Bigg Boss marathi 3 : 'बिग बॉस मराठी 3'मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार

बिग बॉस मराठीचा सिझन 3 आता रंगात : 'रात्रीस खेळ चाले'मधील 'हा' अभिनेता घेणार एन्ट्री
Bigg Boss marathi 3 : 'बिग बॉस मराठी 3'मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार

बिग बॉस मराठीचा सिझन 3 आता चांगलाच रंगू लागलाय. घरात 2 गट तयार झाले आहेत आणि त्यांच्यात रुसवे फुगवे, भांडण, राडे रोजच सुरू असतात. मात्र आता बिग बॉसच्या या घरात एका नव्या स्पर्धकाची एंट्री होणार आहे. या स्पर्धकाची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

कलर्स मराठीवर नुकताच याचा प्रोमो दाखवण्यात आला. ज्यात या अभिनेत्याचा चेहरा दाखवण्यात आला नाही. हॅट घातलेला, पाठमोरा अभिनेता हा आदिश वैद्य आहे. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत आपण त्याला पाहिलं आहे.

आता आदिश घरात एन्ट्री करून कोणत्या ग्रुपमध्ये जातो? आणि कोणाला कसा त्रास देतो हे सोमवारपासून कळेलच! दरम्यान आज रविवारी प्रसारित होणाऱ्या भागात आदिश वैद्य बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेईल.

Bigg Boss marathi 3 : 'बिग बॉस मराठी 3'मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार
Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी'च्या 'सिझन 3' मधून दादूस जाणार बाहेर?

कोण आहे हा आदिश वैद्य ?

विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रसिद्ध असलेला आदिश हा आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 'गुम है किसीके प्यार में' या हिंदी मालिकेत आदिश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र नुकतीच त्याने या शोमधून एक्झिट घेतल्याचं देखील समोर आल आहे.

Bigg Boss marathi 3 : 'बिग बॉस मराठी 3'मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार
Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर

आदिश नेहमी रेवती लेलेसोबतच्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Related Stories

No stories found.