Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' आजपासून; रिया चक्रवर्ती दिसणार का? कोण आहेत स्पर्धक?

Bigg Boss update : बिग बॉसची यावेळची थीम जंगल असून, स्पर्धकांसमोर आव्हान असणार आहे...
Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' आजपासून; रिया चक्रवर्ती दिसणार का? कोण आहेत स्पर्धक?
बिग बॉस 15Bigg Boss 15/instagram

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी बिग बॉस 15 (Bigg Boss 15) सज्ज झाला असून, आजपासून शोला सुरुवात होत आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना याविषयी बिग बॉस 15 मध्ये वेगळा अनुभव येणार आहे, कारण यावेळची बिगबॉसची थीम जंगल आहे.

जंगलातून सहभागी स्पर्धकांना घरचा रस्ता शोधावा लागणार असून, मोठं आव्हान असणार आहे. या उल्लेखनीय बाब म्हणजे बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रंचंड उत्सुकता असते. अनेकांना यावेळी रिया चक्रवर्ती सहभागी होणार की नाही, हे जाणून घेण्याबद्दलही उत्सुकता होती. त्याबद्दलही खुलासा झाला आहे.

बिग बॉस 15
Bigg Boss 15 : भेटूया बिग बॉस १५ च्या घरात जाणाऱ्या १५ स्पर्धकांना

रिया चक्रवर्ती सहभागी दिसणार की नाही?

बिग बॉस 15 मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती सहभागी होणार होती. तशी चर्चाही बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी रियाला आठवड्याला 35 लाख रुपयांची ऑफरही देण्यात आलेली होती. मात्र, न्यायालयीन प्रकरणांमुळे ती यावेळी बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाहीये, तसं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर तितलियाँ गाणं गायलेली अफसाना खानही यावेळच्या बिग बॉसमध्ये नसणार आहे.

बिग बॉस 15
रूबीना ठरली बिग बॉसच्या 14 व्या सीझनची विजेती

बिग बॉसमध्ये कोण-कोण असणार?

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये यावेळी तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतिक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करण कुंद्रा, ईशान सहगल, सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधी पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.