्ये फाईट बघायला मिळणार आहे. एप्रिलमध्ये एकाच दिवशी अभिनेता आमिर खान, अभिनेता यश, अभिनेता प्रभास आणि अभिनेता वरूण धवनचा सिनेमा रिलीज होणार आहे.

आमिर खानच्या बहुप्रतिक्षित लाल सिंह चढ्ढाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शीख नववर्षाला म्हणजेच बैसाखीला लाल सिंह चढ्ढा चित्रपटगृहात झळकणार आहे. याच दिवशी दाक्षिणात्य अभिनेता यश याची केजीएफ-2, प्रभासची भूमिका असलेला सालार आणि वरूण धवनचा भेडिया सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कोणता सिनेमा बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'लाल सिंह चढ्ढा'मध्ये आमिर खानबरोबर अभिनेत्री करिना कपूरची प्रमुख भूमिका आहे. तर 'भेडिया'मध्ये वरूण धवनसह अभिनेत्री कृती सेननची भूमिका आहे. चार बहुप्रतिक्षित एकाच दिवशी प्रदर्शित असल्यानं 14 एप्रिल 2022 बॉलिवूडसाठी मोठा दिवस असणार आहे.

'लाल सिंह चढ्ढा', 'केजीएफ-2', 'सालार', 'भेडिया' या चारही सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, चारही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे.

एप्रिलमध्ये 8 सिनेमे होणार रिलीज

बॉलिवूडसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात एकूण 8 सिनेमे प्रदर्शित होणार आहे. यात अमिताभ बच्चन-अजय देवगन यांची भूमिका असलेला 'स्टारर मे डे', कंगना रणौतचा 'धाकड', आर. माधवनचा 'रॉकेट्री' आणि टायगर श्रॉफचा 'हिरोपंती-2' सिनेमाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in