Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून आविष्कार दारव्हेकर झाला आऊट, या अभिनेत्रीची झाली वाईल्ड कार्ड एंट्री

अविष्कार दारव्हेकरला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. अविष्कार बाहेर गेल्यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून आविष्कार दारव्हेकर झाला आऊट, या अभिनेत्रीची झाली वाईल्ड कार्ड एंट्री
Ajay Shriram Parchure

बिग बॉस मराठीच्या घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर दुसरीकडे एक सदस्य घराबाहेर गेला आहे. सगळेच चाहते दर आठवड्याला वाट बघत असतात, ती म्हणजे बिग बॉसची चावडी कधी भरणार याची. दरम्यान अविष्कार दारव्हेकरला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. अविष्कार बाहेर गेल्यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.

Ajay Shriram Parchure

या आठवड्यात बिग बॉसच्या चावडीवर विशाल निकमची महेश मांजरेकरांनी शाळा घेतली. त्याचे टास्क दरम्यान वागणे भीषण दिसले असे त्यांनी सांगत त्याला खडेबोल सुनावले तर मीनलला सल्ला दिला. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये आलेल्या फॅन्सची चुगली चुगली बूथद्वारे सोनाली, मीरा, गायत्री आणि जयला दाखविण्यात आली.तर दादूस आणि तृप्तीताईंनी बिग बॉसच्या चावडीमध्ये आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

बिग बॉसच्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये होते. या चार जणांमधून अविष्कार दारव्हेकरला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले आहे.

Ajay Shriram Parchure

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in