Bigg Boss Marathi : मी घरात येऊन चोपेन एकेकाला...महेश मांजरेकर स्पर्धकांवर भडकले

बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची रंगत आणखीनच वाढली
Bigg Boss Marathi : मी घरात येऊन चोपेन एकेकाला...महेश मांजरेकर स्पर्धकांवर भडकले

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा सुरु आहे. पाच आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेल्यानंतर बिग बॉसच्या घरात खेळाडूंची गटबाजी, राजकारण, भांडणं असे सर्व रंग प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. शनिवारी झालेल्या चावडीत महेश मांजरेकरांनी खेळाडूंची चांगलीच शाळा घेतली.

बिस बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर खेळाडूंबद्दल काही वक्तव्य करतात त्या वक्तव्याचा आधार घेत काही स्पर्धक घरात शेरेबाजी करत असल्याचं मांजरेकरांना लक्षात आलं. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ही गोष्ट लक्षात आल्यानंतर महेश मांजरेकरांनी सर्वांची चांगलीच शाळा घेतली. मी जे शनिवारी बोलतो त्याचं आतामध्ये भांडवलं करायचं नाही, मी बोलतो कारण मला बोलायचा हक्क आहे. मी आतमध्ये येऊन चोपेन एकेकाला, अशा शब्दांत मांजरेकरांनी स्पर्धकांची कानउघडणी केली.

गेल्या आठवड्यात एकूण पाच सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. हे सदस्य होते विशाल निकम, मीनल शाह, जय दुधाणे, तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील. जेव्हा पाच सदस्य नॉमिनेट होतात त्यावेळी त्यातले दोन सदस्य शनिवारीच सेफ होतात. त्याप्रमाणे शनिवारी महेश मांजरेकरांनी सांगितल्याप्रमाणे आणि लोकांनी दिलेल्या मतांप्रमाणे दोन सदस्य सेफ झाले आहेत. हे सदस्य आहेत मीनल शहा आणि विशाल निकम. विशाल गेल्या आठवड्यातही नॉमिनेट झाला होता. मात्र लोकांनी त्याला सेफ केलं आहे. तसंच मीनलनेही फेअर गेम खेळल्याने लोकांनी तिलाही सेफ केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in