Advertisement

....अन् पद्मिनी कोल्हापुरेंनी चित्रपटाच्या सेटवरच चार्ल्स प्रिन्स यांना केलं होतं किस

त्यावेळी या घटनेची आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये खूप चर्चा झाली होती.
Prince charles and Padmini kolhapure
Prince charles and Padmini kolhapure Bollywood nostalgie

राणी एलिझाबेथ आता आपल्यात नाहीत. गुरुवारी, ८ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या निधनाने संपूर्ण युगाचा अंत झाला. त्यांच्या जाण्यानंतर आता त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स युनायटेड किंगडमचा राजा असेल. प्रत्येकाला प्रिन्स चार्ल्सच्या वारशाची कल्पना असली तरी, बॉलीवूडच्या मराठी अभिनेत्रीशी त्याचे कनेक्शन फार कमी लोकांना आठवते. ही अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे, 'विधाता' आणि 'प्रेम रोग' सारख्या चित्रपटांची मुख्य नायिका. पद्मिनीने एकदा प्रिन्स चार्ल्सच्या गालावर चुंबन घेतले. त्यावेळी या घटनेची आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये खूप चर्चा झाली होती.

प्रिन्स चार्ल्स मुंबईला आले होते

अनेक वर्षांपूर्वी प्रिन्स चार्ल्स मुंबईला आले होते. त्यावेळी भारतात चित्रपटांचे चित्रीकरण कसे होते हे पाहण्याची त्यांना खूप इच्छा होती. या उत्सुकतेपोटी त्यांनी बॉलिवूड चित्रपटाचे शूट पाहिले. प्रिन्स चार्ल्सने आपला एक दिवस हिंदी चित्रपट 'आहिस्ता आहिस्ता'च्या सेटवर घालवला. पाहुणे प्रिन्स चार्ल्स होते, त्यामुळे सेटवर त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आला. दरम्यान, चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिने त्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पहार घातला आणि प्रेमाने हसत पद्मिनीने प्रिन्स चार्ल्सचे गालावर चुंबन घेतले. यानंतर ब्रिटीश मीडियामध्ये पद्मिनीला 'प्रिन्स चार्ल्सचे चुंबन घेणारी महिला' असे संबोधण्यात आले.

या घटनेवरून ब्रिटीश अधिकाऱ्याने पद्मिनीला ओळखले होते

पद्मिनी 2013 मध्ये याबद्दल उघडपणे बोलली होती. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ती म्हणाली, 'प्रिन्स मुंबईत होते आणि त्यांना शूटिंग बघावं असं का वाटलं ते मला माहीत नाही. आम्ही राजकमल स्टुडिओमध्ये 'आहिस्ता आहिस्ता'चे शूटिंग करत होतो. शशिकलाजींनी त्यांची आरती केली आणि मी फक्त गालावर एक छोटेसे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत केले. पण, त्या दिवसांत ती मोठी गोष्ट झाली होती.

मला आठवते मी जेव्हा लंडनला सुट्टीसाठी गेलो होते, तेव्हा एका ब्रिटिश इमिग्रेशन अधिकाऱ्याने मला विचारले, 'तू तीच आहेस ना जिने प्रिन्स चार्ल्सला किस केले होते?' मला खूप लाज वाटली, असा किस्सा तिने शेअर केला. प्रिन्स चार्ल्स शूट पाहण्यासाठी आलेल्या पद्मिनी कोल्हापुरेच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'आहिस्ता आहिस्ता' गणला जातो. या चित्रपटासाठी पद्मिनीला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in