Bigg Boss Marathi : उत्कर्षवर भडकले महेश मांजरेकर, म्हणाले तू सर्वात....पाहा व्हिडीओ

हल्लाबोल टास्कदरम्यान उत्कर्षच्या निर्णयावर मांजरेकरांची नाराजी
Bigg Boss Marathi : उत्कर्षवर भडकले महेश मांजरेकर, म्हणाले तू सर्वात....पाहा व्हिडीओ

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची रंगत आता हळुहळु वाढायला लागली आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर घरातील साप्ताहीक कार्यादरम्यान आता उघड-उघड दोन गट पडलेले दिसत आहेत. या दोन गटांपैकी हल्लाबोल कार्यक्रमात झालेल्या टास्कच्यावेळी सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी संचालक उत्कर्षला खडे बोल सुनावले आहेत.

जाणून घ्या काय घडलं घरात?

पहिल्या टीमचे सदस्य बाईकवर बसलेले असताना त्यांना बाईकवरुन उठवण्याचं काम दुसऱ्या टीमकडे होतं. यावेळी दुसऱ्या टीममधील गायत्री आणि जय यांनी मिरचीची धुरी तयार करत पहिल्या टीमच्या सदस्यांना जागेवरुन उठवण्याचा प्रयत्न केला.

परंतू ज्यावेळी दुसऱ्या टीमची हा टास्क करण्याची वेळ आली तेव्हा जय आणि गायत्री हे बाईकवर बसले होते. यावेळी पहिल्या टीममधील सदस्य सोनालीने मिठाचं पाणी तयार करुन त्यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला असता संचालक उत्कर्षाने तिच्या हातातली मिठाच्या पाण्याची बाटली खेचून घेतली.

Bigg Boss Marathi : उत्कर्षवर भडकले महेश मांजरेकर, म्हणाले तू सर्वात....पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi 3: मराठी प्रेक्षकांबद्दल गायत्री दातारने केलं वादग्रस्त वक्तव्य, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

महेश मांजरेकर उत्कर्षवर भडकले -

उत्कर्षच्या या वागणुकीचा महेश मांजरेकर यांनी आपल्या चावडीवर समाचार घेतला. समुद्रात पोहायला गेलास तेव्हा कधी त्रास झालाय का तुला? असा प्रश्न मांजरेकर यांनी उत्कर्षला विचारला. ज्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असलेल्या उत्कर्षला मध्येच थांबवत मांजरेकर यांनी मिरचीची धुरी दिली जात असताना तू ते थांबवलंस का? मिठाच्या पाण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. तू सर्वात एकांगी संचालक असल्याचं मांजरेकर यांनी सांगितलं.

यावेळी मांजरेकर यांनी पहिल्या टीममध्ये खेळणाऱ्या सुरेखा कुडची यांनाही, तु इकुडची का तिकडुची असा प्रश्न विचारत तिच्या खेळाबद्दल प्रश्नचिन्ह उभंकेलं. त्यामुळे आज बिगबॉसच्या चावडीवर कायकाय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi : उत्कर्षवर भडकले महेश मांजरेकर, म्हणाले तू सर्वात....पाहा व्हिडीओ
'गोडसे' सिनेमा आणणार! महेश मांजरेकरांची गांधी जयंतीच्या दिवशी मोठी घोषणा

Related Stories

No stories found.