Bodybuilder मनोज पाटील आत्महत्या प्रयत्न प्रकरणात अभिनेता साहिल खानला हायकोर्टाकडून दिलासा

Bombay High Court has granted relief to actor Sahil Khan in Manoj Patil case: बॉडी बिल्डर मनोज पाटीलच्या आत्महत्या प्रयत्न प्रकरणात अभिनेता साहिल खानला हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
Bodybuilder मनोज पाटील आत्महत्या प्रयत्न प्रकरणात अभिनेता साहिल खानला हायकोर्टाकडून दिलासा
Bodybuilder Manoj Patil case: Bombay High Court has granted relief to actor Sahil Khan(फाइल फोटो)

मुंबई: अभिनेता साहिल खान गेल्या काही काळापासून वादात सापडला आहे. वास्तविक, मिस्टर इंडिया किताब विजेता मनोज पाटील याने साहिल खान मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत थेट आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणी अभिनेता साहिल खानविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. पण आता या प्रकरणी साहिलला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने साहिलच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज (28 सप्टेंबर) सुनावणी घेतल्यानंतर 12 ऑक्टोबरपर्यंत त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

साहिलने आपल्या जामीन अर्जात म्हटले होते की, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही किंवा त्याला कोणत्याही न्यायालयाने आतापर्यंत एखाद्या प्रकरणात दोषी ठरवलेले नाही. त्याच्या मते, मनोजने दाखल केलेला एफआयआर चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. दरम्यान, साहिल खानची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे साहिल खानला मोठा दिलासा मिळाला आहे.

मनोज पाटील
मनोज पाटील

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मिस्टर इंड़िया राहिलेल्या मनोज पाटीलने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 29 वर्षीय मनोज पाटीलने विषारी गोळ्या खाऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मनोजला मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी मनोजच्या कुटुंबीयांनी साहिल खानविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. ज्यात त्याने साहिल खानचा उल्लेखही केला आहे.

मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसंच इतर वादही होते.

याशिवाय साहिल खान गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मनोज पाटील विरोधात व्हिडिओही पोस्ट करत होता. ज्यात मनोज त्याच्या न्युट्रिशन शॉपमधून कसे नकली स्टेरिओईडस विकतो ह्याचे त्याने व्हिडिओ पोस्ट केले होते. ज्या व्हिडिओमध्ये काही फोनवर रेकॉर्ड करण्यात आलेली संभाषणं टाकण्यात आली होती. या विरोधात मनोज पाटीलनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून साहिल खान आपल्याला कसा मानसिक त्रास देतोय हे सांगत होता.

Bodybuilder Manoj Patil case: Bombay High Court has granted relief to actor Sahil Khan
MR India winner Manoj Patil attempted Suicide: अभिनेता साहिल खान मनोज पाटीलला का द्यायचा मानसिक त्रास?

अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो असं मनोजने म्हटलं होतं. आणि हा मानसिक त्रास सहन न झाल्याने मनोजने अखेर आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

साहिल खान एक बॉलिवूड अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.साहिलने त्याच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. या गाण्याचे नाव ‘नाचेंगे सारी सारी रात’ असे होते. त्याचे हे गाणे सुपरहिट ठरले आणि त्यानंतर साहिलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. साहिलचा ‘स्टाईल’ या चित्रपटातील अभिनय आणि त्याचा लूक चांगलाच गाजला होता.

Related Stories

No stories found.