Arjun Kapoor : अभिनेता अर्जून कपूर कोरोना पॉझिटिव्ह, मलायकाचीही होणार चाचणी

Arjun Kapoor Corona Positive : बहिण अंशुल हिलाही कोरोनाचा संसर्ग
Arjun Kapoor : अभिनेता अर्जून कपूर कोरोना पॉझिटिव्ह, मलायकाचीही होणार चाचणी
अभिनेत्री मलायका अरोरासोबत अभिनेता अर्जून कपूर.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, काल रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याचं बघायला मिळालं. त्यातच आता बॉलिवूडमध्येही पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. अभिनेता अर्जून कपूर आणि त्याची छोटी बहीण अंशुला या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. अर्जून कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

कोरोनाचं निदान झाल्यानंतर अर्जून कपूर आणि अंशुला कपूर क्वारंटाईन झाले आहेत. त्याचबरोबर संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं आवाहन अर्जून कपूरने केलं आहे.

ख्रिसमस निमित्त अभिनेत्री मलायका अरोराने घरी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अभिनेता अर्जून कपूरही सहभागी झाला होता. त्याचबरोबर मलायका अरोराची बहीण अमृता अरोराही हजर होती. या पार्टीमध्ये अर्जून कपूर आणि मलायका एकत्र दिसले होते. त्यामुळे मलायका अरोराचीही चाचणी केली जाणार असल्याचं वृत्त आहे. या पार्टीमध्ये करीना कपूर कुटुंबासोबत सहभागी झाली होती. त्यामुळे याच पार्टीमध्ये अर्जून कपूरला कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्री मलायका अरोरासोबत अभिनेता अर्जून कपूर.
मलायका अरोराचं Sizzling Photoshoot

दुसऱ्यांदा झाला कोरोना

अर्जून कपूर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाला आहे. गेल्या वर्षीही त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. सप्टेंबर 2020 मध्ये अर्जून कपूरला कोरोनाचं निदान झालं होतं. त्यावेळी त्याने याची माहिती सोशल मीडियातून दिली होती.

अभिनेत्री मलायका अरोरासोबत अभिनेता अर्जून कपूर.
मास्क न लावणाऱ्यांवर करिना कपूर संतापली; म्हणाली...

रिया कपूर करण बुलानीही पॉझिटिव्ह

अर्जून आणि अंशुला यांच्या बरोबरच रिया कपूर आणि करण बुलानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रिया कपूरचं नाव चर्चेत आलं होतं. रियाने तिच्या घरी गेट टुगेदर पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्येही कोरोना संक्रमितांची संख्या वाढू लागली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in