Bigg Boss 15: घरात एंट्री होण्याच्या आधीच अभिजीत बिचुकले 'या' कारणामुळे बिग बॉसमधून बाहेर. राखी सावंत घेणार घरात एंट्री

मराठी बिग बॉस २ गाजवणाऱ्या अभिजीत बिचकुलेंची वाइल्ड कार्ड एंट्री होणार होती. पण काही कारणामुळे अभिजीत बिचकुलेंची एंट्री थांबवण्यात आली आहे.
Bigg Boss 15: घरात एंट्री होण्याच्या आधीच अभिजीत बिचुकले 'या' कारणामुळे बिग बॉसमधून बाहेर. राखी सावंत घेणार घरात एंट्री
Ajay Shriram Parchure

कलर्स टिव्हीवर सुरू असलेल्या बिग बॉस १५ चे निर्माते आपल्या रियालीटी शो चा टीआरपी वाढवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करत असतात. नुकतीच बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रकारचे बदल करण्यात आले. घरातील सदस्यांपैकी बॉटमला असणाऱ्या ६ सदस्यांची नावं यावेळी घोषित करण्यात आली. आणि त्याजागी घरात काही वाइल्ड कार्ड एंट्री घरात येणार होत्या.. यात मराठी बिग बॉस २ गाजवणाऱ्या अभिजीत बिचकुलेंची वाइल्ड कार्ड एंट्री होणार होती. पण काही कारणामुळे अभिजीत बिचकुलेंची एंट्री थांबवण्यात आली आहे.

कोणत्याही सदस्याला बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यापूर्वी कोरोना गाइडलाईन्सचं पालन करावं लागतं. त्यासाठी त्या सदस्याला घरात एंट्री करण्यापूर्वी काही दिवसांआधी क्वारंटीन केलं जातं. क्वारंटीन पिरीयड संपल्यांवर घरात प्रवेश करण्याआधी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. या टेस्टचा रिझल्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना बिग बॉसच्या सेटवर जाण्याआधी एंटीजन टेस्ट करावी लागते आणि या टेस्टचा रिझल्टही निगेटीव्ह आल्यावर त्यांना घरात जाण्यासाठी प्रवेश दिला जातो.

अभिजीत बिचकुलेंसोबतही अशीच प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र यादरम्यान अभिजीत बिचकुलेंची एंटिजन टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना आता बिग बॉसच्या घरात जाण्यापासून मनाई करण्यात आली आहे. अभिजीत बिचकुले रश्मि देसाई आणि देवोलिना सोबत बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री घेणार होते. मात्र अभिजीत बिचकुले यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने बिग बॉसच्या मेकर्सनी राखी सावंतला बिग बॉसच्या घरात येण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आणि राखी सावंतनेही बिग बॉसच्या या पर्वात जाण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे अभिजीत बिचकुलेंना घरात जाण्यासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. त्यांची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना या पर्वात सहभागी करून घ्यायचं की नाही याविषयी मेकर्स निर्णय घेणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in