'मी ललित मोदीला जावई म्हणून...' सुश्मिता सेनच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत

सुश्मिता सेनचे (Sushmita Sen) वडील शुभम सेन यांनी ललित मोदी आणि सुश्मिताबाबत काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी
Actress Sushmita Sen Did Not Told Me Anything About Lalit Modi Says Shubham Sen Sushmita's Father
Actress Sushmita Sen Did Not Told Me Anything About Lalit Modi Says Shubham Sen Sushmita's Father

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी हे दोघंही जण सोशल मीडियावर गुरूवारपासून चर्चेत आहेत. ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही खासगी फोटो ट्विट करत Betterhalf असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे या दोघांनी मालदिव मध्ये लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर लगेचच तातडीने स्पष्टीकरण देत आम्ही लग्न केलं नाही तर एकमेकांना डेट करत आहोत असं स्पष्टीकरण ललित मोदी यांनी दिलं.

Actress sushmita sen  flaunts engagement Ring
Actress sushmita sen flaunts engagement Ring

या सगळ्या चर्चांनंतर सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे सोबत बसलेला एक फोटो समोर आला. त्या फोटोत सुश्मिता सेन एंगजमेंट रिंग दाखवते आहे या चर्चा रंगल्या, त्यामुळे या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता या सगळ्यावर सुश्मिता सेनचे वडील शुभीर सेन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुश्मिता सेनच्या रिलेशनशिपबद्दल शुभीर सेन काय म्हणाले?

मला याबाबत काहीही माहिती नाही. सोशल मीडियावर या काहीतरी बातम्या चालल्या आहेत. ललित मोदीने ट्विट केल्याचंही मला कळलं. मात्र अद्याप सुश्मिताकडून मला काहीही कळलेलं नाही. आएएनएससोबत बोलताना शुभीर सेन म्हटले की मला या सगळ्याबाबत काही माहिती नाही. मी सुश्मिताशी शुक्रवारी सकाळी बोललो होतो. मात्र तिने मला तिच्या आणि ललित मोदीच्या नात्याबाबत या सगळ्या बातम्यांबाबत काहीही सांगितलं नाही. मला याबाबत काही माहिती नाही त्यामुळे मी याबाबत काही प्रतिक्रियाही देऊ इच्छित नाही.

Actress Sushmita Sen Did Not Told Me Anything About Lalit Modi Says Shubham Sen Sushmita's Father
ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांनी गुपचूप आटोपला साखरपुडा? नव्या फोटोमुळे चर्चांना उधाण

सुश्मिता जर असा काही निर्णय घेणार असती तर तिने मला नक्की सांगितलं असतं. तिने ललित मोदीविषयी मला काहीही अजून तरी सांगितलेलं नाही. त्यामुळे मी त्याला जावई म्हणून स्वीकारेन का? याचं उत्तर अद्याप माझ्याकडे नाही.

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव आणि आता वडील शुभीर या दोघानीही आपल्याला सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यांविषयी काही माहिती नाही असं म्हटलं आहे. मात्र ललित मोदी यांचा मुलगा रूचिर याने वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. रूचिरच्या म्हणण्यानुसार सुश्मिता तसंच ललित मोदी यांच्या नात्याबाबत आम्हाला माहिती आहे.

ललित मोदी यांनी गुरूवारी ट्विट करत सुश्मिताला बेटर हाफ म्हटलं होतं. आपण लग्न केल्याचाच उल्लेख त्यांनी केला होता. मात्र नंतर काही वेळातच स्पष्टीकरण देत आम्ही लग्न केलं नसून एकमेकांना डेट करत आहोत असं ललित मोदी यांनी स्पष्ट केलं. या सगळ्यानंतर अभिनेत्री सुश्मितानेही तिच्या दोन दत्तक मुलींसोबत एक फोटो शेअर केला आणि मी खूप खुश आहे माझ्या मुलींसोबत, मी अद्याप लग्न केलेलं नाही या आशयाची एक पोस्ट केली होती. आता सुश्मिताच्या वडिलांनीही या नात्याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचं म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in