'गर्वाचा शेवट असाच होतो'; 'बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंड'बद्दल अभिनेत्री मंदाकिनी काय म्हणाल्या?

actress mandakini on bollywood boycott : गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झालं असून, अलिकडे चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची पद्धत सुरू झालीये...
actress Mandakini opens up on bollywood boycott
actress Mandakini opens up on bollywood boycott

बॉलिवूड बायकॉट ट्रेंडने सिने इंडस्ट्री सध्या चिंतेत आहे. लागोपाठ बॉलिवूड चित्रपटांविरोधात बॉलिवूड बायकॉट मोहीम सोशल मीडियांवरून चालवली जात असून, लालसिह चड्डा चित्रपटासह अनेक चित्रपटांना याचा फटका बसलाय. बॉलिवूडविरोधात निर्माण होत चाललेल्या नकारात्मक वातावरणावर अभिनेत्री मंदाकिनी यांनी भाष्य करताना बॉलिवूडला खडेबोल सुनावलेत. गर्व केला, तर गर्वाचा शेवट असाच होतो, असंही मंदाकिनी म्हणाल्या.

अभिनेत्री मंदाकिनी यांनी 'आजतक'शी बोलताना बॉलिवूडविरोधात सुरू असलेल्या बहिष्कार मोहिमेवर भूमिका मांडली.

बॉलिवूड बायकॉट ट्रेंडवर मंदाकिनी काय म्हणाल्या?

बॉलिवूडबद्दल निर्माण झालेलं नकारात्मक वातावरण, शो कॅन्सल पद्धती, सिनेमांवरील बहिष्कार या मुद्द्यावर बोलताना मंदाकिनी म्हणाल्या, 'या सर्व गोष्टींमुळे वेदनादायी आहेत. पूर्वी असं नव्हतं. दिग्दर्शकांना गुरूच्या नजरेनं बघितलं जात होतं. प्रत्येक कलाकार दिग्दर्शकाचा आदर करायचा. आमच्या काळातील कलाकारांनी तर दिग्दर्शकांचा नेहमीच आदर केला."

"त्यावेळी कलाकार आणि दिग्दर्शकांमध्ये आपलेपण वाटायचं. आता ते दिसत नाही. कदाचित त्यामुळे बॉलिवूडमधील लोक एकमेकांवर आरोप करतात", असं मत मंदाकिनी यांनी मांडलं.

तुमचा गर्विष्ठपणा दिसला की, लोक राग व्यक्त करणारच; बॉलिवूड बायकॉट ट्रेंडचं मंदाकिनींनी सांगितलं कारण

"पूर्वी एक अदब होती, आता ती राहिलेली नाही. इतका गर्विष्ठपणा लोकांमध्ये आला आहे. त्यांना वाटतं की, हवं तर ते सिने इंडस्ट्रीला बदलू शकतात आणि त्यांच्यामुळे इंडस्ट्री सुरू आहे. गर्व व्हायलाच नको. कितीही उंचावर पोहोचला, तरी माणसाने अहंकारी होऊ नये. विनम्र असायला हवं", असं म्हणत मंदाकिनी यांनी बॉलिवूडमधील काही लोकांवर नामोल्लेख न करता निशाणा साधला.

"सर्वसामान्य जनता तुम्हाला बघते. तुमच्यावर प्रेम करते. तुम्हाला आदर्श मानतात आणि जेव्हा त्यांना तुमच्यातील गर्विष्ठपणा दिसतो, तेव्हा साहजिकच आहे की त्यांचा राग बाहेर येईलच. बायकॉट ट्रेंड त्यांच्या रागाचाच परिणाम आहे", असं मंदाकिनी सध्या बॉलिवूडच्या अवस्थेवर म्हणाल्या.

बॉलिवूडमधील लोकच हे करत असावेत; मंदाकिनी यांनी व्यक्त केली शंका

बॉलिवूड बायकॉट ट्रेंडमागे इंडस्ट्रीतील लोक असावेत अशी शंका मंदाकिनी यांनी उपस्थित केली. "असंही असू शकतं की, इंडस्ट्रीतील लोक याला प्रोत्साहन देत असावेत. मला असं वाटतं की सगळं काही प्लानिंगचा भाग आहे. राजकारणातील आणि इंडस्ट्रीतील लोक हे प्लानिंग करत आहेत. हे जे लोक एकमेकांविरुद्ध बोलतात, त्याबद्दलही मला असं वाटतं की, त्यांना कुणीतरी शिकवतंय आणि उभं करतंय. प्रत्येक गोष्टीत अप्रामाणिकपणा दिसू लागला आहे. पण, तुम्ही खोटं किती लपवणार", असं मंदाकिनी म्हणाली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in