BIGG BOSS MARATHI 3 : विशाल निकमने दिलेला शब्द पाळला, घेतली शिवलीला पाटीलची भेट

घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिली कुणाची भेट घेईल तर ती, कीर्तनकार शीवलीला पाटील हिची. आज त्यांना त्याचा शब्द पाळत शिवलीला पाटीलची पंढरपुरात भेट घेतली आहे.
BIGG BOSS MARATHI 3 : विशाल निकमने दिलेला शब्द पाळला, घेतली शिवलीला पाटीलची भेट

बिग बॉस मराठी तीनचा विजेता विशाल निकम झाला आहे. विजयी झाल्यानंतर त्याच्या गावकऱ्यांनी जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. बिग बॉस मराठीच्या घरात विशाल निकमने एक शब्द दिला होता. तो शब्द विशाल निकमने पूर्ण केला आहे.

विशाल निकम बिग बॉस मराठीच्या घरात सांगितले होते की, घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिली कुणाची भेट घेईल तर ती, कीर्तनकार शीवलीला पाटील हिची. आज त्यांना त्याचा शब्द पाळत शिवलीला पाटीलची पंढरपुरात भेट घेतली आहे. या भेटीचा व्हिडिओ शेअर करत त्याने म्हटले आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात....माऊलींच्या पंढरपुरात!ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!

बिग बॉसच्या घरात शिवलीला पाटील हिला माऊली..माऊली असं म्हणत असे. विशालचे आणि शिवलीलाचे घरात खास बॉन्डिंग झालं होते. शिवलीला तिच्या आजरपणामुळे घरात जाऊ लागले. यावेळी विशालला रडू कोसळले होते. मात्र आज या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं शिवलीलाची भेट घेतली आहे. चाहत्यांना देखील या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला आहे.

विशाल निकम हा मराठी मालिकांमधील अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु बिग बॉस मराठीने त्याला एक विशेष ओळख निर्माण करून दिली आहे.बिग बॉसने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं आहे. त्याचा साधा-सरळ स्वभाव प्रेक्षकांना फारच भावून गेला. हा अभिनेता खऱ्या आयुष्यातसुद्धा तितकाच साधा आणि सिम्पल आहे. त्यामुळेच तो या रिऍलिटी शोमध्येसुद्धा तसेच पाहायला मिळाला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in