Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी'च्या 'सिझन 3' मधून दादूस जाणार बाहेर?
संतोष चौधरी उर्फ दादूस आणि तृप्ती देसाई.Dadus Alare Official/facebook

Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी'च्या 'सिझन 3' मधून दादूस जाणार बाहेर?

शनिवारच्या भागात बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी विशाल निकम आणि स्नेहा वाघ हे 2 सदस्य सेफ असल्याचं सांगितलं.

बिग बॉस मराठीच्या सिझन 3 मधून सर्वात मोठी बातमी आली आहे. हा सिझन सुरू होऊन 15 दिवस झाले, मात्र आत्तापर्यंत घराबाहेर नॉमिनेट होऊन एकही सदस्य बाहेर आला नव्हता. मात्र आज (१० ऑक्टोबर) सर्वात कमी वोट मिळाल्याने संतोष चौधरी उर्फ दादूस हे घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. (Bigg Boss Marathi 3)

या आठवड्यात 6 सदस्य नॉमिनेट होते, ज्यात दादूस, तृप्ती देसाई, सुरेखा कुडूची, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि अक्षय वाघमारे हे सदस्य होते. शनिवारच्या भागात बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी विशाल निकम आणि स्नेहा वाघ हे 2 सदस्य सेफ असल्याचं सांगितलं आणि रविवारच्या भागात उरलेल्या 4 सदस्यांपैकी 1 जण घराबाहेर जाईल असं जाहीर केलं होतं.

संतोष चौधरी उर्फ दादूस आणि तृप्ती देसाई.
Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर

जी माहिती मिळाली आहे, त्यात प्रेक्षकांचे सर्वात कमी वोट हे दादूसला मिळाले आहेत. दादूस आणि सुरेखा कुडूची हे 2 स्पर्धक बॉटमला होते आणि त्यांच्यातील कमी वोट मिळालेले दादूस यांना घराबाहेर जावं लागण्याची शक्यता आहे.

सर्वात जास्त वोट विशाल निकमला मिळाले, त्यांनतर स्नेहा वाघ, त्यानंतर अक्षय वाघमारे, त्यानंतर तृप्ती देसाई, मग सुरेखा कुडूची आणि नंतर संतोष चौधरी उर्फ दादूस यांना प्रेक्षकांचे वोट मिळाले. त्यामुळे बिग बॉस मराठी सिझन 3 च्या पर्वातून घराबाहेर पडणारे पहिले सदस्य दादूस ठरणार आहेत.

संतोष चौधरी उर्फ दादूस आणि तृप्ती देसाई.
'उत्कर्ष खेळायला गेलाय, रडून सहानुभूती मिळवायला नाही; चावडीच डबलढोलकी!'

याआधी प्रकृती बरी नसल्याने शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि आता प्रेक्षकांचे कमी वोट मिळाल्याने संतोष चौधरी उर्फ दादूस घराबाहेर पडणार आहेत.

Related Stories

No stories found.