'ताईगिरी' संपली! Bigg Boss च्या घरातून तृप्ती देसाई बाहेर

'ताईगिरी' संपली! Bigg Boss च्या घरातून तृप्ती देसाई बाहेर
तृप्ती देसाई फोटो सौजन्य-कलर्स मराठी

बिग बॉस मराठीच्या घरातला रविवारचा दिवस म्हणजे एलिमिनेशनचा दिवस. या दिवशी घरातून कोण बाहेर पडतं याची उत्सुकता, हुरहुर सगळंच महाराष्ट्राला लागून राहिलेलं असतं. रविवारी म्हणजेच 7 नोव्हेंबरला तृप्ती देसाई या घरातून बाहेर पडल्या. महेश मांजरेकरांनी जेव्हा ही गोष्ट जाहीर केली केली की तृप्तीताई तुमचा या घरातला प्रवास आज इथे संपला आहे तेव्हा बिगल बॉस मराठीच्या घरात असलेल्या सगळ्याच सदस्यांचे डोळे पाणावले. तसंच ताईगिरी संपली हेदेखील या सदस्यांन जाणवलं.

तृप्ती देसाई आणि महेश मांजरेकर
तृप्ती देसाई आणि महेश मांजरेकरफोटो सौजन्य-कलर्स मराठी

कलर्स मराठीवरच्या या रिअॅलिटी शोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या घरात राडे, भांडणं, प्रेम अशा सगळ्याच गोष्टी पाहण्यास मिळत आहेत. गेल्या रविवारी अविष्कार दारव्हेकर हा स्पर्धक बाहेर पडला आणि आता कालच्या रविवारी तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. उत्कर्ष, जय, विशाल निकम, विकास पाटील, सोनाली पाटील, मीरा, प्राजक्ता सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटलं. सर्वात जास्त वाईट वाटलं ते उत्कर्षला कारण त्यानेच तृप्ती देसाईंना नॉमिनेट केलं होतं.

गेल्या आठवड्यात जो नॉमिनेशनचा टास्क पार पडला त्यामध्ये विशाल निकम, मीनल शाह, जय दुधाणे, सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई हे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यांच्यापैकी मीनल शाह आणि विशाल निकम हे दोन खेळाडू कालच सेफ झाले होते.

तृप्ती देसाई
Bigg Boss Marathi 3 च्या घरात आलेली वाईल्ड कार्ड एंट्री आहे तरी कोण?

रविवारी सर्वात आधी सोनाली पाटील सेफ झाली. त्यानंतर जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोघेजण हातात आपल्या नावाची पाटी घेऊनच उभे होते. महेश मांजरेकरांनी तृप्ती देसाईंचा घरातला प्रवास संपल्याचं जाहीर केलं. ज्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. कुणीही मला रडून निरोप देऊ नका जनतेचा कौल मला मान्य आहे असं तृप्ती देसाई म्हणाल्या. मात्र त्यांना निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. तृप्ती देसाई या स्ट्राँग प्लेअर होत्या. त्यांनी टास्कमध्ये सहभाग घेणं असो किंवा संचालक म्हणून चांगली जबाबदारी पार पाडली.

बिग बॉसच्या घरात असताना त्या उत्तम स्वयंपाकही करत होत्या. आता त्यांना या घरातून जायला सांगिलं आहे. त्यांनीही हा निर्णय स्वीकारला आणि त्या म्हणाल्या की जनतेचा कौल मला मान्य आहे. मी पन्नास दिवस घरात होते, मला खूप चांगलं खेळता आलं याचा मला आनंद आहे असंही तृप्ती देसाई म्हणाल्या. आता बलात्कारमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in