Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातून मीरा जगन्नाथ बाहेर, तरीही मिळाली गुड न्यूज!
मीरा जगन्नाथफोटो- कलर्स मराठी

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातून मीरा जगन्नाथ बाहेर, तरीही मिळाली गुड न्यूज!

जाणून घ्या कसं पार पडलं आठवड्याच्या मधल्या दिवशीचं एलिमिनेशन

बिग बॉस मराठीच्या फायनलला अवघे काही दिवस उरलेले असताना मीरा जगन्नाथ घरातून बाहेर पडली आहे. अत्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन तिला बाहेर जावं लागलं आहे. सुमारे 94 दिवस मीरा बिग बॉसच्या घरात राहिली आता ती फिनालेला दिसणार आहे. मात्र टॉप फाईव्हमधे आपण नाही याची रूखरूख मनात राहिल असं मीरा जाता जाता म्हणाली.

मीरा जगन्नाथ
मीरा जगन्नाथफोटो-मीरा जगन्नाथ इंस्टाग्राम

एलिमिनेशननंतरही मीराला मिळाली गुड न्यूज!

मीरा घरातून बाहेर पडली आहे तरीही जाता जाता बिग बॉसनी तिला गुड न्यूज दिली. ही गुड न्यूज म्हणजे मीराच्या आई वडिलांनी तिला स्वीकारणं. या दोघांचा एक छोटासा व्हीडिओ मीराला दाखवण्यात आला. त्यामध्ये मीराचे आई वडील तिला म्हणाले की मीरा आम्हाला तुझा अभिमान वाटतो. मीराने 2015 ला टीव्ही, मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडलं होतं.

तेव्हापासून तिचे आई आणि वडिलांचे संबंध काहीसे तणावाचे झाले होते. अशात आज मीराला बाहेर पडताना एक गिफ्टच मिळालं. मला तुझ्या नावाने आज सगळे ओळखतात, तुम्ही मीराचे वडील का? असं विचारतात तेव्हा मला मनातून भरून येतं असं मीराचे वडील म्हणाले तेव्हा मीराच्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तसंच तू बाहेर पडलीस तरीही काही हरकत नाही आमच्यासाठी तू जिंकली आहेस असंही ते तिला म्हणाले.

मीरा जगन्नाथ
मीरा जगन्नाथ फोटो-मीरा जगन्नाथ इंस्टाग्राम

असं पार पडलं एलिमिनेशन

आज बिग बॉसमध्ये आठवड्याच्या मधे एक एलिमिनेशन पार पडलं. त्यात एक नंबर्सचा पट मांडण्यात आला होता. त्यातून बिग बॉसच्या घरातला टॉप फाईव्ह स्पर्धक मिळाले. विशाल निकम याने तिकिट टू फिनाले मिळवलं म्हणून तो आधीच फायनलमध्ये गेला होता. एलिमिनेनशच्या पटावर उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विकास पाटील, मीरा जगन्नाथ आणि मीनल शाह हे उभे राहिले होते. त्यांना एक एक चौकोन पुढे जायला सांगण्यात येत होतं. याच्या चार फेऱ्या पार पडल्या.

सर्वात आधी जय दुधाणे सेफ झोनमध्ये गेला, त्यानंतर विकास पाटील सेफ झोनमध्ये गेला. उत्कर्ष, मीरा आणि मीनल हे तिघे उभे राहिले होते त्यावेळी महेश मांजरेकर निकाल घेऊन आले. त्यांनी चौथ्या सेफ झालेल्या स्पर्धकाचं नाव जाहीर केलं जे होतं उत्कर्ष शिंदे. त्यानंतर मीनल आणि मीरा या दोघींपैकी कोण सेफ होईल असं सेफ झालेल्या सगळ्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी सगळ्यांनी मीनल हेच नाव घेतलं. प्रेक्षकांनी दिलेली मतं आणि त्यानुसार आलेला निकाल महेश मांजरेकर यांनी जाहीर केला. तो होता मीराच्या नावाचं एलिमिनेशन. फायनलला अवघे काही दिवस उरलेले असताना मीरा बाहेर पडली आहे. पण तू स्वतःला कमी लेखू नकोस असं तिला घरातल्या प्रत्येकाने आणि महेश मांजरकेरांनीही सांगितलं.

विशाल निकम, जय दुधाणे, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि मीनल शहा हे पाच स्पर्धक फायनल झाले आहेत. आता यांच्यापैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं आणि तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in