Bigg Boss Marathi 3 : महिला-महिला आणि भांडायला नंबर पहिला, सोनाली आणि तृप्तीमध्ये वादाची ठिणगी

Bigg Boss Marathi 3 : महिला-महिला आणि भांडायला नंबर पहिला, सोनाली आणि तृप्तीमध्ये वादाची ठिणगी

घरातील कामं करण्यावरुन दोघांमध्ये झाला वाद

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. एका आठवड्यातच आता प्रत्येक स्पर्धक स्वतःची रणनिती तयार करुन घरात वावरताना दिसत आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी सोनाली आणि तृप्ती देसाई यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पहायला मिळाली.

घरातील कामं करण्यावरुन तृप्ती आणि सोनालीमध्ये शाब्दीक युद्ध पेटलेलं पहायला मिळालं. यावेळी महिला हक्कांसाठी सैदव आग्रही असणाऱ्या तृप्ती देसाईंनी आवाज चढवत तिला दम भरला आहे. “मी ऐकते म्हणून काहीही बोलायचं नाही. मी बोलते त्याची नीट उत्तरं द्यायची. पुरुष जर काम करू शकतात, तर महिलांनी का करू नये?” असा सवाल तृप्ती देसाईंनी सोनालीला विचारला.

दरम्यान सोनालीनेही आपल्या शैलीत तृप्ती देसाईंना उत्तर दिलंय. “महिलांनाच विरोध करायला या कायम पुढे… महिला, महिला आणि महिला… आणि भांडायला नंबर पहिला!” असे सोनालीने म्हणताच तृप्ती यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते. त्यामुळे यापुढील दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरातला ड्रामा कसा रंगतो याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Bigg Boss Marathi 3 : महिला-महिला आणि भांडायला नंबर पहिला, सोनाली आणि तृप्तीमध्ये वादाची ठिणगी
Bigg Boss Marathi 3 : Victim Card खेळू नकोस! दोन लग्नांवरुन काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं

Related Stories

No stories found.